AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

संजय राऊत भांडूपचे देवानंद!; नितेश राणे यांचा टोला

Nitesh Rane on Sanjay Raut : राष्ट्रवादीच्या 'या' नेत्याला कुणीही बाजारात विकत घेऊ शकतो!; नितेश राणे यांचा घणाघात... शरद पवार, जितेंद्र आव्हाड यांच्यावरही टीकास्त्र

संजय राऊत भांडूपचे देवानंद!; नितेश राणे यांचा टोला
| Updated on: Jun 08, 2023 | 11:42 AM
Share

सिंधुदुर्ग : भाजपचे नेते नितेश राणे यांनी सिंधुदुर्गात पत्रकार परिषद घेतली. यात त्यांनी शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांच्यावर जोरदार शाब्दिक हल्ला चढवलाय.संजय राऊत यांचा भांडूपचा देवानंद असा उल्लेख नितेश राणे यांनी केला आहे. शिवाय राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावरही नितेश राणे यांनी टीका केलीय. तसंच जितेंद्र आव्हाड आणि अमोल मिटकरी यांच्यावरही नितेश राणे यांनी निशाणा साधला आहे.

संजय राऊतांमध्ये हिंमत आहे का शरद पवार साहेबांना सांगण्याची की, बाळासाहेब ठाकरेंची मागणी होती औरंगाबादचं नाव छत्रपती संभाजीनगर करा, अशी, हे शरद पवारांना सांगण्याची हिंमत आहे का संजय राऊत यांच्यामध्ये?, असं नितेश राणे म्हणालेत.

राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्यावरही नितेश राणेंनी घणाघात केलाय. मुंब्र्याच्या आमदारांनी महाराष्ट्रात दंगली होतील असं विधान केलं होतं. दोन तीन महिन्या अगोदर जितेंद्र आव्हाडांना कसं कळलं होतं की राज्यात दंगली होणार आहेत? कोल्हापूरच्या नेत्याला कसं कळलं की दंगल होणार आहे? आव्हाडांच्या मतदरसंघात 400 लोकांना धर्मांतर करताना पकडलं, यावर संजय राऊतांनी सामनात अग्रलेख लिहावा, असं नितेश राणे यांनी म्हटलंय.

…आणि हा पवार साहेबांबद्दल बोलतोय. तु नक्की भारतात जन्माला आला होता की नेपाळला? तुझा कदाचित हा तिसरा जन्म असावा पहिला नेपाळ दुसरा चिन आणि नंतर कोकणात. तु तर रंग बदलणाऱ्या सरड्यापेक्षाही भयंकर आहेस! तुला BJP ने तुकडा टाकलाय तो यासाठीच.#सरडा, असं ट्विट राष्ट्रवादीचे नेते, आमदार अमोल मिटकरी यांनी केलं आहे. त्याला नितेश राणे यांनी उत्तर दिलं आहे.

नितेश राणे यांनी अमोल मिटकरी यांच्यावर निशाणा साधला आहे. अमोल मिटकरी यांना कोणीही बाजारात विकत घेऊ शकतो. माझा चेक जर त्यांच्यापर्यंत पोचला तर ते माझ्या बाजूने बोलतील. म्हणून अशा व्यक्तीवर बोलण उचीत नाही, असं नितेश राणे म्हणालेत.

ज्यांना साधं छत्रपती संभाजीनगर म्हणता येत नाही त्यावर तुम्हाला आक्षेप घेता येत नाही. अबू आझमीने औरंगजेबाला मानतो असं वक्तव्य केलं. जाहीरपणे गवगवा केला जातोय. तुला थुंकण्याची सवय आहे ना मग अबू आझमी वर थुंकून दाखव, असं आव्हान नितेश राणे यांनी संजय राऊतांना दिलं आहे.

संजय राऊत आणि आदित्य ठाकरेंचे पटत नाही. याचा पुन्हा एकदा पुरावा समोर आला आहे. संजय राऊत यांना पगार भेटत नाही म्हणून जर एकनाथ शिंदेंना जाऊन भेटले तर त्यात आश्चर्य वाटणार नाही. यांच्या ##@xवर आदित्य ठाकरेंनी भवोजींना आणून बसवलंय, असं म्हणत नितेश राणे यांनी राऊतांवर निशाणा साधलाय.

त्यांच्यासोबत जाणं परवडणारं नाही! मलिकांबाबत शिरसाट यांचं मोठं विधान
त्यांच्यासोबत जाणं परवडणारं नाही! मलिकांबाबत शिरसाट यांचं मोठं विधान.
सुप्रिया सुळेंकडून मुख्यमंत्र्यांचे तोंडभरून कौतुक! म्हणाल्या...
सुप्रिया सुळेंकडून मुख्यमंत्र्यांचे तोंडभरून कौतुक! म्हणाल्या....
नाना पटोलेंचा भाजपवर सत्तेतून आमदार विकत घेतल्याचा आरोप
नाना पटोलेंचा भाजपवर सत्तेतून आमदार विकत घेतल्याचा आरोप.
हिंगोलीत कॉंग्रेसला खिंडार! प्रज्ञा सातव यांचा भाजपात प्रवेश
हिंगोलीत कॉंग्रेसला खिंडार! प्रज्ञा सातव यांचा भाजपात प्रवेश.
नागपूर सत्र न्यायालयाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी!
नागपूर सत्र न्यायालयाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी!.
ठाकरे बंधू भाजपचा पराभव करणार! संजय राऊतांचा मोठा दावा
ठाकरे बंधू भाजपचा पराभव करणार! संजय राऊतांचा मोठा दावा.
दोन मंत्री गेले, हा काळिमा! राऊतांचा सरकारवर गंभीर आरोप
दोन मंत्री गेले, हा काळिमा! राऊतांचा सरकारवर गंभीर आरोप.
त्यांना पुन्हा मंत्री करणं सोपं नाही! संजय राऊतांनी स्पष्टच सांगितले
त्यांना पुन्हा मंत्री करणं सोपं नाही! संजय राऊतांनी स्पष्टच सांगितले.
दादांची राष्ट्रवादी, शरद पवारांसोबत लढण्यास इच्छुक!
दादांची राष्ट्रवादी, शरद पवारांसोबत लढण्यास इच्छुक!.
नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!
नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!.