पूजा चव्हाण मृत्यू | संजय राठोड दक्षता घेत असावेत, योग्य वेळी बोलतील, शिवसेनेची प्रतिक्रिया

पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणी संजय राठोड यांच्याविरोधात हा कट रचला गेला असेल, तर निश्चितच तो अतिशय गंभीर आहे. राठोड सावधानता बाळगत असतील तर तो त्यांचा अधिकार आहे, असं शिवसेना आमदार मनिषा कायंदे म्हणाल्या. (Manisha Kayande Pooja Chavan Death)

पूजा चव्हाण मृत्यू | संजय राठोड दक्षता घेत असावेत, योग्य वेळी बोलतील, शिवसेनेची प्रतिक्रिया
पूजा चव्हाण, संजय राठोड
Follow us
| Updated on: Feb 15, 2021 | 4:33 PM

मुंबई : शिवसेना नेते आणि वनमंत्री संजय राठोड गायब आहेत का, माहिती नाही. परंतु ते योग्य वेळ आली की बोलतील. गंभीर बाब असल्याने चुकीचं वक्तव्य होऊ नये, याची दक्षता ते घेत असतील, अशी प्रतिक्रिया शिवसेना आमदार मनिषा कायंदे यांनी दिली. पूजा चव्हाणच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणी राठोड यांच्यावर गंभीर आरोप केले जात आहेत. (Shivsena MLC Manisha Kayande reacts on Sanjay Rathod in Pooja Chavan Death Case)

“चुकीचे वक्तव्य होऊ नये, याची दक्षता”

“मंत्री संजय राठोड गायब आहेत की काय, ते आपल्याला माहिती नाही. परंतु मला असं वाटतं, की योग्य वेळ आली की ते बोलतील. ही इतकी गंभीर बाब असल्याने चुकीचे वक्तव्य होऊ नये, याची दक्षता ते घेत असतील. हा कट रचला गेला असेल, तर निश्चितच तो अतिशय गंभीर आहे. ते सावधानता बाळगत असतील तर तो त्यांचा अधिकार आहे” असंही मनिषा कायंदे म्हणाल्या.

“सरकार अस्थिर करण्यासाठी कोणत्याही थराला”

“प्रत्येक वेळी यांनाच कसे धमकीचे फोन येत आहेत? एखाद्याचा मृत्यूचं राजकारण करण्याची नवी पद्धत भाजपने सुरु केलेली आहे. अभिनेता सुशांतसिंह राजपूतनंतर पूजा चव्हाणच्या बाबतही सरकार अस्थिर करण्यासाठी कोणत्याही थराला जायला भाजप तयार झाले आहेत” अशी घणाघाती टीकाही आमदार मनिषा कायंदे यांनी केली. (Shivsena MLC Manisha Kayande reacts on Sanjay Rathod in Pooja Chavan Death Case)

“मृत्यूपश्चात बदनामी कुटुंबासाठी क्लेशदायक”

एक गोष्ट महत्त्वाची म्हणजे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पूर्ण सकारात्मक भूमिका घेतलेली आहे. त्यांनी या प्रकरणाच्या चौकशीची तयारी दाखली आहे. दुसरी गोष्ट म्हणजे कुटुंबीयांना किती त्रास होत असतो, हे आपण अनेक उदाहरणात पाहिलेलं आहे. एखाद्याचा मृत्यू झाल्यानंतर सतत अशा प्रकारे वेगवेगळी वक्तव्यं सोशल मीडियावर करणं, त्याची बदनामी करणं, हे खरोखरच त्या कुटुंबासाठी क्लेशदायक आहे. हे थांबलं पाहिजे, अशी मागणी मनिषा कायंदे यांनी केली.

संबंधित बातम्या :

चित्रा वाघ यांच्यानंतर अजून एका भाजप नेत्याला धमकीचा फोन!

धनंजय मुंडे यांची पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणावर मोठी प्रतिक्रिया

(Shivsena MLC Manisha Kayande reacts on Sanjay Rathod in Pooja Chavan Death Case)

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.