दाटून कंठ येतो, ‘रोखठोक’ बाप लेकीच्या लग्नात हळवा, राहुल देशपांडेंच्या गाण्यानंतर राऊत बंधू भावूक

लग्नाआधी आयोजित संगीत कार्यक्रमात शास्त्रीय गायक राहुल देशपांडे यांनी गाणी सादर केली. यावेळी संजय राऊत, सुनिल राऊत आणि संदीप राऊत हे तिघेही भाऊ काहीसे भावूक झाले होते. रेनेसाँ या सप्ततारांकित हॉटेलमध्ये आयोजित कार्यक्रमाला राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांचं कुटुंबही हजर होतं.

दाटून कंठ येतो, 'रोखठोक' बाप लेकीच्या लग्नात हळवा, राहुल देशपांडेंच्या गाण्यानंतर राऊत बंधू भावूक
Purvashi Sanjay Raut
Follow us
| Updated on: Nov 28, 2021 | 10:00 AM

मुंबई : राजकीय मैदानात ‘रोखठोक’ भूमिका घेणारे शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) लेकीच्या लग्नावेळी हळवे झाल्याचं पाहायला मिळालं. हरहुन्नरी शास्त्रीय गायक राहुल देशपांडे (Rahul Deshpande) यांनी सूर लावला आणि संजय राऊत यांच्या डोळ्यासमोरुन लेकीचं बालपण तरळून गेलं असावं. कारण पूर्वशी राऊत (Purvashi Raut Wedding) यांच्या विवाहाच्या निमित्ताने आयोजित संगीत सोहळ्यात पिता संजय राऊत यांच्यासह दोन्ही काकाही भावूक झाल्याचं दिसलं.

कै. वसंतराव देशपांडे यांच्या आवाजातील ‘दाटून कंठ येतो, ओठांत येई गाणे, जा आपुल्या घरी तू, जा लाडके सुखाने’ हे अष्टविनायक चित्रपटातील गीत ऐकून अनेकांना अश्रू अनावर होतात. वसंतरावांचे नातू, शास्त्रीय गायक राहुल देशपांडे यांनीही संजय राऊत यांच्या लेकीच्या संगीत सोहळ्यात काही गाणी सादर करत उपस्थितांच्या काळजाला हात घातला.

राऊत बंधू भावनावश

संजय राऊत यांची कन्या पूर्वशी राऊत उद्या (सोमवार 29 नोव्हेंबर रोजी) विवाहबंधनात अडकणार आहेत. ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांचे चिरंजीव मल्हार यांच्याशी पूर्वशीचा विवाह होणार आहे लग्नाआधी आयोजित संगीत कार्यक्रमात शास्त्रीय गायक राहुल देशपांडे यांनी गाणी सादर केली. यावेळी संजय राऊत, सुनिल राऊत आणि संदीप राऊत हे तिघेही भाऊ काहीसे भावूक झाले होते. रेनेसाँ या सप्ततारांकित हॉटेलमध्ये आयोजित कार्यक्रमाला राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांचं कुटुंबही हजर होतं.

View this post on Instagram

A post shared by Supriya Sule (@supriyasule)

लेकीचे लाड पुरवण्यात बाप व्यस्त

सध्या राजकाणातील मुसद्दी नेता म्हणून ओळख असलेले राऊतही आपल्या लेकीचा हट्ट पुरवण्यात तिचा लाड करण्यात व्यस्त आहेत. ते आपल्या मुलीला आनंदाने मिठीत घेताना दिसत आहेत. त्यांच्या चेहऱ्यावरील हास्य अगदी स्पष्टपणे दिसत आहे. एवढंच नाही तर संजय राऊत आपल्या मुलीच्या चेहळ्यावरील हा आनंद आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात कैद करण्यात दंग झाले आहेत. लेक बसलेली असता कसलाही संकोच न बाळगता राऊत पूर्वशीचा फोटो काढत आहेत. लेकीचं हसू पाहून त्यांचही मन ओथंबल्याचं दिसतंय.

कोण आहेत संजय राऊतांचे व्याही?

ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांचे चिरंजीव मल्हार यांच्याशी राऊत यांची कन्या पूर्वशी यांचा विवाह होणार आहे. राऊत यांचे व्याही जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर हे अत्यंत अभ्यासू, मितभाषी आणि कर्तव्यदक्ष अधिकारी समजले जातात. राऊत हे राजकारणातील पॉवरफूल राजकारणी असले तरी त्यांचे व्याही नार्वेकरही धडाडीचे कर्तव्यदक्ष अधिकारी आहेत.

तर नार्वेकर यांचे चिरंजीव मल्हार हे आयटी इंजीनियर आहेत. तसेच त्यांचा स्वतंत्र व्यवसाय असल्याचं सूत्रांनी सांगितलं. तर, पूर्वशी राऊत या उच्चशिक्षित असून ‘ठाकरे’ चित्रपटाच्या निर्मात्या आहेत. सायन इथे त्यांचं ऑफिस आहे.

संबंधित बातम्या :

संजय राऊतांच्या घरी लगीनघाई ! लेकीचं हास्य टिपण्यासाठी ‘किंगमेकर’ बनला फोटोग्राफर

संजय राऊतांच्या घरी सनई-चौघडे, मुलगी पूर्वशीच्या लग्नाचं राज्यपाल कोश्यारींना निमंत्रण

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.