राणेंकडे दहा वर्ष मंत्रिपद, पण त्यांना शिवसेना संपवता आली नाही, वैभव नाईकांचा निशाणा
शिवसेनेच्या उमेदवारांच्या विरोधात भाजपने उमेदवार उभे केले होते. अशाही परिस्थितीत शिवसेनेने आपला गड कायम राखला आहे, असं नाईक म्हणाले. (Vaibhav Naik slams Narayan Rane)
सिंधुदुर्ग : राज्यसभा खासदार नारायण राणे (Narayan Rane) यांना शिवसेनेच्या विरोधात कोणीही किती ताकद दिली, तरी कोकणात राणेंना शिवसेना धूळ चारल्याशिवाय राहणार नाही, असा एल्गार शिवसेनेचे आमदार वैभव नाईक (Vaibhav Naik) यांनी केला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांच्या सिंधुदुर्ग दौऱ्याबाबत वैभव नाईक यांनी प्रतिक्रिया दिली. (Sindhudurg Shivsena MLA Vaibhav Naik slams Narayan Rane)
नारायण राणेंनी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर शिवसेना संपवू, असं म्हटलं होतं. त्यांनी 10 वर्षे मंत्रिपद घेतलं, मात्र त्यांना ते जमलं नाही. उलट इथून सर्व आमदार शिवसेनेचे निवडून आले, असं वैभव नाईक म्हणाले.
“…तरीही शिवसेनेने गड राखला”
अमित शाहांच्या वक्तव्याचा समाचार घेताना वैभव नाईक म्हणाले की, अमित शाह सांगतात आम्ही समोरुन वार करतो, परंतु मागच्या विधानसभा निवडणुकीत इथे शिवसेनेच्या उमेदवारांच्या विरोधात भाजपने उमेदवार उभे केले होते. अशाही परिस्थितीत शिवसेनेने आपला गड कायम राखला आहे, असं नाईक म्हणाले.
“शाह-राणेंची युती लाईफ टाईम टिको”
“राज्यसभेचे खासदार नारायण राणे आणि अमित शाह यांच्यासारख्या समविचारी लोकांची युती झाली असेल. ही युती लाईफटाईम टिको अशी अपेक्षा आहे. भाजपकडून खोटारडेपणाचं राजकारण सुरु आहे. केंद्रात जी सत्ता आली आहे ती निष्ठूरपणे राबवायची हा त्यांचा एकमेव धंदा आहे. जो विरोधात गेला त्याच्या पाठी ईडी लावायची” अशी टीका शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी केली. (Sindhudurg Shivsena MLA Vaibhav Naik slams Narayan Rane)
“राणेंनी तीन वेळा फोन केल्याने मुख्यमंत्र्यांच्या मनाचा मोठेपणा”
“राणेंना खर बोलल्याशिवाय पर्याय नव्हता. राणेंनी एकदा नव्हे तर तीन वेळा मुख्यमंत्र्यांना फोन केला. तीन-तीन वेळा फोन केला म्हणून मुख्यमंत्र्यांनी मनाचा मोठेपणा दाखवून राणेंची विचारपूस केली आणि काय काम आहे ते विचारून घेतलं. नारायण राणे अमित शाहांना खुश करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना शिव्या द्यायचं काम करतात, राणेंचा तो परीपाट आहे” अशा शब्दात खासदार विनायक राऊत यांनी घणाघाती टीका केली.
संबंधित बातम्या :
नारायण राणेंना केंद्रात बढती मिळणार?; अमित शाहांच्या कोकण दौऱ्यामुळे जोरदार चर्चा
(Sindhudurg Shivsena MLA Vaibhav Naik slams Narayan Rane)