AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sanjay Raut: मोदीजी सुनो, अमित शहाजी सुनो, राणेंनी पवारांना दिलेल्या धमकीवर संजय राऊतांनी भाजपला घेरलं, महाराष्ट्राला उत्तर द्या

आज सकाळी गुवाहटीतील आमदारांची महत्त्वाची बैठक सुरु झाली आहे. महाराष्ट्रात येऊन शिवसेना पक्षावर दावा करण्यासंबंधी तसेच महाराष्ट्रात भाजपसोबत सत्ता स्थापन करण्यासंबंधी या बैठकीत महत्त्वाचा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे

Sanjay Raut: मोदीजी सुनो, अमित शहाजी सुनो, राणेंनी पवारांना दिलेल्या धमकीवर संजय राऊतांनी भाजपला घेरलं, महाराष्ट्राला उत्तर द्या
Sanjay RautImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Jun 24, 2022 | 10:11 AM

मुंबईः नारायण राणेंसारख्या (Narayan Rane) केंद्रिय मंत्र्यांनी शरद पवार (Sharad Pawar) यांना उघड धमकी देण्याइतपत महाराष्ट्रातील राजकारणात स्तर घसरला आहे. केंद्रातील भाजप नेतृत्वाने याकडे लक्ष द्यावं… शरद पवारांसारख्या ज्येष्ठ नेत्यांना धमकी देण्याएवढा यांचा माज गेलाय… या शब्दात शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी पंतप्रधान आणि अमित शहा यांना आवाहन केलं. एकनाथ शिंदे यांनी पुकारलेल्या बंडामुळे अवघी शिवसेना रिती झाली असताना भाजप नेत्यांनाही सोशल मीडियावरील पोस्टच्या माध्यमातून महाविकास आघाडीच्या नेत्यांवर निशाणा साधायला सुरुवात केली आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी ट्विटरच्या माध्यमातून थेट शरद पवार यांना धमकी दिली आहे. बंडखोर आमदारांच्या केसालाही धक्का लावल्यास घर गाठणं कठीण होईल, असं वक्तव्य राणेंनी केलं होतं. यावरूनच संजय राऊत यांनी भाजपच्या थेट केंद्रीय नेतृत्वाला आवाहन केलं. राणेंनी दिलेल्या या धमकीवर मोदी आणि अमित शहांना महाराष्ट्राला उत्तर द्यावच लागेल, असं राऊत म्हणाले.

नारायण राणेंचं ट्विट काय?

बंडखोर आमदारांनी आधी सभागृहात येऊन दाखवावं, असा इशारा राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी दिला होता. त्यावर प्रत्युत्तर देता नारायण राणे यांनी ट्विट केलं . त्या ते म्हणाले, माननीय शरद पवार साहेब, या सर्वांना धमक्या देत आहेत. ‘सभागृहात येऊन दाखवा..’ ते येणारच आहेत. ते येणार आणि त्यांच्या मनाप्रमाणे मतदान करणार. त्यांच्या केसालाही धक्का लावल्यास घर गाठणं कठीण होईल…

संजय राऊत काय म्हणाले?

राणेंच्या धमकीवरून बोलताना संजय राऊत म्हणाले, ‘शरद पवारांना धमक्या देईपर्यंत या लोकांचा माज आलाय. ही भाजपची संस्कृती आहे का? शरद पवार साहेबांना घरी जाऊ देणार नाही… अशी धमकी देणारा कुणी असेल तर त्याचा विचार मोदी आणि अमित शहांना करावा लागेल. या देशात लोकशाही आहे. स्वातंत्र्य आहे. शरद पवारांसारखे नेते, ज्यांचा आदर मोदीजी करतात. जे महाराष्ट्राचे सुपुत्र आहेत .अशा नेत्याविषयी फक्त सत्ता मिळवायची आहे. चोरीच्या मार्गाने… आम्हाला धमक्या द्या.. .समर्थ आहोत. … पण शरद पवारांच्या वयाचा अनुभवाचा.. तपस्येचा आदर नसेल तर आपण मराठी म्हणून घ्यायला नालायक आहोत….

गुवाहटीत काय घडामोड?

दरम्यान, आज सकाळी गुवाहटीतील आमदारांची महत्त्वाची बैठक सुरु झाली आहे. महाराष्ट्रात येऊन शिवसेना पक्षावर दावा करण्यासंबंधी तसेच महाराष्ट्रात भाजपसोबत सत्ता स्थापन करण्यासंबंधी या बैठकीत महत्त्वाचा निर्णय घेतला जाईल. पुढील काही तासात बैठकीतील तपशील समोर येतील. उद्धव ठाकरे सरकारसमोर एकनाथ शिंदे गट नवे काय प्रस्ताव ठेवेल, हेही काही वेळात समोर येण्याची शक्यता आहे.

भारत - पाकिस्तानच्या डिजीएमओची बैठक, काय होणार चर्चा?
भारत - पाकिस्तानच्या डिजीएमओची बैठक, काय होणार चर्चा?.
शेतकऱ्यांना दिलासा मिळणार! भारतात वेळेच्या आधीच पाऊस दाखल होणार
शेतकऱ्यांना दिलासा मिळणार! भारतात वेळेच्या आधीच पाऊस दाखल होणार.
जम्मू काश्मीर, जैसलमेर, अमृतसरमध्ये परिस्थिती पूर्वपदावर
जम्मू काश्मीर, जैसलमेर, अमृतसरमध्ये परिस्थिती पूर्वपदावर.
अटारी बॉर्डरवर तणावपूर्ण शांतता; अमृतसरमध्ये रेड अलर्ट कायम
अटारी बॉर्डरवर तणावपूर्ण शांतता; अमृतसरमध्ये रेड अलर्ट कायम.
काश्मीरवर तोडगा निघणार? डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं मोठं विधान
काश्मीरवर तोडगा निघणार? डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं मोठं विधान.
पाकच्या पंतप्रधानांचं ऐकण्यास मुल्ला मुनिरचा नकार
पाकच्या पंतप्रधानांचं ऐकण्यास मुल्ला मुनिरचा नकार.
अमेरिकाके पापाने वॉर रुकवा दिया क्या?, युद्धबंदीवर राऊतांची विखारी टीक
अमेरिकाके पापाने वॉर रुकवा दिया क्या?, युद्धबंदीवर राऊतांची विखारी टीक.
पाकिस्तान बॅकफूटवर, 5 वाजेपासून युद्धविराम, दोन्ही देशांकडून सहमती अन
पाकिस्तान बॅकफूटवर, 5 वाजेपासून युद्धविराम, दोन्ही देशांकडून सहमती अन.
भारत-पाक तणावादरम्यान मुंबईकरांसाठी मोठी बातमी, आता 9 जूनपर्यंत....
भारत-पाक तणावादरम्यान मुंबईकरांसाठी मोठी बातमी, आता 9 जूनपर्यंत.....
मोदी सरकारचा दहशतवादाविरुद्ध मोठा निर्णय, यापुढे तसं कृत्य युद्ध ठरेल
मोदी सरकारचा दहशतवादाविरुद्ध मोठा निर्णय, यापुढे तसं कृत्य युद्ध ठरेल.