पुणे कोण्याच्या बापाचे नाही, मनसेची धमकी श्रीमंत कोकाटेंनी उडवून लावली, पुन्हा वाद पेटणार?

पुणे कुण्याच्या बापाचं नाही. छत्रपतींची बदनामी करणाऱ्या बाबासाहेब पुरंदरे यांच्या पाया पडून, लोटांगण घातलं म्हणजे खूप मोठे झालो अशा भ्रमात राहू नका. जो जो व्यक्ती छत्रपती शिवाजी महाराज यांची बदनामी करणाऱ्या व्यक्तीचं समर्थन करेल तो व्यक्ती महाराष्ट्राचा शत्रू आहे, तो शिवरायांचा शत्रू आहे, असं जोरदार श्रीमंत गायकवाड यांनी मनसेला दिलाय.

पुणे कोण्याच्या बापाचे नाही, मनसेची धमकी श्रीमंत कोकाटेंनी उडवून लावली, पुन्हा वाद पेटणार?
श्रीमंत कोकाटे, राज ठाकरे
Follow us
| Updated on: Aug 16, 2021 | 4:33 PM

पुणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि संभाजी ब्रिगेडमधील वाद आता अजून पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कारण, राज ठाकरेंना पुरंदरेंच्या पलिकडे इतिहासाचं आकलन नाही, अशी टीका संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांनी केली होती. गायकवाड यांच्या टीकेला मनसे शहराध्यक्ष वसंत मोरे यांनी सज्जड दम भरलाय. लायकीत राहायचं नाहीतर पुण्यात फिरणं मुश्किल करु, असा इशारा वसंत मोरे यांनी दिलाय. मोरे यांच्या या इशाऱ्याला आता श्रीमंत कोकाटे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. (Shrimant Kokate’s reply to MNS leader Vasant More’s criticism)

मनसेनं प्रवीण गायकवाड यांना पुण्यात फिरु देणार नाही असं म्हणणं हास्यास्पद आहे. पुणे कुण्याच्या बापाचं नाही. छत्रपतींची बदनामी करणाऱ्या बाबासाहेब पुरंदरे यांच्या पाया पडून, लोटांगण घातलं म्हणजे खूप मोठे झालो अशा भ्रमात राहू नका. जो जो व्यक्ती छत्रपती शिवाजी महाराज यांची बदनामी करणाऱ्या व्यक्तीचं समर्थन करेल तो व्यक्ती महाराष्ट्राचा शत्रू आहे, तो शिवरायांचा शत्रू आहे, असं जोरदार श्रीमंत गायकवाड यांनी मनसेला दिलाय. राज ठाकरे यांच्यावर तरुण मुलं खूप प्रेम करत होती, म्हणून त्यांनी त्यावेळी 13 जागा जिंकता आल्या. पण आता काय परिस्थिती आहे याचं आत्मचिंतन मनसेनं करावं, असा टोलाही त्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना लगावला आहे.

वसंत मोरेंचा प्रवीण गायकवाडांना इशारा

प्रवीण गायकवाड यांनी केलेली टीका मनसेला चांगली झोंबल्याचं पाहायला मिळालं. तुला राज ठाकरे काय कळणार? लायकीत राहायचं नाहीतर पुण्यात फिरणं मुश्किल करू, असा दमच मनसे शहराध्यक्ष वसंत मोरे यांनी गायकवाड यांना भरला आहे. वसंत मोरे यांनी मीडियाशी संवाद साधताना हा इशारा दिला आहे. तुला राज ठाकरे काय कळणार? लायकीत राहायचं नाहीतर पुण्यात फिरणं मुश्किल करू, असा इशारा देतानाच 2019च्या लोकसभा निवडणुकीत पुण्यातून तुम्ही इच्छुक होता. तेव्हा तुम्हाला मी स्वत: गल्लोगल्ली फिरताना पाहिलंय. एवढेच काय मी प्रविण गायकवाड, असं स्वत:चं नाव लोकांना सांगत होतात, अशी टीकाही त्यांनी केली आहे.

काय म्हणाले होते गायकवाड?

गायकवाड यांनी फेसबुक पोस्ट लिहून राज ठाकरेंवर जोरदार टीका केली होती. राज ठाकरेंना जसे पुरंदरेंच्या पलीकडे इतिहासाचे आकलन नाही, तसेच त्यांना इथल्या राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक संघर्षाचेही आकलन नाही. राजकारणात कुठलेही नवनिर्माण करता न आलेला आणि राजकारणात सपशेल अपयशी ठरलेला हा माणूस आता स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी महाराष्ट्रात पुन्हा एकदा हा सगळा संघर्ष उभा करण्याचा प्रयत्न करत दिसत आहे, अशी टीका प्रवीण गायकवाड यांनी केली आहे.

हा संघर्ष उभा करत असताना त्यांना 1899 ते 1999 या शंभर वर्षाच्या काळात महाराष्ट्रात झालेल्या सांस्कृतिक संघर्षाचा आणि आपले आजोबा प्रबोधनकार ठाकरे यांच्या वारशाचा राज ठाकरे यांना विसर पडला आहे, हे यानिमित्ताने स्पष्ट झाले आहे. त्यांची सध्याची जी काही मांडणी आहे, ती प्रबोधनकार ठाकरेंच्या ब्राह्मणेतर विचारांपासून फारकत घेणारी आणि पुरंदरेंच्या ब्राह्मणी वर्चस्वाच्या विचारणसरणीला जवळ करणारी आहे हे मात्र नक्की, असेही प्रवीण गायकवाड यांनी फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे.

संबंधित बातम्या :

लायकीत राहा, नाहीतर पुण्यात फिरणं मुश्किल करू; मनसेचा प्रवीण गायकवाडांना दम

बाबासाहेब पुरंदरेंवर इतिहासकारांचा ‘दंतकथे’चा आरोप, राज ठाकरेंचं पहिल्यांदाच थेट उत्तर

Shrimant Kokate’s reply to MNS leader Vasant More’s criticism

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.