अशोक चव्हाण जे बोलतात त्याच्याशी मुख्यमंत्र्यांचा थेट संबंध नाही; राऊतांची सारवासारव

हा विषय कॅबिनेटचा आहे आणि तो कॅबिनेटमध्ये सुटू शकतो," असे संजय राऊत म्हणाले. (Sanjay raut On Ashok chavan Statement)

अशोक चव्हाण जे बोलतात त्याच्याशी मुख्यमंत्र्यांचा थेट संबंध नाही; राऊतांची सारवासारव
Follow us
| Updated on: Oct 31, 2020 | 2:39 PM

पुणे : काँग्रेस नेते आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण जे बोलतात, सांगतात त्याच्याशी मुख्यमंत्र्यांचा थेट काहीही संबंध येत नाही, अशी प्रतिक्रिया शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिली. काँग्रेसच्या महापालिकांना मुख्यमंत्री निधी देत नाही, असे वक्तव्य सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी केले होते. त्यावर संजय राऊत यांनी ही प्रतिक्रिया दिली. (Sanjay raut On Ashok chavan Statement)

“अशोक चव्हाण जे बोलतात किंवा जे काही सांगतात, त्याच्याशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा थेट काहीही संबंध येत नाही. हा विषय कॅबिनेटचा आहे आणि तो कॅबिनेटमध्ये सुटू शकतो,” असे संजय राऊत म्हणाले.

राज्यातील नोकरभरतीवरुन इतर पक्षातील नेत्यांनी वातावरण खराब करू नये. हा विषय थोडाफार केंद्रांच्या अखत्यारित येतो. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही याकडे लक्ष देण्याची गरज आहे. खासदार उदयनराजे आणि संभाजीराजे यांनी नेतृत्व करावं, असेही संजय राऊत म्हणाले.

अशोक चव्हाण काय म्हणाले होते?

“काँग्रेसची सत्ता असलेल्या महापालिकांना मुख्यमंत्र्यांकडून निधी मिळत नाही. त्यामुळे नांदेडलाही निधी मिळाला नाही. मात्र आपण सार्वजनिक बांधकाम खात्याकडून निधी मिळवून दिला,” असे वक्तव्य अशोक चव्हाण यांनी केले. अतिवृष्टीमुळे मराठवाड्यात झालेल्या नुकसानाचा आढावा घेण्यासाठी अशोक चव्हाण परभणीत दाखल झाले. यावेळी त्यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी हे वक्तव्य केले.

“सत्तेत असताना आपल्या भागाचा विकास झाला पाहिजे, या मताचा मी आहे. पण दुर्दैवाने कोरोनामुळे 30 टक्केच निधी मिळाला, पण मराठवाड्याला अधिकचा निधी देण्याची माझी भूमिका असल्याची ग्वाही यावेळी अशोक चव्हाण यांनी दिली.” (Sanjay raut On Ashok chavan Statement)

संबंधित बातम्या : 

मी तसं बोललोच नाही, अशोक चव्हाणांचा ‘त्या’ विधानावरून यू-टर्न

महाविकासआघाडीतील तिन्ही पक्षातील नेत्यांना निधी दिला जातो, त्यात कोणतीही काटकसर नाही : अब्दुल सत्तार

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.