सिंधुदुर्गाच्या वाट्याचे मंत्रिपद गेले, दीपक केसरकरांच्या नाराजीवर विनायक राऊत म्हणतात…..

उदय सामंत यांच्या रुपाने सिंधुदुर्ग जिल्ह्याला मंत्रिमंडळात प्रतिनिधित्व मिळाले आहे. | Vinayak Raut

सिंधुदुर्गाच्या वाट्याचे मंत्रिपद गेले, दीपक केसरकरांच्या नाराजीवर विनायक राऊत म्हणतात.....
Follow us
| Updated on: Nov 07, 2020 | 1:06 PM

सिंधुदुर्ग: मला मंत्रिमंडळात स्थान मिळाले नाही, पण सिंधुदुर्गाच्या वाटचे मंत्रिपद गेले, अशी खंत बोलून दाखवणारे शिवसेना नेते दीपक केसरकर यांना खासदार विनायक राऊत यांनी प्रत्युत्तर दिले आहे. दीपक केसरकर यांच्या म्हणण्यानुसार उदय सामंत यांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात आले आहे, ते पालकमंत्रीही आहेत. उदय सामंत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ल्याचे सुपूत्र आहेत, असा प्रतिवाद विनायक राऊत यांनी केला. (Shivsena MP Vinayak Raut reply to Deepak Kesarkar)

काही दिवसांपूर्वीच दीपक केसरकर यांनी सावंतवाडीतील पत्रकारपरिषदेत आपली नाराजी जाहीरपणे बोलून दाखविली होती. सिंधुदुर्ग जिल्ह्याला मंत्रिमंडळात स्थान नसल्यामुळे आपण नाराज आहोत. मला नाही निदान वैभव नाईक यांना तरी मंत्रिपद मिळायला पाहिजे होते, असे वक्तव्य करुन केसरकर यांनी अप्रत्यक्षपणे विनायक राऊत यांच्यावर निशाणा साधला होता. या पार्श्वभूमीवर विनायक राऊत यांनी ‘टीव्ही 9 मराठी’शी बोलताना दीपक केसरकर यांचा आरोप खोडून काढला. उदय सामंत यांच्या रुपाने सिंधुदुर्ग जिल्ह्याला मंत्रिमंडळात प्रतिनिधित्व मिळाले आहे. उदय सामंत वेंगुर्ल्याचे असल्यामुळे जिल्ह्याचे पालकमंत्रीपदही त्यांच्याकडेच आहे. मात्र, दीपक केसरकर यांची नेमकी काय भूमिका आहे, ते माहीत नाही. पण त्यांच्या मनात काही शंका असतील तर आम्ही त्यावर नक्की बोलू. या सगळ्यावर मार्ग काढण्यात येईल, असे विनायक राऊत यांनी सांगितले.

यापूर्वी फडणवीस सरकारमध्ये केसरकर गृह राज्यमंत्री होते. मात्र, महाविकासआघाडीची सत्ता आल्यानंतर केसकर यांचा मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला नव्हता. त्यामुळे दीपक केसरकर सत्ताकेंद्रापासून दूर फेकले गेले होते. तेव्हापासून दीपक केसरकर तेव्हापासून जवळपास राजकीय अज्ञातवासात गेले होते. मात्र, सावंतवाडीतील पत्रकारपरिषदेत त्यांनी जाहीरपणे आपली नाराजी बोलून दाखवली होती. राज्यात युतीची सत्ता असताना मला पंतप्रधान कार्यालयात बोलावून भाजपमध्ये येण्याची ऑफर देण्यात आली होती. गोव्याच्या तत्कालीन मुख्यमंत्र्यांना ही बाब माहिती आहे. पण तेव्हा मी भाजपमध्ये गेलो नाही, असे केसरकर यांनी बोलून दाखवले होते.

उद्धव ठाकरे म्हणाले होते, कुठल्याही पक्षात जा, तुला निवडून आणण्याची जबाबदारी माझी : केसरकर

मी शिवसेनेमध्ये का गेलो, तर ज्यावेळी मी नारायण राणेंविरुद्ध लढलो आणि माझी ताकद दाखवली, तेव्हा सगळ्या मोठमोठ्या पक्षांच्या मला ऑफर होत्या. त्यावेळी उद्धव ठाकरे मला म्हणाले होते, कुठल्याही पक्षात जा, तुला निवडून आणण्याची जबाबदारी माझी. असं कोणीच करत नाही. ज्यांनी पदं दिलं, त्यांच्याशी तरी प्रामाणिक राहायला हवं, असे दीपक केसरकर यांनी म्हटले होते. त्यामुळे केसरकरांच्या पक्षांतराच्या चर्चेला पूर्णविराम मिळाला होता. मला मंत्रिपद दिल्यास तीन वर्षात चांदा ते बांदा विकास करुन मी राजीनामा दिला असता आणि वैभव नाईक यांना मंत्रिपद देण्याची विनंती उद्धव ठाकरेंना केली असती, असेही केसरकर यांनी सांगितले होते.

संबंधित बातम्या:

महाविकासआघाडीतील कुरबुरी संपेनात, आता शिवसेनेतच अंतर्गत कलहाची शक्यता; दीपक केसरकरांच्या नाराजीची चर्चा

अशोक चव्हाण किंवा दीपक केसरकरांची नाराजी काहीतरी पदरात पाडण्यासाठी, चंद्रकांत पाटलांचे वक्तव्य

उद्धव ठाकरे म्हणाले होते, कुठल्याही पक्षात जा, तुला निवडून आणण्याची जबाबदारी माझी : केसरकर

(Shivsena MP Vinayak Raut reply to Deepak Kesarkar)

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.