SMC Election 2022, Ward (4) : प्रभाग क्रमांक चारमध्ये गेल्यावेळी चारही जागांवर भाजपाचा विजय; यंदा कोण बाजी मारणार?
सोलापूरच्या प्रभाग क्रमांक 4 मध्ये गवई वस्ती, सिद्धेश्वर मार्केट यार्ड, विडी घरकुल भाग, कल्पना नगर, गांधी नगर एक ते सात व परिसर या महत्त्वाच्या भागांचा समावेश होतो. गेल्या वेळी या प्रभागात चारही जांगावर भाजपा (BJP) विजयी झाले होते.
सोलापूर : राज्याच्या अनेक शहरांमधील महापालिकेच्या निवडणुका जाहीर करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये सोलापूर महापालिकेचा (SMC election 2022) देखील समावेश आहे. सोलापूर (Solapur) महापालिकेत एकूण 38 प्रभाग असून एकूण 113 जागा आहेत. त्यापैकी 48 जागा या आरक्षित आहेत. 2017 साली झालेल्या महापालिका निवडणुकीमध्ये सोलापुरात सर्वाधिक जागा जिंकत भाजपाने (BJP) सत्ता मिळवली होती. यंदा देखील एकूण राजकीय परिस्थिती पहाता सोलापूर महापालिका निवडणुकीत भाजपाचे पारडे जड दिसते. बंडाच्या पार्श्वभूमीवर सोलापूर महापालिकेत विजय मिळवणे हे शिवसेनेसाठी मोठे आव्हान असणार आहे. तर काही ठिकाणी एमआयएमचे उमेदवार देखील महत्त्वपूर्ण भूमिका बजावू शकतात. प्रभाग क्रमांक चारबाबत बोलयाचे झाल्यास गेल्या वेळी प्रभाग क्रमांक चारमधील चारही जागांवर भाजपाचे उमेदवार विजयी झाले होते. प्रभाग क्रमांक चार अ मधून भाजपाचे उमेदवार अमित पाटील हे विजयी झाले होते, प्रभाग क्रमांक चार ब मधून भाजपाच्या उमेदवार वंदन गायकवाड या विजयी झाल्या होत्या, प्रभाग क्रमांक चार क मधून विनायक वीटकर हे विजयी झाले होते. तर प्रभाग क्रमांक चार ड मधून भाजपाच्या उमेदवार सुरेखा काकडे या विजयी झाल्या होत्या.
प्रभाग क्रमांक 4 मधील महत्त्वाचे भाग
प्रभाग क्रमांक चारमध्ये गवई वस्ती, सिद्धेश्वर मार्केट यार्ड, विडी घरकुल भाग, कल्पना नगर, गांधी नगर एक ते सात व परिसर या प्रमुख भागांचा समावेश होतो.
प्रभाग क्रमांक चारमध्ये लोकसंख्या किती?
प्रभाग क्रमांक चारची एकूण लोकसंख्या 27377 इतकी आहे, त्यापैकी 1641 एवढी अनुसूचित जातीची तर 159 इतकी अनुसूचित जमातीची लोकसंख्या आहे.
2017 मधील चित्र काय?
गेल्यावेळी सोलापूर महापालिकेत सर्वाधिक जागा जिंकत भाजपाने बाजी मारली होती. 2017 साली झालेल्या महापालिका निवडणुकीच्या आकडेवारीवर नजर टाकल्यास प्रभाग क्रमांक चारमध्ये चारही जागांवर भाजपाचे उमेदवार विजयी झाले होते.प्रभाग क्रमांक चार अ मधून भाजपाचे उमेदवार अमित पाटील हे विजयी झाले होते, प्रभाग क्रमांक चार ब मधून भाजपाच्या उमेदवार वंदन गायकवाड या विजयी झाल्या होत्या, प्रभाग क्रमांक चार क मधून विनायक वीटकर हे विजयी झाले होते. तर प्रभाग क्रमांक चार ड मधून भाजपाच्या उमेदवार सुरेखा काकडे या विजयी झाल्या होत्या.
यंदा प्रभागातील आरक्षण कसे?
महापालिका निवडणूक 2022 च्या आरक्षण सोडतीनुसार यावर्षी प्रभाग क्रमांक चार अ हा सर्वसाधारण महिलाकरिता आरक्षित आहे. प्रभाग क्रमांक चार ब देखील सर्वसाधारण महिलांकरीता आरक्षित आहे. तर प्रभाग क्रमांक चार क हा सर्वसाधारण असे आरक्षणाचे स्वरुप आहे.
सोलापूर महानगरपालिका निवडणूक 2022 प्रभाग क्रमांक 4 अ
पक्ष | उमेदवार | विजयी/आघाडी |
---|---|---|
भाजपा | ||
शिवसेना | ||
काँग्रेस | ||
राष्ट्रवादी | ||
मनसे | ||
इतर |
सोलापूर महानगरपालिका निवडणूक 2022 प्रभाग क्रमांक 4 ब
पक्ष | उमेदवार | विजयी/ आघाडी |
---|---|---|
भाजप | ||
शिवसेना | ||
काँग्रेस | ||
राष्ट्रवादी | ||
मनसे | ||
इतर |
सोलापूर महानगरपालिका निवडणूक 2022 प्रभाग क्रमांक 4 क
पक्ष | उमेदवार | विजयी/ आघाडी |
---|---|---|
भाजप | ||
शिवसेना | ||
काँग्रेस | ||
राष्ट्रवादी | ||
मनसे | ||
इतर |
यंदा कोण बाजी मारणार?
गेल्या वेळी सोलापूर महापालिकेत भाजपाने सर्वाधिक जागा जिंकत सत्ता काबीज केली होती. यंदा देखील सर्व परिस्थिती ही भाजपासाठी अनुकूल अशीच दिसून येते. आता राज्यात भाजपाचे सरकार आले आहे. याचा मोठा फायदा हा भाजपाला होऊ शकतो. तर दुसरीकडे यंदाच्या महापालिका निवडणुकीत शिवसेनेसाठी म्हणावी तेवढी अनुकूल स्थिती नाही. शिवसेनेचे अनेक नेते फुटून शिंदे गटात सहभागी झाले आहेत. त्याचा मोठा फटका हा राज्यभरातील महापालिकेत शिवसेनेला बसण्याची शक्यता आहे.