“भ्रष्टाचारी 420 म्हणजे संजय राऊत, लोकांचे पैसे खाऊन आमच्या बावनकुळेसाहेबांवर टीका करतात”
Nitesh Rane on Sanjay Raut : भ्रष्टाचाराचे आरोप, सामनावर टीकास्त्र अन् आदित्य ठाकरे यांच्यावर निशाणा; नितेश राणे यांच्या पत्रकार परिषदेतील महत्वाचे मुद्दे
सिंधुदुर्ग : भाजपचे नेते, आमदार नितेश राणे यांनी पत्रकार परिषद घेत ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे. पत्राचाळ घोटाळ्याचा प्रमुख आरोपी कैदी नंबर 8969 राऊतच्या बाबत आज सुनावणी आहे. भ्रष्टाचारी 420 राऊत भाजपबाबत ज्ञान पाजळत होता. उद्या दाऊद विजय मालिया पत्रकार परिषद घेतील. लोकांचे पैसे खाऊन हा श्री 420 आमच्या बावनकुळे साहेबांवर टीका करतो. संजय राऊत हा राष्ट्रवादी Y#2#2 टीम आहे, असं नितेश राणे म्हणालेत.
सामना हे राष्ट्रवादीचं मुखपत्र आहे. राष्ट्रवादीचं हित सामनामधून होत आहे. माझा बाप कोण हे संजय राऊत याला परत परत आठवण करून देणं गरजेचं आहे. पगार उद्धव ठाकरेचा घेतो आणि राष्ट्रवादीची चाटतो, असं म्हणत नितेश राणे यांनी राऊतांवर घणाघात केला आहे.
राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी BRS मध्ये प्रवेश केलाय. त्यामुळे संजय राऊतची जळाली आहे. सामना नेमकं कोणाच मुखपत्र राष्ट्रवादी की शिल्लक सेनेच? हे आम्हाला समजलं पाहिजे, असं ते म्हणाले.
काल पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतलेल्या यादीत तुझ्या मालकाच्या पक्षाचं नाव नव्हतं. तुझा मालक संपत चालला आहे. तू सुपारी घेतली आहेस आणि संपवलं आहेस.तुझी आणि तुझ्या मालकाची लायकी बघ आणि मग आमच्या नेत्यांवर बोल, असं नितेश राणे म्हणालेत.
संजय राऊतांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर टीकास्त्र डागलंय. चंद्रशेखर बावनकुळे आणि हे भाजपची सी टीम आहेत. त्यांच्या हातात काही नाहीये. सगळं काही दिल्लीतून ठरवलं जातं. महाराष्ट्र भाजपची कमान ना देवेंद्र फडणवीस यांच्या हातात आहे. ना चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हातात आहे. सगळं काही दिल्लीतील नेते ठरवतात. के. चंद्रशेखर राव यांची वकिली चंद्रशेखर बावनकुळे केव्हापासून करायला लागलेत, असं संजय राऊत म्हणालेत. त्याला आता नितेश राणे यांनी उत्तर दिलं आहे.
पहिल्यांदा पेंग्विनचा मोर्चा निघत असेल तर राणीच्या बागेपर्यंत गेला पाहिजे. संजय राऊतचा जामीन रद्द करण्यामागे राजकीय हस्तक्षेप नाही. संजय राऊत पुढच्या आठवड्यानंतर सकाळच्या पत्रकार परिषदा बंद होतील. आता अंधारात कविता शायरी करावी लागेल, असं म्हणत नितेश राणे यांनी संजय राऊतांवर टीका केली आहे.
विनायक राऊत यांना मी आवाहन करतो, त्यांनी राणे कुटुंबियावरील टीका सोडून त्यांची 10 कामं दाखवावीत. 10 वर्षात फक्त राणेंवर टीका केली. त्यांनी विकास काम केलेली सांगावीत, असं नितेश राणे म्हणाले.