Eknath Shinde : “एकनाथ शिंदेंचं बंड हा शिवसेना संपवण्यासाठी भाजपचा डाव”, उद्धव ठाकरेंचा भाजपवर थेट आरोप
Uddhav Thackeray vs Eknath Shinde : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दुजोरा दिला आहे. एकनाथ शिंदेंचं बंड हा शिवसेना संपवण्यासाठी भाजपचा डाव असल्याचं म्हणत उद्धव ठाकरेंनी भाजपवर थेट आरोप केलाय.
मुंबई : एकनाथ शिंदे यांचं बंड हा सध्या राज्याच्या राजकारणातील सर्वाधिक चर्चेतला विषय आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडाला भाजप आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचा पाठिंबा असल्याचं उघडपणे बोललं जातंय. त्याला आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी दुजोरा दिला आहे. एकनाथ शिंदेंचं बंड हा शिवसेना (Shivsena) संपवण्यासाठी भाजपचा डाव असल्याचं म्हणत उद्धव ठाकरेंनी भाजपवर थेट आरोप केलाय. ते शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणी बैठकीत बोलत होते.
ठाकरेंचा भाजपवर आरोप
एकनाथ शिंदे यांच्या बंडाला भाजप आणि देवेंद्र फडणवीस यांचा पाठिंबा असल्याचं उघडपणे बोललं जातंय. त्याला आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दुजोरा दिला आहे. एकनाथ शिंदेंचं बंड हा शिवसेना संपवण्यासाठी भाजपचा डाव असल्याचं म्हणत उद्धव ठाकरेंनी भाजपवर थेट आरोप केलाय.
“बाळासाहेबांचं नाव वापराल तर याद राखा”
बाळासाहेब ठाकरे नाव वापरणाऱ्यांना उद्धव ठाकरेंनी खडसावलं. “हिंमत असेल तर स्वत:च्या बापाच्या नावाने मतं मागा”, असं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत. शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणी बैठकीत ते बोलत होते. शिवसेनेशी बेईमानी करणाऱ्यांवर कारवाईचे अधिकार उद्धव ठाकरेंकडेच असणार हे आता स्पष्ट झालं आहे. “मराठी अस्मिता आणि हिंदुत्वाशी प्रतारणा आजतादायत केली नाही. इथून पुढेही करणार नाही. हिंमत असेल तर स्वताच्या बापाच्या नावाने मते मागा. आधी नाथ होते, आता दास झाले”, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय.
शिवसेना कार्यकारिणी बैठक
एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडानंतर पक्षाकडून त्यांचं नेतेपद काढलं जातं का, याबाबत चर्चा होती. त्याप्रमाणे एकनाथ शिंदे यांचं नेतेपद काढा, अशी मागणी देखील यावेळी करण्यात आली. शिवसेनेच्या कार्यकारिणीच्या बैठकीत एकूण 6 प्रस्ताव ठेवण्यात आले आहेत. दरम्यान, एकनाथ शिंदे यांचं नेतेपद काढा, या मागणीमुळे शिंदेंची हकालपट्टी होण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या पाठिशी पक्ष उभा असेल, असाही प्रस्ताव यावेळी मांडण्यात आला.