मुंबईची सत्ता मिळवण्याची भाषा करणारे खूप आले आणि गेलेही; अनिल परबांनी फडणवीसांना डिवचले

निवडणुका जवळच आहेत तेव्हा सर्वकाही स्पष्ट होईल, असे अनिल परब यांनी म्हटले. | Anil Parab

मुंबईची सत्ता मिळवण्याची भाषा करणारे खूप आले आणि गेलेही; अनिल परबांनी फडणवीसांना डिवचले
Follow us
| Updated on: Nov 19, 2020 | 11:03 AM

मुंबई: आजपर्यंत मुंबई महानगरपालिकेची सत्ता मिळवण्याची भाषा करणारे खूप जण आले आणि गेलेही, असे वक्तव्य करुन शिवसेना नेते अनिल परब (Anil Parab) यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना डिवचले आहे. मुंबईची जनता शिवसेनेवर प्रेम करते. मुंबईतील चांगल्या-वाईट प्रसंगात शिवसेना ठामपणे लोकांसाठी उभी राहिली आहे. त्यामुळे आजपर्यंत मुंबईकरांनी कधीही शिवसेनेची साथ कधीही सोडलेली नाही, असे अनिल परब यांनी सांगितले. (Shivsena and BJP battle in upcoming Mumbai Mahanagarpalika election)

भाजपच्या मुंबई कार्यकारिणीची बुधवारी दादर येथे बैठक पार पडली. यावेळी मुंबई महागरपालिकेची आगामी निवडणूक जिंकायची आणि पालिकेत भाजपचा महापौर बसवायचा, असा निर्धार भाजपच्या प्रमुख नेत्यांकडून व्यक्त करण्यात आला. या पार्श्वभूमीवर गुरुवारी कोल्हापुरात प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना अनिल परब यांनी भाजपला प्रत्युत्तर दिले. मुंबईची जनता शिवसेनेवर प्रेम करते. यापूर्वीही भाजपसारखे अनेकजण आले आणि गेलेही. कोणाला साथ द्यायची हे मुंबईच्या जनतेला ठाऊक आहे. निवडणुका जवळच आहेत तेव्हा सर्वकाही स्पष्ट होईल, असे अनिल परब यांनी म्हटले.

‘वाढीव वीज बिलांच्या समस्येवर लवकरच तोडगा काढणार’ वाढीव वीज बिलांच्या समस्येवर लवकर तोडगा काढण्यात येईल. वीज बिलात कशी सवलत देता येईल, कितीजणांना त्याचा लाभ मिळेल, याचा अभ्यास सरकारकडून सुरु आहे. येत्या काही दिवसांत याबाबत अंतिम निर्णय होईल. विरोधकांना सध्या दुसरे कुठलेही काम उरले नसल्याने ते आरोप करत आहेत, असे अनिल परब यांनी सांगितले.

काय म्हणाले होते देवेंद्र फडणवीस?

मुंबई महापालिकेवर भाजपचा भगवा फडकवून शिवसेनेचा माज उतरवू, अशी गर्जना देवेंद्र फडणवीस यांनी कार्यकारिणीच्या बैठकीत केली होती. आगामी निवडणुकीत भाजपचाच विजय होईल. 2022 साली मुंबई महापालिकेवर भाजपचा भगवा फडकणार आहे. राजाचा जीव जसा पोपटात अडकलेला असतो, तसा काहींचा जीव महापालिकेत अडकलेला असल्याचा टोलाही देवेंद्र फडणवीसांनी शिवसेनेचं नाव न घेता लगावला होता.

संबंधित बातम्या:

शिवसेनेकडून मुंबईचं वाटोळं करण्याचं पाप; प्रवीण दरेकर यांची टीका

‘बाळ कुणीही जन्माला घालो, ते आमचेच आहे, ही मानसिकता पूर्वीपासून’, गुलाबराव पाटलांचा भाजपला टोला

आगामी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपकडून आमदार अतुल भातखळकरांची प्रभारीपदी नियुक्ती

(Shivsena and BJP battle in upcoming Mumbai Mahanagarpalika election)

नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.