नितीशकुमार, चंद्राबाबू हे काय हिंदुत्ववादी आहेत काय?; उद्धव ठाकरे यांचा अमित शाह यांना सवाल

. राम मंदिर गळत आहे. पेपर लिक होत आहे. त्याचा हिशोब द्या. मग काँग्रेसला विचारा. हे गळती सरकार आहे. आम्ही यांना पाठिंबा दिला होता. हे आमचं पाप होतं, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

नितीशकुमार, चंद्राबाबू हे काय हिंदुत्ववादी आहेत काय?; उद्धव ठाकरे यांचा अमित शाह यांना सवाल
Follow us
| Updated on: Aug 03, 2024 | 3:50 PM

Uddhav Thackeray on Loksabha election 2024 : लोकसभा निवडणुकीत भाजपला स्वबळावर बहुमत गाठता आले नाही. त्यामुळे चंद्राबाबू नायडू यांचा तेलुगू देसम पक्ष आणि नितीश कुमार यांच्या जनता दल युनायटेड यांच्या मदतीने भाजपने बहुमताचा आकडा पार केला. आता या मुद्द्यावरुन शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेंनी जोरदार निशाणा लगावला. नितीशकुमार, चंद्राबाबू हे काय हिंदुत्ववादी आहेत का? असा प्रश्न उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला.

संसद गळत आहे. ज्याने संसद बांधली. तोच या नदीवर काम करत आहेत. कंत्राटदार माझा लाडका सुरू आहे. तोही गुजरातचा आहे. वर्षही झालं नाही संसद बांधून. ती गळायला लागली. मोदी काँग्रेसकडे ७० वर्षाचा हिशोब मागत आहेत. ७० वर्षात काय केलं. तुमने क्या किया विचारत आहात. ते काय विचारता. तुम्ही १२ महिन्यापूर्वी बांधललेली संसद गळत आहे. राम मंदिर गळत आहे. पेपर लिक होत आहे. त्याचा हिशोब द्या. मग काँग्रेसला विचारा. हे गळती सरकार आहे. आम्ही यांना पाठिंबा दिला होता. हे आमचं पाप होतं, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

अब्दालीचा राजकीय वंशज अमित शाह

सगळीकडे खड्डे आहेत. गडकरी म्हणत होते असे रस्ते बांधीन की दोनशे वर्ष खड्डाच पडणार नाही. मुंबई गोवा मार्ग बघा. सगळीकडे खड्डेच खड्डे आहेत. त्याचे फोटो काढा आणि त्यांना खड्डा पुरुष पुरस्कार द्या, टरबूज जाऊ द्या हो. त्याला खड्ड्यात घाला. शाहिस्तेखान हुशार होता. त्याचं बोटावर निभावलं. पुन्हा महाराष्ट्रात आला नाही. हे परत आले. त्यांनी शहाणपण घेतला नाही. महाराष्ट्राने जे फटके दिले त्याचे वळ कुठे कुठे उठले ते पाहण्यासाठी आले होते. त्यांचे मोहरके आले,. अहमद शहा अब्दालीचा राजकीय वंशज अमित शाह आला होता. तोही शाहच होता. तो अहमद शाह होता हा अमित शाह आहे. तो वळवळायला आला होता, असे उद्धव ठाकरेंनी म्हटले.

तुम्ही विश्वासघात केला

आम्हाला हिंदुत्व शिकवता. तुम्ही नवाज शरीफची केक खाणारी औलाद तुमच्याकडून आम्ही हिंदुत्व शिकायचं. तुम्ही विश्वासघात केला. विश्वासघात करणारा हिंदू असू शकत नाही, असं शंकराचार्य म्हणाले. तुम्ही काय करता. तुमचे १९४० पासूनचे पूर्वज काढा. श्यामाप्रसाद मुखर्जी. तेव्हाच्या मुस्लिम लीगने देशाची फाळणी मागितली. त्यांच्यासोबत मांडीला मांडी लावून बंगालमध्ये सत्ता स्थापन करणारे यांचे राजकीय बाप श्यामाप्रसाद मुखर्जी. मेहबुबा मुफ्ती यांच्यासोबत भाजपने सरकार केलं. चंद्राबाबू नायडू हा काय हिंदुत्ववादी माणूस आहे,. नितीश कुमार हा काय हिंदुत्ववादी आहे. त्यांच्याकडे डोळेझाक केली जाते. आणि आम्हाला हिंदुत्वाचं विचारता. तुमचं काय आहे ते सांगा, असा प्रश्नही उद्धव ठाकरेंनी उपस्थित केला.

गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्...
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्....
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर.
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा.
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्.
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त.
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य.
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?.
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा.
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार.
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'.