AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

चंद्रकांत पाटलांशी फक्त सदिच्छा भेट, शिवसेना जिल्हाप्रमुखांनी ‘गुप्त भेटी’च्या चर्चा धुडकावल्या

"मी नाराज असल्याची चर्चा चुकीची आहे. आम्ही शिवसेनेत वरिष्ठांच्या आदेशावर काम करतो" असंही आनंद पवार यांनी सांगितलं.

चंद्रकांत पाटलांशी फक्त सदिच्छा भेट, शिवसेना जिल्हाप्रमुखांनी 'गुप्त भेटी'च्या चर्चा धुडकावल्या
| Updated on: Nov 18, 2020 | 3:06 PM
Share

सांगली : भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी फक्त सदिच्छा भेट दिली, त्यावेळी कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही, असं स्पष्टीकरण शिवसेनेचे सांगली जिल्हाप्रमुख आनंद पवार यांनी दिले आहे. चंद्रकांतदादा सांगलीतील शिवसेना कार्यालयात गेल्यानंतर गुप्त बैठक झाल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. (Shivsena Sangli District Chief denies political talk with Chandrakant Patil)

“सर्व शिवसैनिक हे महाविकास आघाडीचे उमेदवार अरुण अण्णा लाड यांचाच प्रचार करणार आहेत. शिवाय इस्लामपूर नगरपालिकेमध्ये राष्ट्रवादी सोडून सर्वपक्षीय आघाडीची सता आहे, त्यामुळे तिथे भाजप आणि शिवसेना युती आहे असं म्हणता येणार नाही” असं आनंद पवारांनी स्पष्ट केलं. “मी नाराज असल्याची चर्चा चुकीची आहे. आम्ही शिवसेनेत वरिष्ठांच्या आदेशावर काम करतो” असंही आनंद पवार यांनी सांगितलं.

पुणे पदवीधर मतदारसंघ निवडणुकीच्या रिंगणात भाजपकडून जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष संग्राम देशमुख (Sangram Deshmukh) उतरले आहेत. त्यामुळे सांगली जिल्ह्यात राष्ट्रवादीच्या विरोधात चंद्रकांत पाटील यांनी पुढाकार घेत आनंदराव पवार यांच्याशी शिवसेना कार्यालयात गुप्तपणे चर्चा केल्याचं बोललं जात होतं.

सांगली जिल्ह्यामध्ये पदवीधरचे 84 हजार 191 मतदार आहेत. त्यामुळे चंद्रकांतदादांनी सांगली जिल्ह्यातून मोट बांधण्याचे ठरवले आहे. चंद्रकांत पाटील यांनी याआधी सदाभाऊ खोत यांची तलवार म्यान केली होती.

पुण्यात मुख्य लढत कोणामध्ये?

विधान परिषदेच्या पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातील लढतीचे चित्र स्पष्ट झाले आहे. पुणे पदवीधरसाठी 62 तर शिक्षकसाठी 35 उमेदवार रिंगणात आहेत. पुणे पदवीधर मतदारसंघातून 62 उमेदवार रिंगणात असले तरी प्रमुख लढत राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार अरुण लाड आणि भाजपचे संग्राम देशमुख यांच्यामध्ये होणार आहे. विशेष बाब म्हणजे दोघेही सांगली जिल्ह्यातील आहेत.

(Shivsena Sangli District Chief denies political talk with Chandrakant Patil)

पुणे पदवीधर प्रमुख उमेदवार

अरुण लाड (राष्ट्रवादी काँग्रेस) संग्राम देशमुख (भाजप) रुपाली पाटील (मनसे) शरद पाटील (जनता दल) सोमनाथ साळुंखे (वंचित बहुजन आघाडी) श्रीमंत कोकाटे (इतिहास संशोधक) डॉ. अमोल पवार (आम आदमी पक्ष) अभिजित बिचुकले (अपक्ष)

संबंधित बातम्या :

पुणे पदवीधर मतदारसंघासाठी चंद्रकांतदादा मैदानात, सांगलीत चक्क शिवसेना जिल्हाप्रमुखाशी गुप्त चर्चा

पुणे पदवीधरचे चित्र स्पष्ट, राष्ट्रवादीचे अरुण लाड आणि भाजपचे संग्राम देशमुख यांच्यात मुख्य लढत

पुणे पदवीधर निवडणुकीतून ‘रयत’ची माघार, तर खोतांचा सन्मान राखण्याची चंद्रकांत पाटलांची ग्वाही

(Shivsena Sangli District Chief denies political talk with Chandrakant Patil)

INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!
INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!.
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न.
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी.
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण.
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर.
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी.
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान.
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.