“बहीण सुरक्षित असेल तर लाडकी बहीण योजना आणता येतात…”, उद्धव ठाकरेंचा शिंदे सरकारला टोला

बहीण सुरक्षित असेल तर लाडकी बहीण योजना आणता येतात, असा टोला उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना लगावला.

बहीण सुरक्षित असेल तर लाडकी बहीण योजना आणता येतात..., उद्धव ठाकरेंचा शिंदे सरकारला टोला
Follow us
| Updated on: Aug 22, 2024 | 1:06 PM

Uddhav Thackeray On Badlapur School Rape Case : बदलापुरातील शाळेत शिकणाऱ्या दोन चिमुकल्यांवर लैंगिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रात उमटताना दिसत आहेत. आता याप्रकरणी माजी मुख्यमंत्री आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेंनी पहिली प्रतिक्रिया दिली. “सुरक्षित बहीण ही प्राथमिकता असली पाहिजे. बहीण सुरक्षित असेल तर लाडकी बहीण योजना आणता येतात”, असा टोला उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना लगावला.

शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी नुकतंच एक पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी बदलापूर घटनेबद्दल भाष्य केले. तसेच या प्रकरणावरुन राज्य सरकारवर जोरदार निशाणा साधला. “राज्यातील कानाकोपऱ्यात वातावरण झालं पाहिजे की कुणीही असं दुष्कृत्य करायला धजावला नाही पाहिजे. कोणी केलं तर त्याला ताबडतोब शिक्षा होते, ही भीती त्याच्या मनात व्हावी म्हणून हा बंद करत आहोत”, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

“बहीण सुरक्षित असेल तर…”

“कोरोना व्हारसशी लढलो, तसा हा विकृतीचा व्हायरस आहे,. राज्यातील कानाकोपऱ्यात वातावरण झालं पाहिजे की कुणीही असं दुष्कृत्य करायला धजावला नाही पाहिजे. कोणी केलं तर त्याला ताबडतोब शिक्षा होते, ही भीती त्याच्या मनात व्हावी म्हणून हा बंद करत आहोत. त्यामागे राजकारण नाहीये. सुरक्षित बहीण ही प्राथमिकता असली पाहिजे. बहीण सुरक्षित असेल तर लाडकी बहीण योजना आणता येतात”, असे उद्धव ठाकरेंनी म्हटले.

“हा संप राजकीय नाही”

“२४ ऑगस्टला जातपात धर्म, पक्ष भेद बाजूला ठेवून बंदमध्ये या. मुलगी ही मुलगी असते. आपल्या राज्यात मुलींना शिक्षणाची मोफत शिक्षणाची सोय आहे. पण ती सुरक्षित नसेल तर उपयोग काय. उठो द्रोपदी शस्त्र उठालो, अब गोविंद न आयेंगे… ही कविता आहे. आजच्या परिस्थितीवर चपखल बसणारी कविता आहे. पण जी मुलगी कडेवर जाण्याच्या वयातील आहे, तिच्यावर अत्याचार होत असेल तर ती लढणार कसे. ही मुलं घाबरून गप्प बसतात. पण त्यांच्यावरील अत्याचारावर पोलीस ढिम्म बसत असतील तर करायचे काय. परवापासून जे सुरू आहे. तो जनतेचा उद्वेग आहे. हा संप राजकीय नाही. तर माता भगिनींच्या रक्षणासाठी आपण जागरूक आहोत हे दाखवण्यासाठी बंद आहे. स्वतहून पुढे या आणि बंद करा”, असेही आवाहन उद्धव ठाकरेंनी केले.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.