महाराष्ट्रात मोठ्या घडामोडी, मातोश्रीबाहेर समर्थक एकवटले, शिवसैनिक रस्त्यावर, बैठकांचं सत्र, वाचा TV9 Updates!

एकनाथ शिंदे यांच्या गटाला शिवसेना आणि धनुष्यबाण चिन्ह देण्यात आले. या निर्णयाचा आनंद म्हणून नाशिकमध्ये एकनाथ शिंदे गटाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी प्रसिद्ध आणि ऐतिहासिक अशा काळाराम मंदिरात महाआरती केली.

महाराष्ट्रात मोठ्या घडामोडी, मातोश्रीबाहेर समर्थक एकवटले, शिवसैनिक रस्त्यावर, बैठकांचं सत्र, वाचा TV9 Updates!
Image Credit source: social media
Follow us
| Updated on: Feb 18, 2023 | 2:05 PM

मुंबईः शिवसेना (Shivsena) पक्ष आणि चिन्ह यापुढे एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्याकडे जाणार, या निवडणूक आयोगाच्या (Election commission) निर्णयानंतर महाराष्ट्रातील शिवसैनिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. ठाकरे गटाचे समर्थक शिवसैनिक आज राज्यभरात अनेक ठिकाणी रस्त्यावर उतरून निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात निषेध व्यक्त करत आहेत. तर उद्धव ठाकरे यांची पुढील लढाई कशी असेल यासाठी मातोश्रीवर एक महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. निवडणूक आयोगाविरोधात शिवसेना सुप्रीम कोर्टात दाद मागण्याची शक्यता आहे. शिवसेना पक्ष गमावल्यानंतर उभ्या राहणाऱ्या आव्हानांवर या बैठकीत महत्त्वाची रणनीती ठरण्याची शक्यता आहे.आयोगाच्या निर्णयानंतर शिंदे गटाची ताकद वाढणार हे निश्चित आहे. तर उद्धव ठाकरे या आव्हानांना कसे तोंड देतात, याकडे जनतेचं लक्ष आहे. राज्यात सुरु असलेल्या घडामोडीचे टॉप 9 Updates पुढीलप्रमाणे-

  1. मातोश्रीवर महत्त्वाची बैठकः निवडणूक आयोगाचा निर्णय काहीही असला तरी शिवसेना आमचीच असे एकिकडे ठाकरे गटाचे नेते म्हणत आहेत. तर दुसरीकडे कायदेशीर लढाईची जोरदार तयारीही सुरु आहे. याच मुद्द्यावरून मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत महत्त्वाची बैठक मातोश्रीवर सुरु आहे. संजय राऊत सध्या कोकणदौऱ्यावर असल्याने ते या बैठकीला हजर नाहीत. शिवसेनेचे महत्त्वाचे आमदार, खासदार आणि नेते या बैठकीत उपस्थित आहेत.
  2.  शिवसेना पक्ष कुणाचा यावरून काल निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे यांच्या बाजूने निर्णय दिल्यानंतर आज आणखी एक महत्त्वाच्या सूचना जारी करण्यात आल्या आहेत. ठाकरे गटाला मिळालेलं उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नाव आणि मशाल हे चिन्ह फक्त कसबा आणि चिंचवड पोट निवडणुकीपुरतंच वापरता येईल, अशा सूचना आयोगाने दिल्या आहेत. उद्धव ठाकरे यांचं टेंशन वाढवणारी ही आजची महत्त्वाची बातमी आहे.
  3.  ज्या राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना पदावरून हटवण्यासाठी शिवसेनेनं आंदोलन छेडलं होतं, त्या कोश्यारी यांच्या निरोपानंतर आज महाराष्ट्राला नवे राज्यपाल मिळाले आहेत. राज्यपाल रमेश बैस यांचा आज राजभवनात शपथविधी पार पडला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उपस्थिती होती.

  1.  मातोश्रीवर उद्धव ठाकरे आणि नेत्यांची महत्त्वाची बैठक सुरु असतानाच मातोश्रीच्या बाहेर मुंबई आणि मुंबई बाहेरून येणाऱ्या शिवसैनिकांची गर्दी उसळली आहे. काहीही झालं तर ठाकरे यांच्या पाठिशी आम्ही उभे राहणार, अशा घोषणा ठाकरे समर्थक देत आहेत.
  2.  शिवसेना नाव आणि चिन्हाचा निर्णय काल निवडणूक आयोगाने दिल्यानंतर मुंबईत शिवसैनिकांकडून बॅनरबाजी करण्यात आली आहे. शिवसेना भवनाखालीच एक बॅनर लावण्यात आलं. निर्णय काहीही असो आम्ही शिवसैनिक कायम मातोश्री आणि ठाकरे परिवारासोबत एकनिष्ठ असणार, असे ठणकावून सांगण्यात आलंय.
  3.  शिर्डीत शिवसैनिकांचा निर्धार- शिर्डीतील शिवसैनिकांनी साईमंदिरासमोर स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंची शपथ घेतली. उध्दव ठाकरेंच्या पाठीशी खुद्दार शिवसैनिक निष्ठेने उभा असून उद्धवजींची साथ शेवटच्या श्वासापर्यंत सोडणार नाही,असा निर्धार व्यक्त करण्यात आला. निवडणूक आयोगाच्या निर्णयाचा विरोध करत शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी केली. आगामी निवडणुकांमध्ये गद्दारांना धडा शिकवणार असा निर्धारदेखील व्यक्त केला.
  4.  धुळ्यात बॅनरबाजी- धुळ्यात उद्धव ठाकरे यांच्या समर्थनार्थ बॅनर बाजी करत निवडणूक आयोगाच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात शिवसैनिकांनी घोषणाबाजी केली. ठाकरे आमचा पक्ष आणि बाळासाहेब ठाकरे आमची निशाणी असं म्हणत बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या समर्थनार्थ शिवसैनिकांनी जोरदार घोषणा दिल्या.
  5.  नाशिकमध्ये महाआरती- केंद्रीय निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयानुसार एकनाथ शिंदे यांच्या गटाला शिवसेना आणि धनुष्यबाण चिन्ह देण्यात आले. या निर्णयाचा आनंद म्हणून नाशिकमध्ये एकनाथ शिंदे गटाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी प्रसिद्ध आणि ऐतिहासिक अशा काळाराम मंदिरात महाआरती केली. यावेळी खासदार हेमंत गोडसे, जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते, महानगर प्रमुख प्रवीण तिदमे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.
  6.  कोल्हापुरात केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयावर विरोधात ठाकरे गटाची निदर्शनं पहायला मिळाली. कोल्हापुरातील बिंदू चौकात ठाकरे गटाचं आंदोलन झालं. या आंदोलनात ठाकरे गटाचे पदाधिकारी कार्यकर्ते सहभागी होते. भाजप आणि शिंदे गटाविरोधात जोरदार घोषणाबाजी यावेळी करण्यात आली.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.