Metro carshed | अल्प बुद्धी दिसतेच आहे, अमृता फडणवीसांच्या ट्वीटला शिवसेनेच्या महिला आमदाराचा टोला

वर्षभरापासून तो पूर्वपदावर येतोय," असा टोला आमदार यामिनी जाधव यांनी लगावला आहे. (MLA Yamini Jadhav Criticism Amruta Fadnavis tweet on Metro carshed)

Metro carshed | अल्प बुद्धी दिसतेच आहे, अमृता फडणवीसांच्या ट्वीटला शिवसेनेच्या महिला आमदाराचा टोला
Follow us
| Updated on: Nov 04, 2020 | 9:00 AM

मुंबई : कांजूरमार्ग येथील मेट्रोची जागा ही आपल्या मालकीचा असल्याचा दावा केंद्राने केला होता. या दाव्यानंतर केंद्र विरुद्ध राज्य सरकार असा संघर्ष पेटला आहे. यावरुन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी ट्विटरवरुन पुन्हा एकदा ठाकरे सरकारवर टीका केली होती. या टीकेला शिवसेनेकडून जोरदार प्रत्युत्तर देण्यात आलं आहे. “फडणवीसांनी दिल्लीच्या नादाला लागून महाराष्ट्र गुजरातला न्यायचा प्रयत्न केला होता, वर्षभरापासून तो पूर्वपदावर येतोय,” असा खोचक टोला शिवसेना आमदार यामिनी जाधव यांनी लगावला आहे. (Shivsena MLA Yamini Jadhav Criticism Amruta Fadnavis tweet on Metro carshed)

“हा प्रश्न देवेंद्रजीना विचारला असता तर बरे झाले असते. दिल्लीच्या नादाला लागून त्यांनी महाराष्ट्र गुजरातला न्यायचा प्रयत्न केला होता. वर्षभरापासून तो पूर्वपदावर येत आहे. काळजी नसावी. बाकी “अल्प बुद्धी” दिसतेच आहे,” अशी खोचक टीका यामिनी जाधव यांनी केली आहे. अमृता फडणवीसांच्या ट्वीटला कोट करत त्यांनी ही टीका केली आहे.

अमृता फडणवीस काय म्हणाल्या होत्या? 

“मंद बुद्धी, बहु गर्वी, कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र आमचा?”, अशा शब्दात अमृता फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला होता. त्यावर यामिनी जाधव यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

मेट्रो कारशेडची जागा राज्य सरकारचीच, आदित्य ठाकरेंचा दावा 

दरम्यान  मेट्रो कारशेडची जागा राज्य सरकारचीच असल्याचा दावा पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी केला होता. “महसुली नोंदीनुसार कांजूरमार्गची जागा ही राज्य सरकारचीच आहे. जिल्हाधिकाऱ्याने ही जागा एमएमआरडीएला कारशेड डेपो तयार करण्यासाठी दिली आहे. तशी नोंदच महसूल विभागाच्या खात्यात आहे. कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करूनच ही जागा एमएमआरडीएला देण्यात आल्याचंही आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे.”

आदित्य ठाकरे यांनी केलेल्या या दाव्यामुळे आता या प्रकरणाला वेगळं वळण मिळण्याची शक्यता आहे. आदित्य ठाकरे यांनी ही माहिती दिल्याने त्यावर भाजप काय प्रतिक्रिया देणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

काय आहे प्रकरण?

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी आरेमधील मेट्रो कारशेड कांजूरमार्गला हलवण्याचा निर्णय घेतला होता. राज्य सरकारने एकही रुपया न घेता ही जागा MMRDA ला दिल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले होते. मात्र, आता केंद्र सरकारने या जागेत मिठागार असल्याचे सांगत त्यावर आपला हक्क सांगितला आहे. केंद्राच्या उद्योग संवर्धन आणि व्यापार मंत्रालयाने राज्याचे मुख्य सचिव संजय कुमार यांना पत्र पाठवले आहे. या पत्रात कांजूरमार्गची जागा MMRDA ला देण्याचा निर्णय रद्द करा. ही जागा मिठागराची आहे. आम्ही त्यावरील आमचा हक्क सोडलेला नाही, असे नमूद करण्यात आले आहे.

यापूर्वीही MMRDA चा प्रस्ताव आम्ही फेटाळला होता. त्यामुळे आमच्या परस्पर कारशेड उभारणं चुकीचं आहे. त्यामुळे MMRDA ने या कारशेडचे काम त्वरित थांबवा, असे केंद्र सरकारतर्फे सांगण्यात आले आहे. (Shivsena MLA Yamini Jadhav Criticism Amruta Fadnavis tweet on Metro carshed)

संबंधित बातम्या : 

मेट्रो कारशेडची जागा राज्य सरकारचीच; आदित्य ठाकरेंचा दावा

मुंबईची इंच इंच जमीन फक्त महाराष्ट्राचीच, विकास रोखण्याचे षडयंत्र एकजुटीने उधळून लावूया, संजय राऊतांचा घणाघात

Non Stop LIVE Update
... हा महाराष्ट्र या नराधमांच्या हाती देऊ नका, चित्रा वाघ यांचे आवाहन
... हा महाराष्ट्र या नराधमांच्या हाती देऊ नका, चित्रा वाघ यांचे आवाहन.
भुजबळांनी आमच्या मराठा समाजाला टार्गेट केले, मनोज जरांगे यांचा हल्ला
भुजबळांनी आमच्या मराठा समाजाला टार्गेट केले, मनोज जरांगे यांचा हल्ला.
भाषण सुरु असताना आली चिठ्ठी, गद्दाराचं करायचं काय ? शरद पवार म्हणाले..
भाषण सुरु असताना आली चिठ्ठी, गद्दाराचं करायचं काय ? शरद पवार म्हणाले...
धारावीची जमीन अदानीला देण्यासाठी महाराष्ट्र सरकार पाडले - राहुल गांधी
धारावीची जमीन अदानीला देण्यासाठी महाराष्ट्र सरकार पाडले - राहुल गांधी.
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल.
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप.
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार.
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ.
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार.
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.