उद्धव ठाकरे यांचं धर्मांतर झालंय, लव्ह जिहाद झालाय; नितेश राणे यांची जीभ घसरली

Nitesh Rane on Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना नितेश राणे यांची जीभ घसरली; धर्मांतर आणि लव्ह जिहादचा उल्लेख

उद्धव ठाकरे यांचं धर्मांतर झालंय, लव्ह जिहाद झालाय; नितेश राणे यांची जीभ घसरली
Follow us
| Updated on: May 01, 2023 | 12:08 PM

सिंधुदुर्ग : उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना भाजप नेते नितेश राणे यांची जीभ घसरली आहे. उद्धव ठाकरे यांचं धर्मांतर झालं आहे. लव्ह जिहाद झाला आहे. 2019 ला यांना खुर्ची देताना यांचा सुंता करून टाकला आहे. धर्मांतर करून टाकलं, असं नितेश राणे म्हणाले आहेत. ते सिंधुदुर्गमध्ये पत्रकार परिषदेत बोलत होते.  नितेश राणे यांनी शिवसेना ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांच्यावरही टीका केली आहे.

संजय राऊतांवर टीकास्त्र

नितेश राणे यांनी संजय राऊत यांच्यावर टीका केलीये. यावेळी त्यांनी महाभारताचा उल्लेख केलाय. “संजय राऊत हा महाभारतातला शकुनीमामा आहे!”, असं नितेश राणे म्हणालेत. उदया उद्धव ठाकरेंच्या घरात भांडणं झाली तर त्याला जबाबदार संजय राऊतच असणार हे आताच उद्धवजींना सांगून ठेवतो. आम्ही आदित्य ठाकरेबद्दल आणि नाईट लाईफबद्दल अजून माहिती बाहेर काढावी म्हणून काल संजय राऊतने मोहित कंबोजचा एक व्हीडीओ शेअर केलाय, असंही नितेश राणे म्हणाले आहेत.

काल मी तेजस आणि आदित्य ठाकरेंबद्दल बोललो. त्याचं उत्तर दया संजय राऊत. यांना इथे शरिया कायदा लागू करायचा आहे, असंही नितेश राणे यांनी म्हटलं आहे.

सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा. कामगार दिनाच्या पण शुभेच्छा. विशेषत: संजय राजाराम राऊत यांना कामगार दिनाच्या विशेष शुभेच्छा द्यायच्या आहेत.असा कामगार कोणाला ही मिळू नये, अशी इच्छा मी व्यक्त करेन. मालकाशीच गद्दारी करणारे कामगार असतील तर महाराष्ट्र कधीही पुढे जाणार नाही, असं म्हणत नितेश राणे यांनी संजय राऊतांना टोला लगावला आहे.

संविधान धोक्यात आहे, असं संजय राऊत म्हणाले, संविधान धोक्यात असतं तर तुझ्यासारखं कार्ट रोज सकाळी 9 वाजता टीव्हीवर येऊन आमची सकाळ खराब केली असती का?, असा सवाल त्यांनी केलाय.

नव्या सिनेमाची घोषणा

येत्या एक दोन दिवसात सुधीर सुनगंटीवार यांना भेटून केरला स्टोरीला करमुक्त करावं, अशी विनंती करणार आहे.पहिल्या दिवसापासून टॅक्स फ्री करावं, म्हणून मागणी करणार आहे.केरला स्टोरी सारखाच काही दिवसात दिशा सालियन फाईल्स हा चित्रपट ही ओटीटीवर येणार आहे, असंही नितेश राणे यांनी जाहीर केलंय.

खोक्या संदर्भात 13 साउंड रेकॉर्डिंग आहेत. ते टप्प्याटप्प्याने बाहेर काढणार आहे, असा इशाराही राणे यांनी दिलाय.

Non Stop LIVE Update
निकालाला काहीच तास, पवारांकडून दावा; म्हणाले, काळजी करू नका, राज्यात..
निकालाला काहीच तास, पवारांकडून दावा; म्हणाले, काळजी करू नका, राज्यात...
'...तर आव्हाडांनी दादांच्या म्हशीच्या गोठ्यावर काम कराव', कोणाच आव्हान
'...तर आव्हाडांनी दादांच्या म्हशीच्या गोठ्यावर काम कराव', कोणाच आव्हान.
बच्चू कडूंना महायुती अन मविआकडून फोन, तिसऱ्या आघाडीचा पाठिंबा कोणाला?
बच्चू कडूंना महायुती अन मविआकडून फोन, तिसऱ्या आघाडीचा पाठिंबा कोणाला?.
जयंत पाटलांच्या हाती मविआ नेत्यांच्या गाडीचं स्टेअरिंग; राऊत म्हणाले..
जयंत पाटलांच्या हाती मविआ नेत्यांच्या गाडीचं स्टेअरिंग; राऊत म्हणाले...
'मध्यरात्री EVM ठेवलेल्या स्ट्रॉग रुममध्ये भाजपच्या...', पवारांचा आरोप
'मध्यरात्री EVM ठेवलेल्या स्ट्रॉग रुममध्ये भाजपच्या...', पवारांचा आरोप.
'... तर प्रणिती शिंदे यांचे घर फोडू', कोणी भरला काँग्रेसला सज्जड दम?
'... तर प्रणिती शिंदे यांचे घर फोडू', कोणी भरला काँग्रेसला सज्जड दम?.
'एक्झिट पोलची ऐशी की तैशी, आम्ही 26 ला सरकार बनवतोय'; राऊतांचा दावा
'एक्झिट पोलची ऐशी की तैशी, आम्ही 26 ला सरकार बनवतोय'; राऊतांचा दावा.
'नागपूरहून मी आणि फडणवीस सोबतच मुंबईला...', नाना पटोले असं का म्हणाले?
'नागपूरहून मी आणि फडणवीस सोबतच मुंबईला...', नाना पटोले असं का म्हणाले?.
शिंदे हेच मुख्यमंत्री, शिंदेंच्या शिवसेनेचं ठरलं? बड्या नेत्याचं विधान
शिंदे हेच मुख्यमंत्री, शिंदेंच्या शिवसेनेचं ठरलं? बड्या नेत्याचं विधान.
राज्यात कोणाचं पारडं जडं? सरकार कोणाचं येणार? काय सांगतोय एक्झिट पोल?
राज्यात कोणाचं पारडं जडं? सरकार कोणाचं येणार? काय सांगतोय एक्झिट पोल?.