संजय राऊत, सर्वात मोठा जादूटोना करणारा तर तुझा मालक!; नितेश राणे यांचा निशाणा

Nitesh Rane on Uddhav Thackeray : संजय राऊत, उद्धव ठाकरे अन् जादूटोना; नितेश राणे नेमकं काय म्हणाले?

संजय राऊत, सर्वात मोठा जादूटोना करणारा तर तुझा मालक!; नितेश राणे यांचा निशाणा
Nitesh Rane
Follow us
| Updated on: May 22, 2023 | 1:07 PM

सिंधुदुर्ग : भाजपचे आमदार नितेश राणे यांनी ठाकरेगटाचे नेते संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे. तसंच उद्धव ठाकरे यांच्यावरही निशाणा साधला आहे. संजय राऊत सर्वात मोठा जादूटोना करणारा तुझा मालक उद्धव ठाकरे आहे, असं नितेश राणे म्हणालेत. तसंच राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची आज ईडी चौकशी होतेय. त्यावरही नितेश राणे बोलले आहेत.

संजय राऊत सर्वात मोठा जादूटोना करणारा तुझा मालक आहे. काळी जादू करून ठाकरेंनी काय काय केलं हे आम्हाला माहीत आहे. मातोश्रीच्या मागील भागात जेसीबीने खोदून लिंब का टाकलेली याची माहिती द्यावी का?, असं नितेश राणे यांनी म्हटलं आहे.

महाविकास आघाडीच्या जागा वाटपाबाबत बोलत असताना उद्धव ठाकरेंचे पगारी कामगार संजय राऊत यांनी नाना पटोलेंच्या अप्रत्यक्ष थोबाडीत मारलं आहे. काही दिवसांपूर्वी बिकेसीवर एक बैठक झाली. त्यात ठाकरे गट आणि राष्ट्रवादी यात ती बैठक झाली. त्यात जास्त जागा आपण घ्यायच्या आणि उरलेल्या जागा काँग्रेसला द्यायचं अस ठरलंय. काँग्रेसचा कार्यक्रम करण्याचे अटळ आहे, असं नितेश राणे म्हणालेत.

उद्धव ठाकरे, संजय राऊत आणि आदित्य ठाकरे यांचे रक्त भगवे आहे का हे पाहावं लागेल, असा टोला नितेश राणे यांनी लगावला आहे.

अजितदादा पवार यांची डीएनए टेस्ट करण्याची हिंमत संजय राऊत बोलून गेला आहे. पाकिस्तानच्या प्रेमात असलेल्या संजय राऊत आणि उद्धव ठाकरेंच्या टोळीला आमच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळालेला मान कधी हजम होणार नाही, असंही ते म्हणालेत.

उद्धव ठाकरे मुख्यमंत्री बनणार नाहीत. तर त्यांची पत्नी मुख्यमंत्री बनू शकतात, असं एका बुवाने सांगितलं होतं. म्हणून त्यांनी रश्मी ठाकरे यांना मुख्यमंत्री करण्याची घोषणा केली होती. कर्जतच्या फार्महाऊसवर किती नर बळी दिले गेले याची माहिती घ्या.

नव्या संसंद भवनाच्या उद्घाटनावरून सध्या वाद निर्माण झाला आहे. त्यावर संसद भवनाचं उद्घाटन नरेंद्र मोदी यांनीच केलं पाहिजे. उद्धव ठाकरेंनी स्वतःच्या वडिलांचे स्मारक उभं करू शकला नाही पण मातोश्री 2 उभं केलं, असं नितेश राणे म्हणाले.

जयंत पाटील यांचे कार्यकर्ते ईडीच्या कार्यालयाबाहेर जे करत आहे, तो तमाशा आहे नौटंकी आहे, असं म्हणत नितेश राणे यांनी जयंत पाटील यांच्या ईडी चौकशीवर प्रतिक्रिया दिली आहे.

'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.