कर्नाटकमध्ये खेळ अद्याप संपलेला नाही, पिक्चर अभी बाकी है!; नितेश राणे यांचा काँग्रेसला इशारा
Karnataka Assmbly Election Results 2023 : कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा निकाल अन् आगामी हालचाली; नितेश राणे यांचं सूचक वक्तव्य
सिंधुदुर्ग : कर्नाटकातील विधानसभा निवडणुकीचा काल निकाल लागला. यात काँग्रेसला 137 जागा जिंकल्या. त्यावर भाजपचे नेते, आमदार नितेश राणे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. कर्नाटकमध्ये खेळ संपलेला नाही पिक्चर अभी बाकी है, असं म्हणत नितेश राणे यांनी काँग्रेसला इशाराच दिला आहे. सिंधुदुर्गात पत्रकार परिषद घेत त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलंय.
कर्नाटक निवडणूक निकाल आला. त्यानंतर भाजपच्या सगळ्या नेत्यांनी मोठ्या मनाने तो निकाल स्वीकारला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसचं अभिनंदन केलं आहे. भाजपचा विजय झाला असता तर विरोधकांनी काय केले असतं. लोकशाही धोक्यात आहे ईव्हीएमचा विषय काढला असता. पण आम्ही तसं करत नाही. तुम्ही जिंकलात तेव्हा लोकशाही धोक्यात नाही ईव्हीएम योग्य आहे आणि हरलात की ईव्हीएममध्ये दोष असल्याचं बोललं जातं. हा विरोधकांचा दुटप्पीपणा आहे, असं नितेश राणे म्हणालेत.
काँग्रेस जिंकली की पाकिस्तान जिंकला? कर्नाटकात पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा दिल्या गेल्या. यापुढे काँग्रेस जिंकला की पाकिस्तान जिंकला असा म्हणायचं का?, असा सवाल नितेश राणे यांनी विचारला आहे.
राहुल गांधी आणि पाकिस्तानची बिलावलची भाषा एकच आहे. सत्ता मिळवणं हे भाजपचे ध्येय नाही. तर सत्तेच्या माध्यमातून देशाचा विकास करणे हा हेतू आहे. पाकिस्ताननचे झेंडे फडकवणे ह्याला उद्धव ठाकरेच हिंदुत्व म्हणायचं का? मातोश्रीवर पाकिस्तानचा झेंडा उद्धव ठाकरेंमुळे दिसेल. ह्यांच्यावर देशद्रोहाचा खटला दाखल केला पाहिजे. बिलावलला मातोश्रीवर आणण्याचा प्रयत्न संजय राऊतांचा आहे, असा घणाघात नितेश राणे यांनी केला आहे.
देशाच्या विरोधकांना मातोश्रीवर आणून बिरयाणी खायला घातली जात आहे. आमच्या नेत्यांना धमक्या देताय? गेले ते दिवस, नारायण राणे यांनी शिवसेना सोडली आणि मातोश्री समोर सभा घेतली. तेव्हा हा संजय राऊत लपून बसला होता. पोलिसांचं संरक्षण बाजूला ठेव. लोक तुझ्या तंगड्या लोक तोडतील, असं नितेश राणे म्हणाले आहेत.
कायद्यानुसार राहुल नार्वेकर निर्णय घेतील राऊत तुला काय करायचं असेल ते कर. संजय राऊतमुळे महविकास आघाडीचं सरकार पडलं, असा आरोपही राणेंनी केला आहे.
नाना पटोले सत्य सांगत होते. नाना पटोले राजीनामा देणार हे राऊतला माहीत होतं मग मित्र पक्षाला का नाही कळवलं याच उत्तर संजय राऊत याने द्यावं. राऊतला मुख्यमंत्री व्हायचं होतं म्हणून त्याने सरकार कोसळावं म्हणून प्रयत्न केले, असा आरोपही त्यांनी केला आहे.