मोठी बातमी! शिवसेनेकडून विधानपरिषदेसाठीची सचिन अहिर, आमशा पाडवींच्या नावावर शिक्कामोर्तब
शिवसेनेकडून दोन नावं निश्चित झाली असल्याचं समोर आलंय. शिवसेनेकडून विधानपरिषदेवर सचिन अहिर आणि आमशा पाडवी यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालंय. अशी माहिती सुत्रांनी दिलीय.
मुंबई : विधानपरिषद (Legislative Council) निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठी बातमी समोर येतेय. राज्यसभा निवडणुकीच्या घडामोडींना वेग आलेला असतानाच आता विधान परिषदेच्या उमेदवारांचीही चर्चा सुरु झालीय. शिवसेनेकडून दोन नावं निश्चित झाली असल्याचं समोर आलंय. शिवसेनेकडून विधानपरिषदेवर सचिन अहिर (Sachin Ahir) आणि आमशा पाडवी (Amsha Padvi) यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालंय. अशी माहिती सुत्रांनी दिलीय.
विधानपरिषदेसाठी दोन नावांवर शिक्कामोर्तब
विधानपरिषदेची निवडणूक होऊ घातली आहे. अश्यात शिवसेनेकडून दोन नावांवर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती आहे. एकीकडे राज्यसभेसाठी कट्टक शिवसैनिक संजय पवार यांना उमेदवारी दिली. त्यानंतर आता शिवसेनेकडून विधानपरिषदेवर सचिन अहिर आणि आमशा पाडवी यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालंय. अशी माहिती सुत्रांनी दिलीय.
आमशा पाडवी कोण आहेत?
कट्टर शिवसैनिक आमशा पाडवी यांना शिवसेनेने विधानपरिषदेसाठी उमेदवारी दिली आहे. धडगाव-अक्कलकुवा मतदारसंघातून त्यांनी विधानसभा निवडणूक लढवली पण काँग्रेसचे नेते केसी पाडवी यांच्याकडून त्यांचा 2 हजार 96 मतांनी पराभव झाला. आज त्यांना शिवसेनेने विधानसभेसाठी उमेदवारी दिली आहे.
सध्या राज्याच्या राजकारणात निवडणुकीचे रंग चढू लागले आहे. राज्यसभा निवडणुकीचे वारे वाहत आहे. अश्यात आता विधान परिषदेसाठी दोघांच्या नावावर शिक्कामोर्तब केल्याची माहिती आहे. सध्या शिवसेना मोठ्या चेहऱ्यांपेक्षा कट्टर आणि स्थानिक नेत्यांना उमेदवारी देण्यावर भर देत असल्याचं दिसतंय. त्यातूनच राज्यसभेसाठी संजय पवार आणि विधानपरिषदेसाठी आता आमशा पाडवी यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती आहे.
आमशा पाडवी यांनी टीव्ही 9 मराठीशी बोलताना या बातमीवर शिक्कामोर्तब केलंय. “मला खासदार संजय राऊत यांचा फोन आला. त्यांनी अनिल देसाई, आदित्य ठाकरे यांनीही मला याबद्दल सांगितलं, की विधान परिषदेसाठी आम्ही तुमचं नाव घेतलं आहे. दुर्गम भागात मी काम केलं. पक्ष वाढवण्यासाठी प्रयत्न केला. त्याचं माझ्या कामावर विश्वास ठेवत आज आमच्या पक्षप्रमुखांनी माझ्यावर ही मोठी जबाबदारी दिली. मला याचा आनंद आहे. मी इथून पुढेही असंच चांगलं काम करीत राहिल”, असं आमशा पाडवी यांनी टीव्ही 9 मराठीशी बोलताना सांगितलं.