माढ्यातील म्हैसगाव ग्रामपंचायतीवर बबनराव शिंदे गटाची सत्ता कायम, पडसाळीत 20 वर्षानंतर सत्तांतर

माढ्यातील म्हैसगाव ग्रामपंचायतीवर बबनराव शिंदे गटाची सत्ता कायम

माढ्यातील म्हैसगाव ग्रामपंचायतीवर बबनराव शिंदे गटाची सत्ता कायम, पडसाळीत 20 वर्षानंतर सत्तांतर
Follow us
| Updated on: Aug 05, 2022 | 12:37 PM

माढा, सोलापूर : ग्रामपंचायत निवडणूक निकालात (Gram Panchayat Election Result) सोलापुरात महाविकास आघाडी पुढे दिसत आहे. माढ्यात बबनराव शिंदेंचा गट पुढे आहे. माढा तालुक्यातील म्हैसगाव ग्रामपंचायत वर राष्ट्रवादीचे आमदार बबनराव शिंदे (Babanrao Shinde) गटाची सत्ता कायम आहे. तर पडसाळीत घडले 20 वर्षानंतर परिवर्तन झालंय. समविचारी नेत्यांकडे गावची सत्ता आलीय. माढा तालुक्यातील म्हैसगाव ग्रामपंचायतवर आमदार बबनराव शिंदे समर्थक तथा विठ्ठलराव शिंदे साखर कारखान्याचे उपाध्यक्ष वामनभाऊ यांच्या गटाकडे सत्ता कायम राहिली आहे. तर पडसाळी ग्रामपंचायत वर चार टर्म सत्तेत असलेला प्रताप पाटील गटाचा पराभव झालाय. या ठीकाणी एकत्रित आलेल्या समविचारी दत्ता फरड आणि सचिन पाटील गटाकडे गावची सत्ता गेलीय.

मनगोळीत सुभाष देशमुख यांना धक्का

दक्षिण सोलापूर तालुक्यातील मनगोळी ग्रामपंचायतीत भाजप आमदार सुभाष देशमुख यांना धक्का बसलाय. दक्षिण सोलापूर तालुक्यातील दोन्ही ग्रामपंचायतीत आमदार सुभाष देशमुखांना धोबीपछाड झालीये. दक्षिण सोलापूर तालुक्यातील मनगोळी ग्रामपंचायतीतील सुभाष देशमुख गटाची पंधरा वर्षाची सत्ता कोसळली. आमदार सुभाष देशमुख गटाविरोधात सर्वपक्षीय नेते एकवटल्याने देशमुख गटाचा 6 पैकी 1 उमेदवार विजयी झालेत. सुभाष देशमुख गटाच्या पॅनेलला विरोधीगटाने धोबीपछाड दिली आहे.

देशमुख यांच्याविरोधात सर्वच एकवटले

सोलापूर ग्रामपंचायतीच्या निकालात भाजपाला मात्र मोठा धक्का बसल्याचे निकालावरून दिसून येत आहे. याठिकाणी सुभाष देशमुख यांच्याविरोधात सर्वच एकवटले. त्यामुळे देखमुख गटाला केवळ एकाच जागेवर समाधान मानावे लागले. त्यांचा सहापैकी एकच उमेदवार विजयी झाला.

हे सुद्धा वाचा

शिवसेनेचा विजय

सोलापुरात सात सदस्य असलेल्या चिंचपूर ग्रामपंचायतीत शिवसेनेच्या उध्दव ठाकरे गटाचे 7 पैकी 7 सदस्य निवडून आलेत. सोलापूरमध्ये उध्दव ठाकरे यांच्या गटाचं पहिलं खातं उघडलं आहे. माजी सहकारमंत्री आणि भाजप आमदार सुभाष देशमुख यांना हा मोठा झटका आहे. सोलापुरात देशमुखांचं मोठं वर्चस्व आहे. पण चिंचपूरमधला हा पराभव त्यांना मोठा धक्का देणारा आहे. आता माजी आमदार रविकांत पाटील आणि जिल्हा परिषद सदस्य अमर पाटील यांच्या गटाकडे सत्ता गेली आहे.

आज भविष्याचा फैसला

आज राज्याच्या 15 जिल्ह्यातील 238 ग्रामपंचायत निवडणुकांचा निकाल लागतोय. या निवडणुकीत कोण बाजी मारणार याकडेअवघ्या राज्याचं लक्ष आहे. नाशिक जिल्ह्यातील 36, धुळे 41, जळगाव 20, अहमदनगर 13, पुणे 17, सोलापूर 25, सातारा 7, सांगली 1, औरंगाबाद 16, बीड 13, परभणी 2, उस्मानाबाद 9, जालना 27, लातूर 6 आणि बुलडाणा जिल्ह्यातील 5 अशा एकूण 238 ग्रामपंचायत निवडणुकांचा निकाल आज लागणार आहे. या निवडणुकांसाठी सरासरी 78 टक्के एवढे मतदान झाले होते.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.