Eknath Shinde : तर गावाला मी शेती करायला जाईन, पुन्हा सर्वच्या सर्व बंडखोर निवडूण आणण्याची एकनाथ शिंदेंची भीष्मप्रतिज्ञा
मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, देवेंद्र फडणवीस शिवसेनेला उपमुख्यमंत्रीपद देणार होते. गडकरी साहेब भिवंडीत आले होते. फडणवीस म्हणाले, संधी चांगली मिळेल. मी काही रिअॅक्शन दिली नाही. ते पद आम्ही घेणारच नाही. कारण ते मला द्यावं लागेल म्हणून. मी रिअॅक्ट झालो नाही. मी गप्प झालो.
मुंबई : जे आमदार माझ्याबरोबर आहेत. त्यांना निवडून आणण्याची जबाबदारी मी घेत असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत (Assembly) सांगितलं. फडणवीस आणि मी मिळून आम्ही दोनशे आमदार निवडून आणू. आणि ते नाही केलं, तर मी गावाला शेती करायला निघून जाईन, अशी भिष्मप्रतिज्ञा शिंदे यांनी घेतली. ते म्हणाले, मोदींना जगाला काबूत करून ठेवलंय. आपण छोटे-छोटे लोक आहोत. पत्रकार परिषदेत त्यांनी सांगितलं एकच शपथविधी होईल. त्यांचे भाजपचे 115 आणि आमचे 50 असं मिळून 165 आमदार आहोत. तुमच्यासोबत गेलेले निवडून येणार नाहीत, असं मला सांगण्यात आलं. जे गेले ते हिंदुत्वाचा विरोध करणाऱ्यांकडं गेले. आम्ही हिंदुत्वाचा पुरस्कार करणाऱ्या पक्षाकडं आहोत. त्यामुळं 165 नाही. तर आम्ही दोघे मिळून 200 आमदार निवडून आणणार. शिवसैनिक (Shiv Sainik) आहोत. जिथं हात मारू तिथून पाणी काढणार. हे नाही केलं, तर आम्ही गावाला शेती करायला (To farm) जाईन, असंही त्यांनी सांगितलं.
ही वैचारिक लढाई आहे
एकनाथ शिंदे म्हणाले, माझा नातू आहे. फूल टाईमपास आहे. ही वैचारिक लढाई आहे. स्वार्थाची लढाई नाही. समृद्धीचं काम देवेंद्र फडणवीसांनी दिलं. माझे पुतळे जाळले गेले. एकदा तर विमान क्रॅश होता होता वाचलं. मोपलवार तर देवाचा धावा करत होता. विमानात बसलो पायलट सरदारजी होता. विमान खाली वर होत होतं. त्याने थंब केला होता. त्याला म्हटलं आता काय ढगात गेल्यावर करतो. तो म्हणाला, आधीच विमान अहमदाबादला लँड झालं. त्यामुळं ढगात घुसलो, असा किस्सा त्यांनी यावेळी सांगितला.
पदाची लालसा केली नाही, करणार नाही
मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, देवेंद्र फडणवीस शिवसेनेला उपमुख्यमंत्रीपद देणार होते. गडकरी साहेब भिवंडीत आले होते. फडणवीस म्हणाले, संधी चांगली मिळेल. मी काही रिअॅक्शन दिली नाही. ते पद आम्ही घेणारच नाही. कारण ते मला द्यावं लागेल म्हणून. मी रिअॅक्ट झालो नाही. मी गप्प झालो. मी एक पार्श्वभूमी सांगितली. मला उपमुख्यमंत्री करणार होते. ही वस्तुस्थिती होती. पण अजितदादांनी कुणी सांगितलं शिंदे नको म्हणून. मी कोणत्याही पदाची लालसा केली नाही. करणार नाही. सुधीर जोशी, मनोहर जोशी यांचा किस्सा होता. त्यावेळी ते म्हणाले ते अहो तो अपघात होता. त्यांना मी बाजूला घेऊन विचारलं. तेव्हा ते म्हणाले. आम्ही तुमच्या नावाला कधी विरोध केला नाही. तो तुमच्या पक्षाचा निर्णय होता, असं सांगण्यात आलं होतं.