पंकजा मुंडेंना पुन्हा शिवसेनाप्रवेशाचे आमंत्रण, सेना खासदार उद्धव ठाकरेंना भेटणार
पंकजा मुंडे शिवसेनेमध्ये आल्यास मराठवाड्यात शिवसेनेला बळ मिळेल" असा विश्वास खासदार हेमंत पाटील यांनी व्यक्त केला
नवी दिल्ली : भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांना शिवसेना प्रवेशाची निमंत्रणं सुरुच आहेत. शिवसेनेचे हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील (Hemant Patil) यांनीही पंकजांना सेनेत आवताण दिले आहे. हेमंत पाटलांसह शिवसेनेचे पदाधिकारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांची भेट घेऊन पंकजांना सेनेत बोलवण्यासाठी विनंती करणार आहेत. (Shivsena MP Hemant Patil to meet CM Uddhav Thackeray invites Pankaja Munde in party)
“भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना भाजपमध्ये मान मिळत नाही. पंकजा मुंडे शिवसेनेत आल्यास त्यांचं स्वागतच आहे. पंकजा मुंडे यांना शिवसेनेत आणण्यासाठी आम्ही शिवसेनेचे सर्व पदाधिकारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहोत. पंकजा मुंडे शिवसेनेमध्ये आल्यास मराठवाड्यात शिवसेनेला बळ मिळेल.” असा विश्वास हेमंत पाटील यांनी ‘टीव्ही 9 मराठी’शी बोलताना व्यक्त केला.
ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी भाजपला रामराम करत राष्ट्रवादीत प्रवेश केल्यापासून पंकजा मुंडेंनाही शिवसेनेत प्रवेश करण्यासाठी निमंत्रण येत आहेत. शिवसेना प्रवक्ते आणि सार्वजनिक पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील, माजी राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी आतापर्यंत पंकजांना पक्षात बोलावले आहे.
गुलाबराव पाटील काय म्हणाले?
“शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचे मुंडे परिवाराशी जिव्हाळ्याचे आणि कौटुंबिक संबंध राहिले आहेत. दिवंगत गोपीनाथ मुंडे आणि बाळासाहेब ठाकरे यांनी भाजप-सेनेत युती घडवून आणली होती. 2014 मध्ये झालेल्या लोकसभेच्या पोटनिवडणुकीत प्रीतम मुंडे भाजपच्या उमेदवार होत्या. तेव्हा शिवसेनेने त्यांच्याविरोधात उमेदवार दिला नव्हता. युती असतानाही आणि युती नसतानाही शिवसेनेने मुंडे कुटुंबासोबतचे नाते जोपासले आहे. त्यामुळे आता एकनाथ खडसेंप्रमाणे पंकजा मुंडे यांनी शिवसेनेत प्रवेश केला पाहीजे, म्हणजे राजकारणात मजा येईल.” असे गुलाबराव पाटील म्हणाले होते.
पंकजा मुंडे यांना पक्षात अजूनही डावलले जात असल्यामुळे मराठवाड्यातील पक्षबांधणीसाठी आयोजित करण्यात आलेल्या बैठकांना त्या उपस्थित राहत नसल्याची चर्चा होती. मात्र पंकजा मुंडे वैयक्तिक कारणांमुळे या बैठकांना उपस्थित राहिल्या नाहीत, अशी सारवासारव भाजप नेत्यांकडून सोमवारी करण्यात आली. मात्र, त्याचवेळी औरंगाबादमधील बैठकीला पंकजा मुंडे समर्थकांनी दांडी मारल्याने भाजपमध्ये सर्वकाही आलबेल नसल्याची चर्चा आहे. (Shivsena MP Hemant Patil to meet CM Uddhav Thackeray invites Pankaja Munde in party)
VIDEO : Hemant patil | पंकजा मुंडेंना पुन्हा शिवसेना प्रवेशाचे आमंत्रण, सेना खासदार उद्धव ठाकरेंना भेटणार@Hemant_patil_ pic.twitter.com/KkJkEAe7gq
— TV9 Marathi (@TV9Marathi) November 9, 2020
संबंधित बातम्या :
पंकजा मुंडे शिवसेनेत आल्या पाहीजेत, मग राजकारणात मजा येईल : गुलाबराव पाटील
खडसेंच्या राजीनाम्याने भाजपला उतरती कळा, पंकजा मुंडेंनी शिवसेनेत यावे : अर्जुन खोतकर
(Shivsena MP Hemant Patil to meet CM Uddhav Thackeray invites Pankaja Munde in party)