Nagpur : कामाच्या वेळी झोपा काढल्या अन् आता जीवाचे रान करुन काय उपयोग?, बावनकुळेंची ठाकरेंवर खोचक टीका
शिंदे गट आणि भाजपाकडून शिवसेनेवर टीकास्त्र सुरु आहे. पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी आदित्य ठाकरे हे राज्यभर दौरे करीत आहेत तर पक्षप्रमुख हे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या बैठकावर लक्ष केंद्रीत करीत आहेत. असे असतानाही शिवसेना नेत्यांच्या दौऱ्यावर सवाल उपस्थित करुन टीकास्त्र सुरु आहे. आतापर्यंत शिंदे गटातील आमदार हे आदित्य ठाकरेंवर टीका करीत होते ते आता पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाबद्दलही प्रश्नचिन्ह उपस्थित करु लागले आहेत.
नागपूर : (Eknath Shinde) शिंदे सरकार सत्तेत येऊन भाजपाचा उद्देश साध्य झाला असला तरी (Shivsena) शिवसेना आणि पक्षप्रमुख यांच्यावर टीका करण्याची एकही संधी ना शिंदे गट सोडतयं ना भाजपा. (Chandrashekhar Bawankule) चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष पद आल्यापासून त्यांचा विश्वास कैक पटीने वाढला आहे. तर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्या दौऱ्यावर त्यांनी खोचक टीका केली आहे. मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरे यांच्याकडे काम करण्याची चांगली संधी होती. त्या दरम्यान मात्र, त्यांनी 18-18 तास झोपा काढल्या आणि आता हातातून सर्वकाही निघून गेल्यावर राज्यभर दौरे करायचे काय कामाचे असा टोला त्यांनी लगावला आहे.
चार तास काम अन् 18 तास झोपा
शिंदे गट आणि भाजपाकडून शिवसेनेवर टीकास्त्र सुरु आहे. पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी आदित्य ठाकरे हे राज्यभर दौरे करीत आहेत तर पक्षप्रमुख हे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या बैठकावर लक्ष केंद्रीत करीत आहेत. असे असतानाही शिवसेना नेत्यांच्या दौऱ्यावर सवाल उपस्थित करुन टीकास्त्र सुरु आहे. आतापर्यंत शिंदे गटातील आमदार हे आदित्य ठाकरेंवर टीका करीत होते ते आता पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाबद्दलही प्रश्नचिन्ह उपस्थित करु लागले आहेत. चंद्रशेखर बावनकुळे यांनी तर उद्धव ठाकरे यांना संधी होती त्यावेळी ते 18 तास झोपत असत आणि 4 तास काम करीत असत असा टोला लगावला आहे.
तान्ह्या पोळ्यात आदित्य ठाकरे सहभागी
विदर्भात पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी तान्हा पोळा साजरा करण्याची परंपरा आहे. त्याअनुशंगाने आज आदित्य ठाकरे हे नागपुरात दाखल झाले. पक्ष संघटनेच्या कामाबरोबरच ते येथील तान्हा पोळा कार्यक्रमात सहभागी झाले होते. नागपुरातील पाच तान्हा पोळा कार्यक्रमात सहभागी झाले अन् लहान मुलांचा आनंद घेतला अशी टीका त्यांच्यावर केली आहे. त्यामुळे सत्ता स्थापन होऊन दीड महिन्याचा कालावधी लोटला तरी आरोप-प्रत्यारोप हे सुरुच आहेत.
तरीही त्यांचे स्वागतच..!
आदित्य ठाकरे हे पक्ष संघटन आणि कार्यकर्त्यांच्या बैठकांसाठी नागपुरात दाखल झाले आहेत. शिवाय ते आपण मंत्री असताना ज्या भागात कामे केली तिथेही भेटी देत आहेत. तान्हा पोळ्याला त्यांच्या उपस्थितीवरुन त्यांना हिणवले गेले असले तरी नागपुरात त्यांचे स्वागत आहे असे बावनकुळे यांनी सांगितले. नागपूर हे भाजपाचे राजकीय केंद्रबिंदू आहे. या नागपूर विभागात आदित्य ठाकरे यांचा दौरा होत असून त्यांच्यावर खोचक टीकाही केली जात आहे.