AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मला मारण्यासाठी दोन कोटींची सुपारी, माझ्या जीवाला धोका, शिवसेनेचे खासदार संजय जाधवांची पोलिसात तक्रार

याप्रकरणी अद्याप कोणताही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. (Shiv Sena MP Sanjay Jadhav Filed Complaint after life threat)

मला मारण्यासाठी दोन कोटींची सुपारी, माझ्या जीवाला धोका, शिवसेनेचे खासदार संजय जाधवांची पोलिसात तक्रार
| Updated on: Oct 28, 2020 | 8:44 AM
Share

परभणी : परभणी लोकसभा मतदारसंघाचे शिवसेना खासदार बंडू उर्फ संजय जाधव यांनी जीवाला धोका असल्याची तक्रार दाखल केली आहे. रात्री उशिरा स्वत: नानलपेठ पोलीस स्टेशनमध्ये या प्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली आहे. दरम्यान याप्रकरणी अद्याप कोणताही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. (Shiv Sena MP Sanjay Jadhav Filed Complaint after life threat)

“मला मारण्यासाठी परभणीतून दोन कोटी रुपयांची सुपारी देण्यात आली आहे. नांदेडमधील एका मोठ्या टोळीने हा कट रचल्याची शक्यता खासदार संजय जाधव यांनी तक्रार अर्जात केली आहे. याप्रकरणी रात्री उशिरा त्यांनी तक्रार दाखल केली आहे.

“मला जीवे मारण्याची सुपारी देणारा व्यक्ती हा परभणीतील असावा” असा आरोप खासदार संजय जाधव यांनी केला आहे. माझ्या एका विश्वासू व्यक्तीने मला ही माहिती दिली आहे, असेही संजय जाधव यांनी पोलिसात तक्रार करताना सांगितले.

या घटनेचं गांभीर्य लक्षात घेता नानलपेठ पोलिसांनी तपासाला सुरुवात केली आहे. मात्र अद्याप याप्रकरणी कोणताही गुन्हा दाखल करण्यात आला नसल्याची माहिती पोलीस निरीक्षक कुंदनकुमार वाघमारे यांनी दिली आहे. दरम्यान खासदारांच्या जीवावर उठलेला हा व्यक्ती नेमका कोण? असा सवाल या निमित्ताने उपस्थित होऊ लागला आहे.

हेही वाचा – राष्ट्रवादीकडून गळचेपी, शिवसेनेचे खासदार संजय जाधव यांचा राजीनामा

दरम्यान काही दिवसांपूर्वी संजय जाधव यांनी नाराजीतून शिवसेना पक्षप्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे खासदारकीचा राजीनामा पाठवला होता. परभणीत स्थानिक पातळीवर राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या नेत्यांमध्ये मतभेद आहेत. राष्ट्रवादीकडून गळचेपी होत असल्याचा आरोप करत संजय जाधव यांनी खासदारकीचा राजीनामा दिला होता. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी संजय जाधव यांना फोन करुन त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला आहे.

जिंतूर कृषी उत्पन्न बाजार समितीत शिवसेनेचे अशासकीय प्रशासक मंडळ नियुक्त करण्यासाठी शिवसेनेचे खासदार संजय जाधव यांनी प्रचंड प्रयत्न केले. मात्र, बाजार समितीत पुन्हा राष्ट्रवादीचं अशासकीय प्रशासक मंडळ नियुक्त करण्यात आल्याने शिवसैनिकांवर अन्याय झाल्याची भावना खासदार संजय जाधव यांनी व्यक्त केली आहे. याबाबत वेळोवेळी मुख्यमंत्र्यांसोबत बोलूनही शिवसेनेचं प्रशासक मंडळ नियुक्त न झाल्याने खासदार जाधव नाराज झाले. यातूनच त्यांनी खासदारकीचा राजीनामा उद्धव ठाकरे यांच्याकडे पाठवले. यावेळी त्यांनी मुख्यमंत्र्यांना पत्रही पाठवले. या पत्रात त्यांनी आपल्या व्यथा मांडल्या.

कोण आहेत संजय उर्फ बंडू जाधव?

  • बंडू जाधव हे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आहेत.
  • परभणी विधानसभा मतदारसंघातून ते 2009 ते 2014 दरम्यान आमदार म्हणून निवडून आले होते.
  • 2014 मध्ये परभणी लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीचे उमेदवार विजय भांबळे यांचा पराभव केला होता.
  • या निवडणुकीत जाधव यांना 5 लाख 78 हजार 455 मते मिळाली होती.
  • केंद्र सरकारच्या स्थायी समिती आणि कृषी मंत्रालयाच्या समितीवर सदस्य म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

(ShivSena MP Sanjay Jadhav Filed Complaint after life threat)

संबंधित बातम्या : 

खा. संजय जाधवांनी राजीनामा दिलाच नाही, तर मागे घेण्याचा विषयच नाही : एकनाथ शिंदे

राष्ट्रवादी विरोधात ‘नाराजी’नामा, जाहीर खटके उडाल्याने खदखद बाहेर?

‘जिंतूर बाजार समितीचा प्रश्न मोठा नाही’, उद्धव ठाकरेंचा संजय जाधव यांना फोन, राजीनामा मागे घेण्याची सूचना

दादांची राष्ट्रवादी, शरद पवारांसोबत लढण्यास इच्छुक!
दादांची राष्ट्रवादी, शरद पवारांसोबत लढण्यास इच्छुक!.
नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!
नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!.
अटक वॉरंट पोलिसांच्या हाती! माणिकराव कोकाटेंना कधी होणार अटक?
अटक वॉरंट पोलिसांच्या हाती! माणिकराव कोकाटेंना कधी होणार अटक?.
कोकाटे प्रकरणी दानवेंची सरकारवर घटनेचा अनादर केल्याची टीका!
कोकाटे प्रकरणी दानवेंची सरकारवर घटनेचा अनादर केल्याची टीका!.
कोकाटेंना जामीन मिळवण्यासाठी आता कायदेशीर लढाई, वकिलांकडून मोठी अपडेट
कोकाटेंना जामीन मिळवण्यासाठी आता कायदेशीर लढाई, वकिलांकडून मोठी अपडेट.
कराड जामीन प्रकरणाच्या सुनावणीत काय-काय घडलं? वकिलांनी सारं सांगितलं
कराड जामीन प्रकरणाच्या सुनावणीत काय-काय घडलं? वकिलांनी सारं सांगितलं.
कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक, आमदारकी जाणार, कोणत्या प्रकरणी शिक्षा?
कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक, आमदारकी जाणार, कोणत्या प्रकरणी शिक्षा?.
माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी, विरोधकांची मागणी काय?
माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी, विरोधकांची मागणी काय?.
मुंडेंची दिल्लीवारी, शहांची भेट, कोकाटेंच्या प्रकरणानंतर पुन्हा संधी?
मुंडेंची दिल्लीवारी, शहांची भेट, कोकाटेंच्या प्रकरणानंतर पुन्हा संधी?.
सना मलिकांकडून वडील मलिकांची पाठराखण, NCP महायुतीत सामील होणार की..?
सना मलिकांकडून वडील मलिकांची पाठराखण, NCP महायुतीत सामील होणार की..?.