State Cabinet Meeting | अकरावी प्रवेश प्रक्रिया ते राज्यपाल नियुक्त आमदारांची यादी, राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णयाची शक्यता

मराठा आरक्षणामुळे रखडलेला अकरावी प्रवेश प्रक्रियेचा तिढाही आज सुटण्याची शक्यता वर्तवली जात आहे. (State Cabinet Meeting on Various Topics)

State Cabinet Meeting | अकरावी प्रवेश प्रक्रिया ते राज्यपाल नियुक्त आमदारांची यादी, राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णयाची शक्यता
Follow us
| Updated on: Nov 05, 2020 | 11:43 AM

मुंबई : राज्य मंत्रिमंडळाची आज महत्त्वपूर्ण बैठक पार पडणार आहे. या बैठकीत अकरावी प्रवेश प्रक्रिया, विधानपरिषदेतील 12 राज्यपाल नियुक्त आमदार, मेडिकलच्या SEBC विद्यार्थ्यांची फी याबाबत निर्णय होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसेच मराठा आरक्षणामुळे रखडलेला अकरावी प्रवेश प्रक्रियेचा तिढाही आज सुटण्याची शक्यता वर्तवली जात आहे. (State Cabinet Meeting on Various Topics)

मराठा आरक्षणाचा निर्णय लांबणीवर पडला आहे. त्यामुळे अकरावीचे शैक्षणिक वर्ष कधी सुरू होणार? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. मात्र मराठा आरक्षणाच्या स्थगितीमुळे अकरावीच्या विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये, यासाठी आज होणाऱ्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांना दिलासा मिळेल असं बोललं जात आहे.

त्याशिवाय शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी या महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांकडून राज्यपाल नियुक्त 12 आमदारांची यादी तयार करण्यात आली आहे. ही यादी आजच्या मंत्रिमंडळ बैठकीनंतर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यकडे सुपूर्द केली जाणार असल्याची माहिती आहे. जून महिन्यापासून या जागा रिक्त असून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नियुक्त्या लांबल्या होत्या.

तसेच मेडिकलच्या SEBC विद्यार्थ्यांच्या फी बाबतची मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे अकरावीच्या विद्यार्थ्यांपाठोपाठ मेडिकलच्या विद्यार्थ्यांना ही दिलासा मिळेल असे बोललं जात आहे. त्यामुळे आज होणाऱ्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय घेतले जाणार आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे.  (State Cabinet Meeting on Various Topics)

संबंधित बातम्या : 

विधान परिषद : खडसे, बांदेकर ते सरदेसाई, तांबे; राज्यपाल नियुक्त 12 जागांसाठी 17 नावं चर्चेत

FYJC | अकरावीच्या विद्यार्थ्यांना दिलासा, नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून ऑनलाईन वर्ग

'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.