शिवसेना काँग्रेसच्या दबावाला झुकणार नाही अशी अपेक्षा : देवेंद्र फडणवीस

माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis on Citizenship Amendment Bill 2019 ) यांनी रखडलेल्या खातेवाटपावरुन ठाकरे सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे.

शिवसेना काँग्रेसच्या दबावाला झुकणार नाही अशी अपेक्षा : देवेंद्र फडणवीस
Follow us
| Updated on: Dec 10, 2019 | 6:52 PM

मुंबई : माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis on Citizenship Amendment Bill 2019 ) यांनी रखडलेल्या खातेवाटपावरुन ठाकरे सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे. 13 दिवस झाले तरी खातेवाटप नाही, सध्या केवळ स्थगितीच्याच बातम्या येत आहेत, नागपुरातील अधिवेशन केवळ नावापुरतं होत आहे, अद्याप खातेवाटपच नाही तर मग उत्तरं देणार कोण?, असा सवाल देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis on Citizenship Amendment Bill 2019 ) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना विचारला.

नागपुरात किमान दोन आठवडे अधिवेशन घ्या ही आमची मागणी फेटाळली आहे. शेतकऱ्यांना अद्याप मदत मिळालेली नाही, ती तातडीने मिळावी ही आमची अपेक्षा आहे, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

नागरिकत्व सुधारणा विधेयकाला शिवसेनेने काल पाठिंबा दिला, मात्र आज मुख्यमंत्र्यांनी संधिग्दता व्यक्त केली आहे, लोकसभेत विधेयक पास झालं, मात्र राज्यसभेत काँग्रेसच्या दबावानंतर भूमिका बदलली का? राज्य सरकार टिकवण्यासाठी भूमिका बदलली का?, शिवसेने आपली जुनी भूमिका कायम ठेवावी, ते कुणाच्याही दबावाखाली जाणार नाहीत, अशी मला अपेक्षा आहे, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

नागरिकत्व सुधारणा विधेयकावर शिवसेनेने विधेयकाच्या बाजूने मतदान केलं, पण राज्यसभेत त्यांची भूमिक संदिग्ध वाटत आहे. अनेक पक्षांनी या विधेयकाला पाठिंबा दिला. पण राज्यसभेत संदिग्ध भूमिका का, काँग्रेसकडून दबाव आलाय का? शिवसेने आपली जुनी भूमिका कायम ठेवावी, ते कुणाच्याही दबावाखाली जाणार नाहीत, अशी मला अपेक्षा आहे – देवेंद्र फडणवीस

विधासभेचे अधिवेशन पाच-सहा दिवसाचे आहे, हे अधिवेशन फॉरमॅलिटी म्हणून ठेवलेले आहे असं वाटते. बरेच दिवस झाले पण अजून खातेवाटप झाले नाही. मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही. आम्ही सरकारला मदत आणि समर्थन करु, पण त्यांनी काम केले पाहिजे, पण हे सरकार सर्व प्रोजेक्टला स्थिगिती देत आहे. शेतकऱ्यांना लवकर मदत मिळावी अशी आमची मागणी आहे, असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.