Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अर्णव गोस्वामी सुपारीबाज पत्रकार, हक्कभंग दाखल करा, सभागृहात शिवसेना आक्रमक

"अर्णव गोस्वामी स्वत: न्यायाधीशाच्या भूमिकेत आहेत, स्वत: खटला चालवत आहेत, स्वत: निकाल देत आहेत" अशा शब्दात परिवहन मंत्री अनिल परब यांनी हल्लाबोल केला. 

अर्णव गोस्वामी सुपारीबाज पत्रकार, हक्कभंग दाखल करा, सभागृहात शिवसेना आक्रमक
Follow us
| Updated on: Sep 08, 2020 | 11:46 AM

मुंबई : अर्णव गोस्वामी सुपारीबाज पत्रकार आहेत, असा घणाघाती आरोप करत विधिमंडळ पावसाळी अधिवेशनादरम्यान शिवसेना सभागृहात आक्रमक झाली. दुसऱ्या दिवसाच्या सुरुवातीलाच शिवसेना आमदारांनी पत्रकार अर्णव गोस्वामी यांच्यावर हल्लाबोल चढवला. मुख्यमंत्र्यांचा एकेरी उल्लेख केल्याप्रकरणी गोस्वामी यांच्या विरोधात शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्याकडून हक्कभंगाचा प्रस्ताव आणण्यात आला. (Shivsena MLA violent against Journalist Arnab Goswami in Vidhansabha)

“अर्णव गोस्वामी हेतुपुरस्सर आणि दुष्ट बुद्धीने वाईट बोलत आहेत. अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या मृत्यू प्रकरणाशी नेत्यांचा काहीही संबंध नाही. मात्र गोस्वामी कपोलकल्पित बोलून स्वातंत्र्याच्या नावाखाली दिशाभूल करत आहेत. त्यांची ‘रिपब्लिक टीव्ही’ ही वृत्तवाहिनी बंद करण्यात यावी” अशी मागणी आमदार प्रताप सरनाईक यांनी केली.

“अर्णव गोस्वामी स्वत: न्यायाधीशाच्या भूमिकेत आहेत, स्वत: खटला चालवत आहेत, स्वत: निकाल देत आहेत” अशा शब्दात परिवहन मंत्री अनिल परब यांनी हल्लाबोल केला. “डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या राज्यघटनेनुसार प्रसारमाध्यमांनाही चौकट दिली आहे. या प्रत्येकाच्या चौकटी सुसंगत राहाव्यात अस घटना म्हणते. अर्णब स्वतःला न्यायाधीश समजतात का? हे कोण पत्रकार आहेत, ते सुपारी घेऊन काम करतात, असा अपमान करणाऱ्या पत्रकाराला शिक्षा झाली पाहिजे. एक घटना घडली तर पत्रकार संरक्षण कायदा आणला, म्हणून त्यांनी काहीही करायचं का?” असा प्रश्न अनिल परब यांनी उपस्थित केला. त्यानंतर सभागृहाचे कामकाज 10 मिनिटांसाठी तहकूब करण्यात आले.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लांबलेल्या यंदाच्या विधिमंडळ पावसाळी अधिवेशनाचा आज (8 सप्टेंबर) दुसरा आणि अखेरचा दिवस. विधानपरिषद उपसभापती पदाची निवडणूक आज अपेक्षित असली तरी भाजपने याविरोधात मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतल्याने त्याकडे डोळे लागले आहेत.

[svt-event title=”गोस्वामी न्यायाधीशाच्या भूमिकेत : अनिल परब” date=”08/09/2020,11:15AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event] (Shivsena MLA violent against Journalist Arnab Goswami in Vidhansabha)

[svt-event title=”अर्णव गोस्वामींविरोधात विधानसभेत हक्कभंगाची तक्रार” date=”08/09/2020,11:10AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

विधानपरिषद उपसभापती पदासाठी निवडणूक होऊ नये, यासाठी भाजपने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. कोरोना संकटकाळात दोन दिवसाच्या अधिवेशनात काही आमदार अनुपस्थित आहेत. गोपीचंद पडळकर, परिणय फुके, प्रविण पोटे हे परिषदेवरील आमदार कोरोना पॉझिटिव्ह आहेत. त्यात निवडणुकीची घाई का? असा प्रश्न प्रवीण दरेकर यांनी उपस्थित केला आहे.

भाजपकडून दिग्गज नेते आणि विधानपरिषद आमदार भाई उर्फ विजय गिरकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर महाविकास आघाडीकडून विद्यमान उपसभापती अर्थात शिवसेनेच्या ज्येष्ठ नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनाच पुन्हा संधी देण्यात आली आहे.

संबंधित बातम्या :

विधानपरिषद उपसभापती पदाच्या निवडणुकीत रंगत, भाजपची हायकोर्टात धाव

(Shivsena MLA violent against Journalist Arnab Goswami in Vidhansabha)

प्रशांत कोरटकर जामीनासाठी अर्ज करणार
प्रशांत कोरटकर जामीनासाठी अर्ज करणार.
आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवणार; कर्जमाफीच्या मुद्यावर कडू आक्रमक
आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवणार; कर्जमाफीच्या मुद्यावर कडू आक्रमक.
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा.
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला.
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी.
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण.
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार.
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार.
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात.
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत.