आता नवीन ऑफरचा दे धक्का, 100 आमदार आणा आणि मुख्यमंत्री व्हा!

भाजपाने मौर्य यांना मुख्यमंत्री करण्याचे आश्वासन दिले होते. पण, प्रत्यक्षात भाजपने शब्द पाळला नाही. मौर्य यांनी आपले 100 आमदार आणले तर समाजवादी पक्ष त्यांना पाठिंबा देईल आणि ते मुख्यमंत्रीपदी विराजमान होतील असे अखिलेश यादव म्हणाले.

आता नवीन ऑफरचा दे धक्का, 100 आमदार आणा आणि मुख्यमंत्री व्हा!
Follow us
| Updated on: Sep 07, 2022 | 9:28 PM

लखनौ : गल्ली पासून दिल्लीपर्यंत राजकारण हे सत्तेच्या खुर्ची भोवतीच फिरत असतं. उत्तर प्रदेशात योगी सरकार पाडण्यासाठी सपा प्रमुख अखिलेश यादव(SP chief Akhilesh Yadav) यांनी उपमुख्यमंत्री केशवप्रसाद मौर्य( Uttar Pradesh Deputy Chief Minister Keshav Prasad Maurya) यांना मुख्यमंत्री पदाचे लालच दाखवले आहे. 100 आमदार आणा आणि मुख्यमंत्री बना अशी ऑफरच अखिलेश यादव यांनी केशवप्रसाद मौर्य यांना दिली आहे. अखिलेश यांच्या या ऑफरमुळे उत्तर प्रदेशचे राजकारण ढवळू निघाले आहे.

यूपी विधानसभेत 403 सदस्य आहेत. समाजवादी पक्षाने 111 जागा जिंकल्या आहेत. सपा आघाडीने विधानसभेत 125 जागांवर विजय मिळवला. यूपी निवडणुकीपूर्वी अखिलेश सातत्याने राज्यात समाजवादी सरकार परत येईल असा दावा करीत आहेत. यासाठी त्यांनी तयारी सुरु केली आहे.

निवडणुकीत समाजवादी पक्षाच्या जागा वाढल्या, पण पक्षाला बहुमताचा आकडा गाठता आला नाही. यामुळेच अखिलेश यादव यांनी भाजपाच्या असंतुष्ट गटाला गळाला लावण्याचे प्रयत्न सुरु केले आहेत. यासाठीच त्यांनी उपमुख्यमंत्री केशवप्रसाद मौर्य यांच्यावर लक्ष केंद्रीत केले आहे.

योगी सरकारमध्ये उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांना योग्य सन्मान मिळू शकला नाही, असा दावा अखिलेश यादव यांनी एका वृत्तवाहिनीला मुलाखत देताना केला. भाजपाने मौर्य यांना मुख्यमंत्री करण्याचे आश्वासन दिले होते. पण, प्रत्यक्षात भाजपने शब्द पाळला नाही. मौर्य यांनी आपले 100 आमदार आणले तर समाजवादी पक्ष त्यांना पाठिंबा देईल आणि ते मुख्यमंत्रीपदी विराजमान होतील असे अखिलेश यादव म्हणाले.

अखीलेश यांच्या या ऑफरवर भाजपा नेत्यांकडून टीका करण्यात येत आहे. त्यांनी त्यांचे 100 आमदार वाचवावे. ते सर्व भाजपामध्ये प्रवेश करण्याच्या तयारीत आहेत, असा दावा करत केशव प्रसाद मौर्य यांनी अखिलेश यांची ऑफर धुडकावून लावली आहे.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.