Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

St Worker : शरद पवारांच्या घराबाहेर जोरदार आंदोलन, एसटी कर्मचाऱ्यांचा पुन्हा एल्गार

राज्यातले एसटी कर्मचारी पुन्हा आक्रमक झाले आहेत. एसटी कर्मचाऱ्यांनी मुबंईतल्या शरद पवारांच्या घराबाहेर जोरदार आंदोलन केले आहे.

St Worker : शरद पवारांच्या घराबाहेर जोरदार आंदोलन, एसटी कर्मचाऱ्यांचा पुन्हा एल्गार
एसटी कर्मचाऱ्यांचं शरद पवारांच्या घराबाहेर आंदोलनImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Apr 08, 2022 | 3:48 PM

मुंबई : राज्यातले एसटी कर्मचारी (St Worker Strike) पुन्हा आक्रमक झाले आहेत. एसटी कर्मचाऱ्यांनी मुबंईतल्या शरद पवारांच्या (Sharad Pawar) घराबाहेर जोरदार आंदोलन केले आहे. एसटीच्या विलीनीकरणात शरद पवारांनी आणि अजित पवारांनी अडथळा आणल्याचा आरोप या एसटी कर्मचाऱ्यांकडून करण्यात येत आहेत. एसटी कर्मचाऱ्यांकडून दगडफेक आणि चप्पलफेक करण्यात येत आहे. अजित पवार (Ajit Pawar) आणि शरद  पवार यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात येत आहे. पोलिसांनी काही आंदोलनकांना ताब्यातही घेतले आहे. आता एसटी कर्मचारी आणि पोलीस यांच्यात वाद रंगतानाही दिसून येत आहे. शासनात विलीनीकरण करावे या मागणीवर एसटी कर्मचारी अजूनही ठाम आहेत. तसेच या एसटी कर्मचाऱ्यांनी बारमतीत जाऊन आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. आम्हाला बारामतीत येण्यापासून थांबवून दाखवा असे थेट आव्हान आता एसटी कर्मचाऱ्यांनी दिलं आहे.

पवारांविरोधात जोरदार घोषणाबाजी

मोठ्या प्रमाणात एसटी कर्मचाऱ्यांच्या आत्महत्या झाल्या आहे, त्याला “चोरांचे पुढारी” शरद पवार जबाबदार आहेत, अशा तीव्र प्रतिक्रिया या आंदोलनावेली एसटी कर्मचाऱ्यांनी दिल्या आहेत. “चोरांचे सम्राट शरद पवार आणि अजित पवार” यांच्याविरोधातला हा आक्रोश आहे, अशी तिखट प्रतिक्रिया या एसटी कर्मचाऱ्यांनी दिल्या. जवळपास गेल्या चार महिन्यांपासून राज्यात एसटी कर्मचाऱ्यांचं विलीकरणासाठी आंदोलन सुरू आहे. मात्र विलीनीकरणावर कोणताही निर्णय झाला नाही. कोर्टाने एसटी कर्मचाऱ्यांना 22 एप्रिलपर्यंत कामावर हजर होण्याचे आदेश दिले आहेत. तसेच दिलेल्या मुदतीत कामावर हजर होणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करून नका, असेही कोर्टाने म्हटले आहे. मात्र काही एसटी कर्मचारी अजूनही विलीनीकरणावर ठाम आहेत. काल कोर्टाने हा निर्णय दिल्यानंतर एसटी कर्मचाऱ्यांचे वकील गुणरत्न सदावर्ते यांनी शरद पवारांवर जोरदार हल्लाबोल चढवला होता.

आंदोलन भाजपने भडकवल्याचा आरोप

शरद पवारांच्या मनात नाही विलीनीकरण व्हावे, शरद पवारांनी एसटीच्या संपातही राजकारण केलं. हे आंदोलन संपवण्याचा प्रयत्न केला, अजित पवार यांनीही आंदोलनात आणि विलीनीकरणात अडथळा आणला, असा आरोप वकील गुणरत्न सदावर्ते यांनी केला होता. त्यानंतर एसटी कर्मचारी आज पुन्हा आक्रमक झाले आहेत. मात्र हे आंदोलन भाजपने पेटवलं आहे, असा थेट आरोप राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केला आहे. एसटी कर्मचाऱ्यांना शरद पवारांविरुद्ध भडकवण्याचा प्रयत्न भाजप आणि गुणरत्न सदावर्ते करत आहेत, असा आरोप राष्ट्रवादीचे नेते आता करत आहे. त्यामुळे या मुद्द्यावरून पुन्हा राज्यातलं वातवरण तापलं आहे.

Rahul Gandhi: श्रीलंकेसारखं भारतातही सत्य बाहेर येईल; राहुल गांधी यांचा दावा

kolhapur north assembly bypoll: महाविकास आघाडीचे नेते डबल ढोलकी, गावांच्या हद्द वाढीवरून चंद्रकांत पाटलांची जोरदार टीका

संसदेत होणार छावाचं स्क्रीनिंग; पंतप्रधान मोदींसह खासदारांची उपस्थिती
संसदेत होणार छावाचं स्क्रीनिंग; पंतप्रधान मोदींसह खासदारांची उपस्थिती.
अन् एकनाथ शिंदेंनी 'त्या' मजूर कुटुंबाची जबाबदारी उचलली
अन् एकनाथ शिंदेंनी 'त्या' मजूर कुटुंबाची जबाबदारी उचलली.
भर उन्हात बरसल्या अवकाळी पावसाच्या सरी
भर उन्हात बरसल्या अवकाळी पावसाच्या सरी.
मग तुम्ही हजामत करत होते का? जयंत पाटलांनी सरकारला धरलं धारेवर
मग तुम्ही हजामत करत होते का? जयंत पाटलांनी सरकारला धरलं धारेवर.
आदित्य ठाकरे - एकनाथ शिंदे आमनेसामने; एकमेकांना बघणं टाळलं
आदित्य ठाकरे - एकनाथ शिंदे आमनेसामने; एकमेकांना बघणं टाळलं.
ठाकरे अन् शिंदे सर्वपक्षीय बैठकीत आमने-सामने, शिंदे दालनात येताच...
ठाकरे अन् शिंदे सर्वपक्षीय बैठकीत आमने-सामने, शिंदे दालनात येताच....
फक्त शिंदेवरच जोक का? कामराची वादानंतर TV9 कडे पहिली प्रतिक्रिया काय?
फक्त शिंदेवरच जोक का? कामराची वादानंतर TV9 कडे पहिली प्रतिक्रिया काय?.
शिंदेंच्या तमाशातला नाच्या म्हणजे पाटील, मनसेची गुलाबराव पाटलांवर टीका
शिंदेंच्या तमाशातला नाच्या म्हणजे पाटील, मनसेची गुलाबराव पाटलांवर टीका.
कुणाल कामराच्या CDR आणि बँक खात्यांची चौकशी होणार
कुणाल कामराच्या CDR आणि बँक खात्यांची चौकशी होणार.
कामराच्या स्टुडिओची तोडफोड कंबोज म्हणाले, अभी तो सिर्फ स्टूडिओ टूटा है
कामराच्या स्टुडिओची तोडफोड कंबोज म्हणाले, अभी तो सिर्फ स्टूडिओ टूटा है.