शिवसेनेला उपमुख्यमंत्रिपद मिळणार हे वृत्त खोटं, वरिष्ठांकडून पुष्टी

मुंबई :  लोकसभा निवडणूक निकालानंतर केंद्रातील मंत्रिमंडळ स्थापनेची आणि महाराष्ट्रातील मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा सुरु झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळात कोणाकोणाला स्थान मिळणार याची उत्सुकता असतानाच, विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रिमंडळात कुणाचा समावेश होणार याबाबतही आडाखे बांधणे सुरु झाले आहेत. त्यानुसार गेल्या काही दिवसांपासून शिवसेनेला उपमुख्यमंत्री पद मिळू शकते अशी चर्चा रंगली होती. मात्र […]

शिवसेनेला उपमुख्यमंत्रिपद मिळणार हे वृत्त खोटं, वरिष्ठांकडून पुष्टी
Follow us
| Updated on: May 28, 2019 | 11:54 PM

मुंबई :  लोकसभा निवडणूक निकालानंतर केंद्रातील मंत्रिमंडळ स्थापनेची आणि महाराष्ट्रातील मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा सुरु झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळात कोणाकोणाला स्थान मिळणार याची उत्सुकता असतानाच, विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रिमंडळात कुणाचा समावेश होणार याबाबतही आडाखे बांधणे सुरु झाले आहेत. त्यानुसार गेल्या काही दिवसांपासून शिवसेनेला उपमुख्यमंत्री पद मिळू शकते अशी चर्चा रंगली होती. मात्र ही चर्चा खोटी असल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे.

लोकसभा निवडणुकीच्या निकालांनतर आता राज्य मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे. यात शिवसेनेला उपमुख्यमंत्रीपद दिले जाऊ शकते, अशी चर्चा रंगली गेल्या काही दिवसांपासून रंगत आहे. विशेष म्हणजे सुभाष देसाई आणि आदित्य ठाकरे ही दोन नावंही उपमुख्यमंत्री पदासाठी चर्चेत होती. मात्र या सर्व बातम्या खोट्या असल्याची माहिती शिवसेनेच्या वरिष्ठ सूत्रांनी दिली आहे.

मात्र शिवसेनेला उपमुख्यमंत्री पद मिळणार ही बातमी पूर्णपणे खोटी आहे. तसेच उपमुख्यमंत्री पदासाठी चर्चेत असलेले सुभाष देसाई आणि आदित्य ठाकरे यांची नावंही खोटी आहेत, अशी माहिती शिवसेनेच्या वरिष्ठ सूत्रांनी दिली आहे.

तसेच मंत्रिमंडळ विस्तारादरम्यान शिवसेनेला दोन मंत्री पद अधिक मिळण्याची शक्यता असल्याची माहितीही वरिष्ठ सुत्रांनी दिली आहे. विशेष म्हणजे राज्यातील काही मंत्र्यांना कॅबिनेट मंत्रीपदी बढती मिळण्याची शक्यता आहे. असेही सूत्रांनी सांगितले आहे.

राज्यात मंत्रिमंडळ विस्तार अपेक्षित असताना शिवसेनेतील परिस्थिती

सध्या शिवसेनेकडे पाच कॅबिनेट आणि पाच राज्यमंत्री पदे आहेत

  • एकनाथ शिंदे, MSDRC ( सार्वजनिक बांधकाम) मंत्री, तसेच डॉ. दीपक सावंत यांच्या आरोग्य खात्याचा पदभार शिंदे यांच्याकडे आहे.
  • सुभाष देसाई, उद्योग मंत्री
  • रामदास कदम, पर्यावरण मंत्री
  • दिवाकर रावते, परिवहन मंत्री

लोकसभेच्या तोंडावर शिवसेना-भाजप  युती 

2014 ला विधानसभा निवडणुकीत भाजपला जास्त जागा मिळाल्यामुळे शिवसेनेला जास्त मंत्रीपदं मिळाली नाहीत. त्यामुळे भाजपने आतापासूनच निवडणुकीची तयारी करत काही मोठे फेरबदल करण्याचं धोरण आखलं आहे. त्यातच लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना आणि भाजप यांच्यात युती झाली होती.

आदित्य ठाकरेंची चर्चा

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून आदित्य ठाकरे हे लोकसभा निवडणूक लढवणार असल्याची चर्चा होती. मात्र त्यावेळी स्वत: उद्धव ठाकरे यांनी ती चर्चा फेटाळून लावली होती. “बाळासाहेबांनी माझ्यावर कोणतंही बंधन घातलेलं नव्हतं,मीही आदित्यवर कोणतंही बंधन घातलेलं नाही. निवडणूक लढवायची की नाही हा त्याचा निर्णय आहे. पण ही निवडणूक तरी तो लढवणार नाही हे निश्चित.” असं उद्धव ठाकरे लोकसभा निवडणुकीपूर्वी म्हणाले होते.

लोकसभा निकाल

दरम्यान, लोकसभा निकालात महाराष्ट्रात शिवसेना-भाजप युतीने 48 पैकी 41 जागी यश मिळवलं. यामध्ये भाजपने 23 तर शिवसेनेने 18 जागी विजय मिळवला. काँग्रेसला अवघी 1 तर राष्ट्रवादीला नवनीत राणांसह 5 जागा मिळाल्या. वंचित बहुजन आघाडीकडून लढणाऱ्या एमआयएमच्या इम्तियाज जलील यांनी औरंगाबादची जागा काबीज केली.

संबंधित बातम्या  

आदित्य ठाकरे शिवसेनेकडून उपमुख्यमंत्रीपदाचा चेहरा?

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.