महायुती सरकारने दोन वर्षांत सहाशे निर्णय घेतले… मात्र एका लाडकी बहीण योजनेने…मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सांगितला…
दोन वर्षांत इतके मोर्चे-आंदोलने झाली आहे. सगळे म्हणतात 40 वर्ष, 25 वर्ष, 15 वर्षांपासून प्रश्न प्रलंबित आहेत. ते मी सोडवण्याची अपेक्षा आहे. पण या एकनाथ शिंदेला काय स्वतःसाठी वेळ ठेवणार की नाही? असा मार्मिक टोलाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी करताच सभागृहात पुन्हा हशा पिकला.

महाराष्ट्रात महायुतीचे सरकार गेल्या दोन अडीच वर्षांपासून आहे. या सरकारने अनेक निर्णय घेतले आहे. परंतु मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा निर्णय हा मैलाचा दगड ठरला आहे. त्याचा अनुभव मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही आला. त्यांनी आळंदी येथील कार्यक्रमात त्याची कबुली दिली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, गेल्या दोन वर्षांत आम्ही सहाशे निर्णय घेतले. मात्र अनेक निर्णय हे लाडकी बहीण योजनेखाली दबून गेले आहे, मुख्यमंत्र्यांच्या या वक्तव्यानंतर उपस्थितांमध्ये हशा पिकला.
शांतीब्रह्म ह.भ.प. मारोती महाराज कुरेकर बाबा यांच्या 93 व्या अभिष्टचिंतन सोहळ्यासाठी तसेच वारकरी पूजनासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज आळंदी दौऱ्यावर आहे. त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. ते म्हणाले, माझ्या आयुष्यातील आजचा कार्यक्रम हा सर्वात आगळा-वेगळा आहे. वारकऱ्यांमध्ये येणे हे मी माझे भाग्य समजतो. त्याहून दुसरे पुण्य काहीच नाही. खरं म्हणजे आम्ही मुख्यमंत्री असलो किंवा सरकारमध्ये असलो तरी राजकीय अधिष्ठानापेक्षा तुमचे स्थान नक्कीच मोठे आहे. राजकीय मंडळी ही आपल्यासमोर नतमस्तक होतात. कारण वारकरी एक अशी फॅक्ट्री आहे, जिथे समाज तयार केला जातो. म्हणूनच आनंद दिवे नेहमी वारकरी संप्रदाय समूहात मला घेऊन यायचं.
लाडकी बहीण योजनेवर केली कोटी
आपण महिलांना एसटीमध्ये पन्नास टक्के सवलतीचे तिकीट दिले. त्यामुळे बहिणी भावजींना म्हणतात, आता तुम्ही घरीच बसा, मी बाजार करून येते. हा निर्णय घेताना एसटी तोट्यात येईल, असे विरोधक बोलत होते. पण आज या निर्णयामुळे एसटी फायद्यात आली आहे. गेल्या दोन वर्षांत आम्ही सहाशे निर्णय घेतले. मात्र अनेक निर्णय हे लाडकी बहीण योजनेखाली दबून गेले आहे.




एकनाथ शिंदेंना स्वतःसाठी वेळ ठेवणार की नाही?
दोन वर्षांत इतके मोर्चे-आंदोलने झाली आहे. सगळे म्हणतात 40 वर्ष, 25 वर्ष, 15 वर्षांपासून प्रश्न प्रलंबित आहेत. ते मी सोडवण्याची अपेक्षा आहे. पण या एकनाथ शिंदेला काय स्वतःसाठी वेळ ठेवणार की नाही? असा मार्मिक टोलाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी करताच सभागृहात पुन्हा हशा पिकला. एकनाथ शिंदे आयुष्यात कधी खोटे बोलला नाही, कधी ही फसवणार नाही. मात्र सरकारने आणलेल्या योजना फसव्या असल्याच्या अफवा उठवल्या जात आहेत. माझ्याकडे येणारा एक ही व्यक्ती खाली हाती जाणार नाही, एवढी मोठी शक्ती मला द्यावी, असे मागणे मी परमेश्वराकडे करतो, असे एकनाथ शिंदे यांनी आपल्या भाषणात सांगितले.