WHO ला मी पत्र लिहिणार अन् संजय राऊतांच्या जिभेचं संशोधन करायला सांगणार- नितेश राणे

Nitesh rane on Sanjay Raut : WHO, पत्र अन् संशोधन; नितेश राणे यांचा संजय राऊतांवर जोरदार हल्लाबोल

WHO ला मी पत्र लिहिणार अन् संजय राऊतांच्या जिभेचं संशोधन करायला सांगणार- नितेश राणे
Follow us
| Updated on: Jun 01, 2023 | 12:06 PM

सिंधुदुर्ग : भाजपचे नेते नितेश राणे यांनी पत्रकार परिषद घेतली. यात त्यांनी शिवसेना ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांच्यावर जोरदार टीका केली आहे. WHO ला मी एक पत्र पाठवणार आहे. त्यांनी संजय राऊतच्या जिभेचे संशोधन करावं, अशी त्यांना विनंती करणार आहे. एखादी व्यक्ती 24 तास कशी चाटुगिरी करू शकते याचा अभ्यास करावा, असं त्यांना सुचवणार आहे, असं नितेश राणे म्हणाले आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर बोलण्यापेक्षा तुझ्या जिभेचं काहीतरी कर. तुझी जीभ म्युझियममध्ये ठेवण्याच्या लायकीची झाली आहे, असं नितेश राणे म्हणाले आहेत.

राहुल गांधी संजय तेंडुलकर आहेत. विराट कोहली आहेत, असं संजय राऊत आज बरळले. त्यांना सांगेन की, या दोन्ही क्रिकेटपटूंनी जगात भारताची मान उंचावली आहे. राहुल गांधी काही दिवसांपूर्वी अमेरिकेत जाऊन आमच्या देशाची, हिंदू धर्माची बदनामी करता आहेत. हे संजय राऊतला कळतंय का?, असा प्रश्न नितेश राणे यांनी विचारला आहे.

आपल्या राष्ट्रगीताबद्दल मोदीजी गेल्यानंतर एक वेगळा अभिमान ऐकायला मिळतो. काल राहुल गांधींच्या कार्यक्रमात आपलं राष्ट्रगीत सुरू असताना लोक उठून सुद्धा उभे राहिले नाहीत. राहुल गांधींच्या मोहोब्बतच्या दुकानात पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा दिल्या जातात. हिरवे झेंडे फडकवले जातात. यालाच राहुल गांधींची मोहोब्बत म्हणायची का?, असा प्रश्न नितेश राणे यांनी उपस्थित केला आहे.

राहुल गांधींना भारतात हिंदूंचे मतदान हवं असतं तेव्हा हिंदू मंदिरात जाऊन साष्टांग नमस्कार घालत असतात. भारताच्या बाहेर जाऊन हिंदू धर्माची, देशाची बदनामी करतात. त्याला संजय राऊत विराट कोहली आणि सचिन तेंडुलकर म्हणणार का? ज्या राहुल गांधींचे गोडवे गाताय, चाटुगिरी करताय. त्यांच्या सभेत किती आयएसआयचे लोक होते. याची माहिती संजय राऊतने घ्यावी, असंही नितेश राणे म्हणाले आहेत.

म्हणे 12 जूनला सगळे देशभक्त एकत्र येणार आहोत. सगळे राष्ट्रद्रोही, सगळे गद्दार,पाकिस्तान समर्थक 12 जूनला एकत्र येत असतील आणि त्यांना संजय राऊत आणि मालक राष्ट्रभक्त म्हणत असेल तर त्यांच्यासारखा गद्दार दुसरा नाही, असा घणाघातही नितेश राणे यांनी केला आहे.

40 आमदार आणि 13 खासदार सोबत असताना त्यांची काळजी घेतली असती तर…आता किर्तीकरांची आठवण येते,आता खडसेसाहेबांची आठवण येते? तुझा मालक मुख्यमंत्री असताना शिवसेना उभी करणाऱ्या शिवसैनिकांची आठवण केली होती का?, असंही ते म्हणालेत.

बीडमध्ये हैवानालाही लाजवणारा खून, नव्या एसपी कावत यांच्यापुढे आव्हान
बीडमध्ये हैवानालाही लाजवणारा खून, नव्या एसपी कावत यांच्यापुढे आव्हान.
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.