Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sanjay Raut | संजय राऊतांना लीलावती रुग्णालयातून डिस्चार्ज, डॉक्टरांकडून आराम करण्याचा सल्ला

शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांना आज लीलावती रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. (Sanjay Raut discharge from Lilavati Hospital after angioplasty surgery) 

Sanjay Raut | संजय राऊतांना लीलावती रुग्णालयातून डिस्चार्ज, डॉक्टरांकडून आराम करण्याचा सल्ला
Follow us
| Updated on: Dec 05, 2020 | 12:19 PM

मुंबई : शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांना आज (5 डिसेंबर) लीलावती रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. डिस्चार्जनंतर पुढील दोन दिवस संजय राऊत घरीच आराम करणार आहेत. अवघ्या दोन दिवसांपूर्वीच संजय राऊत यांच्यावर अँजिओप्लास्टी शस्त्रक्रिया यशस्वीरित्या करण्यात आली होती. (Sanjay Raut discharge from Lilavati Hospital after angioplasty surgery)

मिळालेल्या माहितीनुसार, संजय राऊत यांना आज (5 डिसेंबर) लीलावती रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. सकाळी 11 च्या दरम्यान संजय राऊत लीलावती रुग्णालयातून घरी जाण्यासाठी निघाले. डॉक्टरांनी संजय राऊतांना यांना आराम करण्यास सांगितला आहे. त्यामुळे आज आणि उद्या दोन दिवस ते घरीच आराम करतील. यानंतर सोमवारपासून (8 डिसेंबर) ते शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामना ऑफिसला जातील, अशी प्राथमिक माहिती समोर येत आहे.

संजय राऊतांवर बुधवारी शस्त्रक्रिया

संजय राऊत यांच्यावर बुधवारी (2 डिसेंबर) लीलावती रुग्णालयात अँजिओप्लास्टी शस्त्रक्रिया पूर्ण झाली आहे. काही वेळापूर्वीच ही शस्त्रक्रिया पूर्ण झाली आहे. यावेळी दोन स्टेन त्यांच्या ह्रदयात टाकण्यात आले असल्याची माहिती डॉक्टरांकडून देण्यात आली आहे. खरतंर, गेल्यावर्षी नोव्हेंबर महिन्यात झालेल्या अँजिओप्लास्टीवेळी एकूण तीन स्टेन टाकण्यात आले होते. यातील एक स्टेन खराब झाल्यामुळे आता पुन्हा एकदा शस्त्रक्रिया करण्यात आली आहे.

डॉक्टरांनी तो स्टेन काढून त्याजागी नवा स्टेन टाकला आहे. अँजिओप्लास्टी शस्त्रक्रियेत एकूण 2 स्टेन टाकण्यात आले. डॉ. मॅथ्यू आणि डॉ अजित मेनन यांनी ही शस्त्रक्रिया केली. तर शस्त्रक्रियेनंतर संजय राऊत यांची प्रकृती स्थिर असल्याचंही डॉक्टरांनी सांगितलं आहे. तर सध्या ते ICU मध्ये आहेत. त्यांना दुपारी ICU तून नॉर्मल वॉर्डमध्ये आणण्यात येणार आहे.

गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात संजय राऊत यांच्यावर हृदयात दोन स्टेन घालण्यात आल्या होत्या. त्यानंतर आणखी स्टेन टाकावे लागणार होते. त्यासाठी एप्रिल 2020 ही नियोजित वेळ होती. पण कोव्हिड प्रादुर्भावामुळे ही शस्त्रक्रिया पुढे ढकलण्यात आली होती.

डॉ मॅथ्यू हे प्रसिद्ध हृदयविकार तज्ज्ञ आहेत. डॉ. अजित मेनन हे सुद्धा मुंबईस्थित हृदयविकार तज्ज्ञ आहेत. यापूर्वीही डॉ. मॅथ्यू आणि डॉ. मेनन यांनीच संजय राऊत यांच्यावर अँजिओप्लास्टी शस्त्रक्रिया केली होती.(Sanjay Raut discharge from Lilavati Hospital after angioplasty surgery)

संबंधित बातम्या :

संजय राऊतांची अँजिओप्लास्टी शस्त्रक्रिया पूर्ण, ह्रदयात बसवले दोन स्टेन

कुणाल कामराला अटक पूर्व जमीन मंजूर, मद्रास हाय कोर्टाचा दिलासा
कुणाल कामराला अटक पूर्व जमीन मंजूर, मद्रास हाय कोर्टाचा दिलासा.
केवळ दशक नाही, तर लोकांचं आयुष्य बदललंय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
केवळ दशक नाही, तर लोकांचं आयुष्य बदललंय - पंतप्रधान नरेंद्र मोदी.
बावनकुळे - राऊत यांच्यात जुंपली; वार पालटवाराचं शाब्दिक युद्धं
बावनकुळे - राऊत यांच्यात जुंपली; वार पालटवाराचं शाब्दिक युद्धं.
आमचं सरकार टॅक्सच्या पै पैचा सन्मान करतं - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आमचं सरकार टॅक्सच्या पै पैचा सन्मान करतं - पंतप्रधान नरेंद्र मोदी.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाच्या प्रगतीचा घेतला आढावा
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाच्या प्रगतीचा घेतला आढावा.
भारत जगातील एकमेव मेजर इकोनॉमी, मोदींनी देशाच्या प्रगतीचा घेतला आढावा
भारत जगातील एकमेव मेजर इकोनॉमी, मोदींनी देशाच्या प्रगतीचा घेतला आढावा.
न्यायालयाच्या आवारात कोरटकरवर शिव्यांची लाखोली
न्यायालयाच्या आवारात कोरटकरवर शिव्यांची लाखोली.
'तर हे कटाक्षाने पाळावं लागेल',ठाकरे गटाकडून 'तो' जुना व्हिडीओ व्हायरल
'तर हे कटाक्षाने पाळावं लागेल',ठाकरे गटाकडून 'तो' जुना व्हिडीओ व्हायरल.
३१ तारखेच्या आत पीक कर्ज भरा; अजितदादांच्या शेतकऱ्यांना सूचना
३१ तारखेच्या आत पीक कर्ज भरा; अजितदादांच्या शेतकऱ्यांना सूचना.
'आकाच्या सांगण्यावरून..',आरोपींच्या कबुलीनंतर धसांची पहिली प्रतिक्रिया
'आकाच्या सांगण्यावरून..',आरोपींच्या कबुलीनंतर धसांची पहिली प्रतिक्रिया.