नितेश राणेंचा महाविकास आघाडीला धक्का, देवगडमधील ग्रामपंचायत बिनविरोध भाजपकडे

भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांच्या नेतृत्वात देवगड तालुक्यातील मोंडपार ग्रामपंचायतीची निवडणूक (Devgad Mondpar) बिनविरोध झाली

नितेश राणेंचा महाविकास आघाडीला धक्का, देवगडमधील ग्रामपंचायत बिनविरोध भाजपकडे
Follow us
| Updated on: Jan 15, 2021 | 7:55 PM

सिंधुदुर्ग : देवगड तालुक्यातील मोंडपार ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोध झाली. ग्रामपंचायतीतील सर्व सदस्य भाजप पुरस्कृत असून त्यांची बिनविरोध निवड झाली. सदस्यांनी भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांची भेट घेतली. (Sindhudurg Devgad Mondpar Gram Panchayat Election Unopposed BJP MLA Nitesh Rane congratulates)

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातील मोंडपार ग्रामपंचायत आता भाजपकडे आली आहे. निवडणुकांचे फड रंगण्याआधीच भाजपने महाविकास आघाडीला धक्का दिला. मोंडपार ही सात सदस्य असलेली ग्रामपंचायत आहे.

विजयी सदस्यांनी भाजपचे आमदार नितेश राणे यांची आज कणकवलीतील निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. आमदार राणे यांनी सर्व सदस्यांचे आणि तेथील कार्यकर्त्यांचे अभिनंदन केले.

मोंडपार ही बिनविरोध झालेली जिल्ह्यातील चौथी ग्रामपंचायत आहे. याआधी कणकवली तालुक्यातील गांधीनगर आणि वैभववाडी तालुक्यातील मांगवली या दोन ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या होत्या.

सोमवारी निवडणूक अर्ज मागे घेण्याच्या दिवशी देवगड तालुक्यातील रहाटेश्वर आणि मोंडपार या ग्रामपंचायत बिनविरोध झाल्या. अशाप्रकारे जिल्ह्यातील चार ग्रामपंचायत बिनविरोध निवड झाल्या आहेत.

वैभववाडीत काय घडलं?

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी तालुक्यात 13 ग्रामपंचायतीच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. मात्र निवडणुकीआधीच वैभववाडीत राजकारण तापू लागलं आहे. वैभववाडी तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या 103 जागांसाठी ही निवडणूक होत असून त्यातील 28 ग्रामपंचायत सदस्य भाजप आमदार नितेश राणे यांच्या पुढाकाराने बिनविरोध निवडून आले आहेत. ग्रामपंचायत सदस्यांसह राणेंनी शक्तीप्रदर्शन करत सेनेला आपली ताकद दाखवून देण्याचा प्रयत्न केला.

राणेंचं वर्चस्व कायम

गेले अनेक वर्षांपासून खा. नारायण राणे यांचं सिंधुदुर्गात वर्चस्व कायम असल्याचं दिसून येतं. राणे शिवसेनेत होते तेव्हा बहुतांशी निवडणुकीत राणे सेनेच्या उमेदवारंना भरघोस मतांनी निवडून आणण्यात महत्त्वाची भूमिका बजावत. नंतर राणे काँग्रेसमध्ये गेल्यानंतर भाजप-सेनेला धूळ चारण्यात राणेंना बहुतांशी वेळेला यश येत. तोच कित्ता राणे आता भाजपमध्ये आल्यानंतरही गिरवत आहे.

संबंधित बातम्या :

सिंधुदुर्गात नितेश राणेंचा शिवसेनेला पुन्हा धक्का

गडचिरोलीतील 66 ग्रामपंचायतींसह 110 गावांचा दारुमुक्त निवडणुकीचा ठराव!

(Sindhudurg Devgad Mondpar Gram Panchayat Election Unopposed BJP MLA Nitesh Rane congratulates)

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.