राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्यावर संजय राऊत म्हणतात….

योध्येत एवढा मोठा लढा झालाय. त्यामुळे प्रत्येकानेच तिथे गेले पाहिजे. |Sanjay Raut

राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्यावर संजय राऊत म्हणतात....
अयोध्येत एवढा मोठा लढा झालाय. त्यामुळे प्रत्येकानेच तिथे गेले पाहिजे. किंबहुना महाराष्ट्रातील सर्वचे नेत्यांनी अयोध्येत जायला पाहिजे.
Follow us
| Updated on: Jan 30, 2021 | 5:20 PM

मुंबई: मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या अयोध्या दौऱ्याची घोषणा झाल्यानंतर आता महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळात त्याचे पडसाद उमटत आहेत. या पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांना प्रतिक्रिया विचारण्यात आली असता त्यांनी सावध प्रतिक्रिया दिली. अयोध्याला जाण्याची कोणाची इच्छा असेल त्यांनी जायला हवे, असे राऊत यांनी म्हटले. (MNS Chief Raj Thackeray will visit Ayodya soon)

संजय राऊत यांनी शनिवारी मुंबईत ‘टीव्ही 9 मराठी’शी संवाद साधला. यावेळी त्यांनी म्हटले की, अयोध्येत एवढा मोठा लढा झालाय. त्यामुळे प्रत्येकानेच तिथे गेले पाहिजे. किंबहुना महाराष्ट्रातील सर्वचे नेत्यांनी अयोध्येत जायला पाहिजे. यापासून अनेकांना प्रेरणा मिळते. त्यामुळे फक्त अयोध्याच नव्हे तर सर्व देवस्थानांना भेटी दिल्या पाहिजेत, असे संजय राऊत यांनी सांगितले.

संजय राऊत सिंघू सीमेवर जाऊन शेतकऱ्यांना भेटण्याच्या तयारीत

प्रजासत्ताक दिनी दिल्लीत उसळलेल्या रोषानंतर आता दिल्लीतील शेतकरी आंदोलन निर्णायक टप्प्यावर येऊन पोहोचले आहे. अशातच आता शिवसेना या आंदोलकांना पाठिंबा देण्यासाठी पुढे सरसावण्याची शक्यता आहे. त्यासाठी शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) सिंघू सीमेवर जाऊन शेतकऱ्यांना भेटण्याच्या तयारीत आहेत. (PM Narendra Modi should take initiative to talk with farmers)

मी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि दिल्लीतील नेत्यांशी चर्चा केली आहे. या चर्चेवेळी शिवसेनेने शेतकऱ्यांना भेटून त्यांच्यापर्यंत आपल्या भावना पोहोचवणे गरजेचे असल्याचा मतप्रवाह समोर आला. त्यामुळे मी सोमवारी दिल्लीत गेल्यानंतर सिंघू सीमेवर शेतकऱ्यांना भेटण्याचा विचार करत आहे, असे संजय राऊत यांनी सांगितले.

फक्त अयोध्येतच का जाता, हिंदू धर्मात चारधाम आहेत, तिकडेही जा: नवाब मलिक

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याच्या घोषणेनंतर महाराष्ट्रातील राजकारण तापण्यास सुरुवात झाली आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक (Nawab Malik) यांनी देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला आहे. नुसतं एका ठिकाणी जाऊन चालत नाही, हिंदू धर्मात चारधाम आहेत. त्यामुळे लोकांनी केवळ अयोध्येत जाण्याऐवजी बद्रीनाथ किंवा पशुपतीनाथ येथेही जावे, असे नवाब मलिक यांनी म्हटले होते.

संबंधित बातम्या:

राज ठाकरे एका गोष्टीवर ठाम नसतात, सतत भूमिका बदलतात; अयोध्या दौऱ्यावरुन काँग्रेसचे टीकास्त्र

राज ठाकरेंपाठोपाठ देवेंद्र फडणवीस यांचीही घोषणा, अयोध्येला जाणार!

फक्त अयोध्येतच का जाता, हिंदू धर्मात चारधाम आहेत, तिकडेही जा: नवाब मलिक

(MNS Chief Raj Thackeray will visit Ayodya soon)

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.