राऊतांच्या सुरक्षेत वाढ करा, पण ठाणे महापालिकेच्या सहाय्यक आयुक्तांच्या सुरक्षेचं काय? मुनगंटीवारांचा खोचक सवाल
संजय राऊत यांच्या दिमतीला सहा शस्त्रधारी जवान देण्यात आले असून राऊत यांच्या घराला छावणीचं स्वरुपही आलं आहे. राऊतांना पुरवण्यात आलेल्या सुरक्षा व्यवस्थेवरुन भाजप नेत्यांनी जोरदार टीका केलीय. राऊतांच्या सुरक्षेत जरुर वाढ करा, पण ठाणे महापालिकेच्या सहाय्यक आयुक्तांच्या सुरक्षेचं काय? असा सवाल भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी केलाय.
मुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणेंसोबत झालेला शाब्दिक वाद, त्यानंतर भाजप नेते निलेश राणे यांनी करेक्ट कार्यक्रम करण्याची दिलेली धमकी या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांच्य सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. संजय राऊत यांच्या दिमतीला सहा शस्त्रधारी जवान देण्यात आले असून राऊत यांच्या घराला छावणीचं स्वरुपही आलं आहे. राऊतांना पुरवण्यात आलेल्या सुरक्षा व्यवस्थेवरुन भाजप नेत्यांनी जोरदार टीका केलीय. राऊतांच्या सुरक्षेत जरुर वाढ करा, पण ठाणे महापालिकेच्या सहाय्यक आयुक्तांच्या सुरक्षेचं काय? असा सवाल भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी केलाय. (ShivSena MP Sanjay Raut’s security has been beefed up, Criticism of BJP leader Sudhir Mungantiwar)
संजय राऊत यांना दहशतवाद्यांकडून धोका असेल तर त्यांच्या सुरक्षेत जरुर वाढ करावी. 10 गाड्या पुढे आणि 10 गाड्या मागे ठेवा. पण ठाणे महापालिकेच्या सहाय्यक आयुक्तांच्या सुरक्षेचं काय? महिला आज सुरक्षित नाहीत. त्याचं उत्तर सरकारनं आधी द्यावं, अशी टीका मुनगंटीवार यांनी केलीय. तसंच राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी जर चहापानासाठी किंवा चाय पे चर्चा करण्यासाठी बोलावलं असेल तर जरुर जावं. पण फक्त 12 आमदारांच्या नियुक्तीच्या मुद्द्यावर ते राज्यपालांच्या भेटीला जात असतील तर ते दुर्दैवी आहे. कारण महाराष्ट्रात एमपीएससीची पद रिक्त आहेत. आरोग्य सेवकांची पदं रिक्त आहे. त्या संदर्भातही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपालांची भेट घ्यायला हवी, असा टोलाही मुनगंटीवार यांनी लगावलाय.
आशिष शेलारांचाही राऊतांना टोला
आशिष शेलार यांनी आज वांद्रे येथे पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांना संजय राऊत यांच्या सुरक्षेवरून प्रश्न विचारण्यात आला. त्याला उत्तर देताना शेलार यांनी हा टोला लगावला. संजय राऊत यांची सुरक्षा वाढवण्यात आली आहे चांगले आहे. ते नेते आहेत, संपादक आहेत. नेहमी पुढे बोलताना दिसतात. त्यामुळे पक्ष कोण चालवतो हेही दिसतंय. बहुतेक त्यामुळेच त्यांना बाहेरून नाही तर अंतर्गत धोका असावा म्हणून त्यांची सुरक्षा वाढवण्यात आली असावी, असा टोला शेलार यांनी लगावला.
अशी असेल राऊतांची सुरक्षा
डीसीपी प्रशांत कदम संजय राऊत यांच्या भेटीसाठी पोहोचले. यावेळी कदम यांनी राऊत यांच्याशी सुरक्षेबाबत चर्चा केली. तसेच कदम यांनी राऊत यांना सुरक्षेच्या अनुषंगाने काही सूचना दिल्याचं सूत्रांनी सांगितलं. आता राऊत यांच्या ताफ्यात दोन अतिरिक्त एसपीयूचे जवान तैनात करण्यात आले आहेत. त्यांना स्पेशल प्रोटेक्शन युनिटच्या एकूण 6 शस्त्रधारी जवानांची सुरक्षा देण्यात आली आहे. या शिवाय 12 पोलीस जवानांसहीत साध्या वर्दीतील पोलिसांचा समावेशही त्यांच्या सुरक्षेत करण्यात आला आहे. राऊत यांना सध्या वाय दर्जाची सुरक्षा देण्यात आली आहे.
सुनील राऊत यांच्या सुरक्षेत वाढ
राणे-राऊत वादा दरम्यान निलेश राणे यांनी दिसेल तिथे करेक्ट कार्यक्रम करण्याची दिली होती धमकी. त्यामुळे राऊत यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. संजय राऊत यांचे बंधू आणि शिवसेना आमदार सुनिल राऊत यांच्याही सुरक्षेत करण्यात येणार आहे. झोन-7 चे डीसीपी प्रशांत कदम आणि सुनील राऊत यांच्यात सुरक्षेच्या मुद्द्यावर बैठक सुरू असून त्यांची सुरक्षाही वाढवली जाणार आहे.
इतर बातम्या :
राज्यपालांचा ठाकरे सरकारच्या 12 नावांवर काही आक्षेप आहे का? अजित पवारांचं भेटीनंतर पहिलं उत्तर
‘राज्याच्या राजकारणात पाठीत खंजीर खुपसणारा दुसरा चेहरा’, चंद्रकांत पाटलांचा उद्धव ठाकरेंवर घणाघात