‘मोदींनी भ्रष्ट म्हटलं तोच पक्ष अजित पवारांना दिला ही लोकशाहीची मोठी शोकांतिका’
EC Decision on NCP | "दोन्ही नेत्यांना महाराष्ट्राचा राग आहे. मराठी माणसाचा बदला घ्यायचा आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे मराठी अस्मिता जपणारे पक्ष आहेत. महाराष्ट्रावर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध आवाज उठवणारे पक्ष आहेत. या दोन्ही पक्षांची वाताहात करुन सूड उगवला"
EC Decision on NCP | “जे शिवसेनेच्या बाबतीत झालं, तेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाबतीत झालं. पक्षाचे संस्थापक निवडणूक आयोगासमोर सुनावणीला बसले आहेत. असं असताना, आयोग संपूर्ण पक्षच जर एखाद्याच्या हातात सोपवत असेल, तर यालाच मोदी गॅरेंटी म्हणातात” असा हल्लाबोल शिवसेना खासदार आणि नेते संजय राऊत यांनी केला. “मोदी गॅरेंटी कोणती असेल, तर पक्ष फोडा, भ्रष्टाचार करा, आम्ही तुमच्या भ्रष्टाचारावर हल्ले करु. तुमच्यामागे ईडी, सीबीआय लावू. तुम्ही तुमचा पक्ष फोडून आमच्याकडे या, तुम्हाला पावन करुन घेऊ. ज्या पक्षावर भ्रष्टाचाराचे आरोप केले, तो तुम्हाला देऊ. हीच मोदी गॅरेंटी आहे. मोदी-शहा राष्ट्रवादी काँग्रेसला नॅशनलिस्ट करप्ट पार्टी म्हणाले होते, तोच पक्ष मोदी-शाहंनी अजित पवारांना दिला, ही निवडणूक आयोग, देशाच्या लोकशाहीची शोकांतिका आहे. हा काळाने उगवलेला सूड आहे” असं संजय राऊत म्हणाले.
निवडणूक आयोग आता भारतीय निवडणूक आयोग राहिलेला नाही. आता तो मोदी-शाहंचा निवडणूक आयोग झाला आहे. म्हणूनच महाराष्ट्र्च्या बाबतीत असे निर्णय घेतले गेले. कारण दोन्ही नेत्यांना महाराष्ट्राचा राग आहे. मराठी माणसाचा बदला घ्यायचा आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे मराठी अस्मिता जपणारे पक्ष आहेत. महाराष्ट्रावर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध आवाज उठवणारे पक्ष आहेत. या दोन्ही पक्षांची वाताहात करुन सूड उगवला. पण महाराष्ट्राची जनता हे खपवून घेणार नाही” असं संजय राऊत म्हणाले.
आता निकाल येणं शरद पवारांसाठी मोठ चॅलेंज का?
केंद्रीय निवडणूक आयोगाने काल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबाबत महत्त्वाचा निकाल दिला. हा निकाल शरद पवार गटासाठी मोठा झटका मानला जात आहे. लोकसभा निवडणुकीला काही महिने उरले असताना हा निकाल आलाय. शरद पवारांनी स्थापना केलेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्यांच्या हातातून गेलाय. त्यांचे पुतणे अजित पवार यांच्या गटाला निवडणूक आयोगाने अधिकृत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून मान्यता दिलीय.