महाराष्ट्र संतापला, खवळलेलाय, ‘बंद’ च्या भूमिकेवर संजय राऊत काय म्हणाले?

छत्रपतींचा अपमान हा महाराष्ट्रातील साडे अकरा कोटी जनतेचा अपमान आहे. या मातीचा अपमान आहे. त्यामुळे तो आम्ही सहन करणार नाहीत,असा इशारा संजय राऊत यांनी दिला आहे.

महाराष्ट्र संतापला, खवळलेलाय, 'बंद' च्या भूमिकेवर संजय राऊत काय म्हणाले?
Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Nov 28, 2022 | 11:26 AM

मुंबईः महाराष्ट्राची अस्मिता, महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज (Shivaji Maharaj) यांचा भाजपच्या (BJP) आराध्य दैवतांकडून ज्या पद्धतीने अपमान होतोय… त्यानंतर माफीदेखील मागण्यात येत नाहीये. याउलट आम्हालाच शहाणपण शिकवलं जातंय.. या प्रकारामुळे महाराष्ट्र संतापला आहे. खवळला आहे. याचा उद्रेक कधीही होऊ शकतो, असा इशारा संजय राऊत (Sanjay Raut) यांनी दिला आहे. राज्यपालांच्या वक्तव्याविरोधात सगळेच पक्ष एकत्र आले असून महाराष्ट्र बंदचा निर्णय कोणत्याही क्षणी होऊ शकतो. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे याविषयी महाविकास आघाडीच्या नेत्यांशी आज चर्चा करणार असल्याची महत्त्वाची माहिती शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिली आहे.

राज्यपालांचा निषेध करताना संजय राऊत म्हणाले, ‘ महाराष्ट्रात शिवाजी महाराजांचा अपमान झाल्यानंतरही हे सरकार मुठी आवळून उसळून निघत नाहीत? उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली जे पाऊलं उचलायची आहेत, ती लवकरच उचलत आहोत…

राज्यपालांविरोधात छत्रपती उदयनराजे यांनी घेतलेली भूमिका लोकभावना असल्याचं संजय राऊत म्हणाले. राज्यपालांचे जिथे जिथे कार्यक्रम होतील, ते आम्ही उधळून लावू, असं उदयनराजे म्हणाले होते.

नेहरूंनीही माफी मागितली होती..

महाराष्ट्राने अजून संयम राखला आहे. भाजपाकडून राज्यपाल आणि सुधांशू त्रिवेदी यांचा बचाव केला जातोय, असं कधी घडलं नव्हतं. पंडित नेहरूंकडून छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान झाला होता. त्यावेळी पंतप्रधान असतानाही त्यांनी माफी मागितली होती. मोरार्जी देसाई एवढे मोठे नेते होते. त्यांच्याकडूनही चुकीची विधानं झाली होती. त्यांनीही माफी मागितली होती.

‘पण भाजपाचे टगे…’

महान नेत्यांनी माफी मागितली होती, पण भाजपचे टगे शिवाजी महाराजांचा अपमान करून इतरांना शहाणपण शिकवतायत. त्यामुळे महाराष्ट्र संतापलेला आहे. आतून खवळलेला आहे. याचा उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही, असं वक्तव्य करत संजय राऊत यांनी शिंदे-भाजप सरकारला इशारा दिला आहे.

राज्यपालांविरोधात सगळेच पक्ष एकत्र आहेत. शिवसेना सगळ्यात पुढे असली तरी छत्रपतींचा अपमान हा महाराष्ट्रातील साडे अकरा कोटी जनतेचा अपमान आहे. या मातीचा अपमान आहे. त्यामुळे तो आम्ही सहन करणार नाहीत. या वक्तव्यावर सगळेच पक्ष एकत्र आहेत, असे संजय राऊत म्हणाले.

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.