पोटनिवडणूक भाजपच्या तिकिटावर जिंकली, पुढच्याच निवडणुकीत हातावर बांधलं शिवबंधन; जाणून घ्या कोण आहेत राजेंद्र गावित?

MP Rajendra Gavit | मूळच्या काँग्रेसच्या असलेल्या राजेंद्र गावित यांनी आतापर्यंत शिवसेना व्हाया भाजप असा रंजक प्रवास केला आहे. पालघर जिल्हा मुंबईपासून नजीकच्या अंतरावर असला तरी आजपर्यंत दुर्लक्षित राहिला आहे. या मतदारसंघातील राजकारणाची चाल ही नेहमीच वेगळी राहिली.

पोटनिवडणूक भाजपच्या तिकिटावर जिंकली, पुढच्याच निवडणुकीत हातावर बांधलं शिवबंधन; जाणून घ्या कोण आहेत राजेंद्र गावित?
राजेंद्र गावित, शिवसेना खासदार
Follow us
| Updated on: Aug 23, 2021 | 7:09 AM

मुंबई: अगदी काही वर्षांपूर्वी अस्तित्त्वात आलेल्या पालघर लोकसभा मतदारसंघात सलग दोनवेळा विजय मिळवून राजेंद्र गावित याठिकाणी बऱ्यापैकी स्थिरस्थावर झाले आहेत. मूळच्या काँग्रेसच्या असलेल्या राजेंद्र गावित यांनी आतापर्यंत शिवसेना व्हाया भाजप असा रंजक प्रवास केला आहे. पालघर जिल्हा मुंबईपासून नजीकच्या अंतरावर असला तरी आजपर्यंत दुर्लक्षित राहिला आहे. या मतदारसंघातील राजकारणाची चाल ही नेहमीच वेगळी राहिली.

पालघर लोकसभा मतदारसंघ 2008 साली अस्तित्वात आला. त्यापूर्वी हा भाग डहाणू लोकसभा मतदारसंघात येत असे. या मतदारसंघात पूर्वीपासूनच काँग्रेसचे वर्चस्व राहिले होते. मात्र, राजेंद्र गावित यांनी 2018 मध्ये हे वर्चस्व मोडून काढत भाजपला विजय मिळवून दिला होता.

कोण आहेत राजेंद्र गावित?

राजेंद्र गावित यांचा जन्म 24 जुलै 1967 रोजी पालघरमध्ये झाला. त्यांनी मुंबई विद्यापीठातून बी.ए. पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले आहे. मूळचे काँग्रसचे कार्यकर्ते असलेले राजेंद्र गावित हे मुळचे नंदूरबारचे आहेत. ते काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी सरकारमध्ये आदिवासी विकास मंत्री होते.

राजेंद्र गावित यांचा राजकीय प्रवास

राजेंद्र गावित यांची राजकीय कारकीर्द फार मोठी नसली तरी त्यांची आतापर्यंतची वाटचाल पाहत आगामी काळात ते पालघरच्या स्थानिक राजकारणातील महत्वपूर्ण घटक ठरतील, अशी शक्यता वाटते. काँग्रेसमध्ये हीन दर्जाची वागणूक मिळत असल्यामुळे राजेंद्र गावित यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता.

भाजपचे दिवंगत खासदार चिंतामण वनगा यांच्या निधनामुळे पालघर लोकसभा मतदारसंघाची जागा रिक्त झाली होती. त्यासाठी 2018 साली पोटनिवडणूक झाली. त्यावेळी शिवसेनेने चिंतामण वगना यांचे सुपूत्र श्रीनिवास वगना यांना उमेदवारी देण्याची खेळी खेळली. त्यावेळी भाजपकडून राजेंद्र गावित यांना मैदानात उतरवण्यात आले. या निवडणुकीत राजेंद्र गावित यांनी बाजी मारली होती.

मात्र, 2019 मध्ये राजकीय समीकरणे बदलल्यामुळे शिवसेना-भाजप यांच्यात पुन्हा दिलजमाई झाली. जागावाटपात पालघर मतदारसंघ शिवसेनेच्या वाट्याला आला होता. त्यामुळे राजेंद्र गावित यांचे काय होणार, असा प्रश्न निर्माण झाला होता. अखेर राजेंद्र गावित यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यानंतर शिवसेनेकडून त्यांना लोकसभेची उमेदवारी जाहीर करण्यात आली. शिवसेना-भाजपच्या एकत्रित ताकदीच्या जोरावर राजेंद्र गावित यांनी 2019 च्या लोकसभा निवडणुकीतही विजय मिळवला होता.

संबंधित बातम्या:

पाचवेळा लोकसभेची निवडणूक जिंकली, इंदिरा गांधींचा लिटल खासदार, कोण होते दामोदर शिंगडा?

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.