शिवसेनेचा महाराष्ट्रातील एकमेव खासदार कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेणार?
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शपथविधीची तयारी झाली आहे. पण महाराष्ट्रातून कुणाकुणाला मंत्रिमंडळात स्थान मिळणार याबाबतची अनिश्चितता अजूनही कायम आहे. विविध नावांवर चर्चा सुरु आहे. पण शिवसेनेकडून दक्षिण मुंबईचे खासदार अरविंद सावंत कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. शिवसेनेला दोन मंत्रिपदं दिली जाण्याची शक्यता आहे, ज्यात एक कॅबिनेट आणि दुसरं राज्यमंत्रिपद […]
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शपथविधीची तयारी झाली आहे. पण महाराष्ट्रातून कुणाकुणाला मंत्रिमंडळात स्थान मिळणार याबाबतची अनिश्चितता अजूनही कायम आहे. विविध नावांवर चर्चा सुरु आहे. पण शिवसेनेकडून दक्षिण मुंबईचे खासदार अरविंद सावंत कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. शिवसेनेला दोन मंत्रिपदं दिली जाण्याची शक्यता आहे, ज्यात एक कॅबिनेट आणि दुसरं राज्यमंत्रिपद असेल. कॅबिनेट मंत्र्यांचा शपथविधी मोदींसोबतच होणार आहे.
शिवसेनेने अरविंद सावंत यांचं नाव भाजपच्या वरिष्ठांकडे पाठवल्याची माहिती आहे. भाजपाध्यक्ष अमित शाह आणि पंतप्रधान मोदी यांची मंत्रिमंडळ नियुक्तीसाठी दोन वेळा बैठक झाली. पण अजूनही नावं जाहीर करण्यात आलेली नाहीत. एनडीएचे सर्व खासदार शपथविधीसाठी दिल्लीला जाणार आहेत. त्यामुळे नेमकं कुणाच्या नावावर शिक्कामोर्तब होतं, यावर सस्पेन्स कायम आहे.
मोदींच्या मंत्रिमंडळात यावेळी तरुण चेहऱ्यांचा समावेश असण्याची शक्यता आहे. यावेळी भाजपकडून अनेक तरुण खासदार निवडून गेले आहेत. एनडीएमध्ये शिरोमणी अकाली दल, जेडीयू आणि शिवसेनेलाही मंत्रीपद मिळणार आहे. शिवाय इतर छोट्या पक्षांनाही राज्यमंत्रिपद दिलं जाऊ शकतं. पण राज्यमंत्र्यांचा शपथविधी नंतर होणार आहे.
उद्धव ठाकरे सहकुटुंब दिल्लीला रवाना
शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे आणि रश्मी ठाकरे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शपथविधीसाठी ‘मातोश्री’वरून दिल्लीसाठी रवाना झाले आहेत. हजारो पाहुण्यांच्या उपस्थितीत गुरुवारी सायंकाळी 7 वाजता मोदींचा शपथविधी होईल. अनेक राष्ट्रांच्या प्रमुखांसह दिग्गजांना या शपथविधीसाठी निमंत्रित करण्यात आलंय.
कोण आहेत अरविंद सावंत?
दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघात शिवेसेनेच्या अरविंद सावंत यांनी पुन्हा एकदा बाजी मारली. त्यांनी काँग्रेसच्या मिलिंद देवरा यांचा पराभव केला. दक्षिण मुंबई हा काँग्रेसचा पारंपरिक मतदारसंघ म्हणून ओळखला जात होता. मिलिंद देवरा सलग दोन वेळा 2004 आणि 2009 मध्ये निवडून आले. मात्र 2014 च्या निवडणुकीत त्यांचा पराभव करुन शिवसेनेचे अरविंद सावंत खासदार झाले.