‘हा’ नेता आदित्य ठाकरे यांच्या आयुष्यातील शकुनी!; नितेश राणे यांचा कुणावर निशाणा?
Nitesh Rane on Aditya Thackeray : आदित्य ठाकरे यांच्या निकटवर्तीयावर नितेश राणे यांचे गंभीर आरोप; म्हणाले, हा तर शकुनी!
सिंधुदुर्ग : भाजप नेते, आमदार नितेश राणे यांनी खासदार संजय राऊत यांच्यासह आदित्य ठाकरे यांचे निटकवर्तीय वरूण सरदेसाई यांच्यावर टीका केलीये. तसंच राहुल कणाल यांच्या शिवसेना प्रवेशावरही भाष्य केलंय. शरद पवार यांच्या वक्तव्यालाही नितेश राणे यांनी उत्तर दिलं आहे. जस उद्धव ठाकरे यांच्या आयुष्यात संजय राऊत शकुनी आहे. तसं वरूण सरदेसाई आदित्य ठाकरे यांच्या आयुष्यातील शकुनी आहे, असं नितेश राणे म्हणालेत.
आदित्य ठाकरेचे अत्यंत निकटवर्तीय त्यांचे लाडके राहुल कणाल उद्या शिवसेनेत प्रवेश करतायेत. हा त्यांच्यासाठी वैयक्तिक धक्काच आहे, असं नितेश राणे म्हणालेत.
वरूण सरदेसाईमुळे आदित्य ठाकरेच्या जवळ कोणी उरलेलं नाही. कोविड घोटाळ्यात वरून सरदेसाईचं नाव येऊ शकतं. त्या घोटाळ्यात आघाडीत वरूण सरदेसाई होता. सरदेसाईला आवरलं नाही तर उद्धव ठाकरेंची जशी अवस्था झाली तशी अवस्था आदित्य ठाकरेची होईल. लवकरच वरूण सरदेसाई भाजपा किंवा शिवसेनेत जाईल, असा दावा नितेश राणे यांनी केला आहे.
आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांना कायम रिटायर करण्याचं काम संजय राऊत आणि सरदेसाई करत आहेत. 2019 ला बाळासाहेबांचे विचार विकून काँग्रेस राष्ट्रवादीसोबत जाऊन सरकार स्थापन झालं होतं. 50 योध्ये सोबत घेऊन एकनाथ शिंदे यांनी बाळासाहेबांच्या विचारांना न्याय दिला, असं नितेश राणे म्हणाले.
मागच्या सहा महिन्यात 4 हजार 434 मुली बेपत्ता झाल्या आहेत. सत्ताधाऱ्यांनी बाष्फळ बडबड न करात महिलांच्या सुरक्षेकडे लक्ष द्यावं, असं शरद पवार म्हणाले होते. त्याला आता नितेश राणे यांनी उत्तर दिलं आहे. शरद पवार यांनी राज्यात किती मुली गायब होत आहेत याची आकडेवारी दिली. मुंबई येथील एक डॉक्टर महिलेच आयुष्य संजय राऊतमुळे बरबाद झालं आहे, असा गंभीर आरोप नितेश राणे यांनी केलाय.
— nitesh rane (@NiteshNRane) June 30, 2023
महाविकास आघाडीच सरकार असताना ह्या संजय राऊतने तीच जगणं मुश्किल करून ठेवलेलं त्या महिलेला आदरणीय पवार साहेबांनी न्याय द्यावा. संजय राऊत याने महिला अत्याचारावर बोलणं आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करन हा सर्वात मोठा जोक आहे. उद्या शक्ती कपूर ने कॉलेज मध्ये जाऊन लेक्चर देण्यासारखा विषय आहे त्यामुळे पहिल्यांदा त्या डॉक्टर महिलेला न्याय द्या आणि मग राज्यातील मुलींविषयी बोला, असंही नितेश राणे म्हणालेत.