AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नगरसेवक पद रद्द, श्रीपाद छिंदमची पहिली प्रतिक्रिया

श्रीपाद छिंदम याने प्रसारमाध्यमांसमोर पहिली प्रतिक्रिया दिली (Shripad Chhindam comment)

नगरसेवक पद रद्द, श्रीपाद छिंदमची पहिली प्रतिक्रिया
| Updated on: Feb 28, 2020 | 4:35 PM
Share

अहमदनगर : छत्रपती शिवाजी महाराजांविषयी अवमानकारक भाषा वापरणारा नगरसेवक श्रीपाद छिंदमला ठाकरे सरकारने दणका दिला (Shripad Chhindam comment) आहे. महाविकास आघाडीने श्रीपाद छिंदम याचं नगरसेवकपद रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. महापुरुषांबद्दल अवमानकारक वक्तव्य केल्याप्रकरणी श्रीपाद छिंदमवर कारवाई करण्यात आली आहे. यानंतर श्रीपाद छिंदमने प्रसारमाध्यमांसमोर पहिली प्रतिक्रिया दिली (Shripad Chhindam comment).

“आताच मला अहमदनगर महापालिकेकडून आदेशाची प्रत मिळाली. तो आदेश मी वाचला. हा आदेश पाहिल्यानंतर तो योग्य आहे की अयोग्य? हे बोलणं सध्या तरी अयोग्य होईल. मात्र मंत्र्यांसमोर जे कामकाज आलं ते त्यांनी पूर्ण केले. याविरोधात याचिका दाखल करायची की नाही याचा निर्णय अद्याप घेतलेला नाही. या निर्णयाविरोधात माझा कोणावरही द्वेष नाही,” अशी प्रतिक्रिया श्रीपाद छिंदमने दिली.

तत्कालीन महापालिकेतील सभागृहाने छिंदमचं पद रद्द झाले पाहिजे, यासाठी ठराव केला होता. त्याबाबतची सुनावणी नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मंत्रालयातील दालनात झाली.

छत्रपती शिवरायांचा अवमान भोवला, श्रीपाद छिंदमला ठाकरे सरकारचा दणका

अहमदनगरचा तत्कालीन उपमहापौर आणि भाजपच्या तिकीटावर त्यावेळी नगरसेवकपदी निवडून आलेल्या श्रीपाद छिंदम याने महापालिका कर्मचाऱ्याशी दूरध्वनीवरुन बोलताना छत्रपती शिवाजी महाराजांबाबत अवमान करणारे अपशब्द वापरले होते. दोन वर्षांपूर्वी घडलेल्या या घटनेचे राज्यभर तीव्र पडसाद उमटले (Shripad Chhindam comment) होते.

आश्चर्याची गोष्ट म्हणजे गेल्या वर्षी श्रीपाद छिंदम गेल्या वर्षी अहमदनगर महापालिकेच्या निवडणुकीला पुन्हा उभा राहिला होता. अपक्ष उभ्या राहिलेल्या छिंदमचा निवडणुकीत त्याचा विजयही झाला. त्यानंतर छत्रपती शिवरायांच्या तसबीरीला अभिवादन करत त्याने प्रायश्चित्त घेण्याचा प्रयत्न केला होता.

छिंदमने गेल्या वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत बसपच्या तिकीटावर रिंगणात उतरण्याची हिंमतही केली होती. पण मतदारांनी नाकारल्यामुळे तो विधीमंडळाची पायरी चढू शकला (Shripad Chhindam comment) नाही.

माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.