‘त्यांना सांगितलं होतं जाऊ नका, तरीही ते गेले’, सोमय्यांच्या दगडफेकीवर खासदार भावना गवळींची पहिली प्रतिक्रिया

शिवसेना खासदार भावना गवळी यांच्या संस्थेच्या बालाजी पार्टीकल बोर्ड कारखान्याची आज किरीट सोमय्या पाहणी करण्याकरिता आले होते. मात्र भावना गवळी यांच्या समर्थकांनी किरीट सोमय्या यांना काळे झेंडे दाखवत त्यांच्या ताफ्यावर दगड फेक आणि शाई फेक केली.

'त्यांना सांगितलं होतं जाऊ नका, तरीही ते गेले', सोमय्यांच्या दगडफेकीवर खासदार भावना गवळींची पहिली प्रतिक्रिया
शिवसेना खासदार भावना गवळी आणि किरीट सोमय्या
Follow us
| Updated on: Aug 20, 2021 | 3:28 PM

वाशिम : भाजप नेते माजी खासदार किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांच्या गाडीवर आज दगडेफक झाली तसंच त्यांच्यावर शाईफेकीचा देखील प्रयत्न झाला. शिवसैनिकांनी हा सगळा प्रकार केल्याचा आरोप आहे. यावरतीच शिवसेना खासदार भावना गवळी (Bhavana Gawali) यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. ‘त्यांना सांगितलं होतं जाऊ नका, तरीही ते गेले, आक्रमक शिवसैनिकांनी म्हणूनच दगडफेक झाली असावी, असं भावना गवळी म्हणाल्या.

‘त्यांना सांगितलं होतं जाऊ नका, तरीही ते गेले, दगडफेक झाली!’

शिवसेना खासदार भावना गवळी यांच्या संस्थेच्या बालाजी पार्टीकल बोर्ड कारखान्याची आज किरीट सोमय्या पाहणी करण्याकरिता आले होते. मात्र भावना गवळी यांच्या समर्थकांनी किरीट सोमय्या यांना काळे झेंडे दाखवत त्यांच्या ताफ्यावर दगड फेक आणि शाई फेक केली.

याविषयी खासदार भावना गवळी यांना विचारले असता, पार्टीकल बोर्ड कारखाना हा शेतकऱ्यांचा आहे. शिवाय पोलिसांनी कारखान्यावर जाऊ नका, असे सांगूनही ते गेले, त्यामुळं शेतकरी आणि शिवसैनिक आक्रमक झाले. त्याचमुळे दगड फेक झाली असावी, असं भावना गवळी म्हणाल्या.

सोमय्यांकडून भावना गवळींवर 100 कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा आरोप

यवतमाळ वाशिमच्या शिवसेना खासदार भावना गवळी यांच्यावर भाजप नेते माजी खासदार किरीट सोमय्या यांनी 100 कोटी रुपयांच्या भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. बालाजी पार्टीकल बोर्ड कारखान्यामध्ये खासदार भावना गवळी यांनी 100 कोटी रुपयांचा घोटाळा केला, असा आरोप सोमय्या यांनी केला होता.

आज सोमय्या वाशिम दौऱ्यावर आले असता भडकलेल्या भावना गवळींच्या समर्थकांनी सोमय्या यांच्या गाडीवर दगडफेक आणि शाईफेक केली. यावेळी सोमय्य्या यांच्यासोबत भाजप आमदार राजेंद्र पाटणी होते.

शिवसेनेच्या धमक्यांना, हल्ल्यांना मी घाबरत नाही

शिवसेनेच्या धमक्यांना मी घाबरत नाही. अशा रोजच मला धमक्या येतात. मी आज वाशिम येथे आलो असता माझ्या गाडीवर हल्ला करण्याचा प्रयत्न झाला. अशा हल्ल्यांना मी घाबरत नाही, अशी प्रतिक्रिया किरीट सोमय्या यांनी प्रसारमाध्यमाशी बोलताना दिली.

(Shivsena MP Bhavana Gawali Statement on BJP EX MP Kirit Somaiya Convey Attacked)

हे ही वाचा :

BREAKING – किरीट सोमय्यांच्या ताफ्यावर शिवसैनिकांची दगडफेक

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.