राज्य विधिमंडळ अधिवेशन, विरोधक कोणत्या मुद्द्यांवरुन सभागृह दणाणून सोडणार?, कोणते मंत्री रडारवर?
राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनाला उद्यापासून म्हणजेच 1 फेब्रुवारीपासून सुरुवात होत आहे. (State Legislature Session Mahavikas Aaghadi BJP)
मुंबई : राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनाला (State Legislature Session) उद्यापासून म्हणजेच 1 फेब्रुवारीपासून सुरुवात होत आहे. अशात वनमंत्री संजय राठोड यांचा यांच्या राजीनाम्यासाठी विरोधी पक्ष आक्रमक झाला आहे. त्यांचा राजीनामा घेतल्याशिवाय विधिमंडळ अधिवेशन चालू देणार नाही, असा आक्रमक पवित्रा विरोधकांनी घेतला आहे. अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला होणाऱ्या चहापानावर देखील विरोधक बहिष्कार घातल्याची शक्यता आहे. (State Legislature Session Mahavikas Aaghadi BJP)
राज्य मंत्रिमंडळातील मंत्री आणि त्यांचे नातेवाईक यांच्याविरोधातील गुन्हे तसंच मंत्र्यांची कारस्थाने याविरोधात आम्ही राज्य विधिमंडळ अधिवेशनात रान उठवू, असा इशारा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिला आहे. त्यानुसार मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad), मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde), मंत्री नवाब मलिक (Nawab Malik), तसंच मंत्री संजय राठोड (Sanjay Rathod) यांच्याविषयी अधिवेशनात विरोधी पक्ष आक्रमक होणार असल्याचं चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं.
आज (रविवार) दुपारी भाजपची बैठक
विधिमंडळ अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आज दुपारी भाजपने एका महत्त्वाच्या बैठकीचं आयोजन केलं आहे. या बैठकीला मित्रपक्षांना देखील आमंत्रित केलं आहे. या बैठकीत अधिवेशनात कोणकोणत्या मुद्द्यांवरुन सरकारला कोंडित पकडायचं, याचे डावपेच ठरणार आहेत.
शेतकरी, मराठा आरक्षण, वाढीव वीजबिल प्रमुख मुद्दे
शेतकरी, मराठा आरक्षण, वाढीव वीजबिल तसंच मंत्र्यांशी संबंधित प्रकरणं यावरुन भाजप महाविकास आघाडी सरकारविरोधात सभागृह दणाणून सोडेल, अशी शक्यता आहे.
संजय राठोड यांचा राजीनामा
अगोदरच जाहीर केल्याप्रमाणे वनमंत्री संजय राठोड यांचा राजीनामा घेतल्याशिवाय सभागृह चालू देणार नाही, असा भाजपचा सध्या पवित्रा दिसत आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी तर मुख्यमंत्र्यांना राजीनाम्यासाठी आझचा अल्टीमेटम दिला आहे. त्यामुळे जर मुख्यमंत्र्यांनी राठोड यांचा राजीनामा घेतला नाही तर भाजप सभागृहात आक्रमक अंदाजात दिसेल.
गोंधळ न करता चर्चा करा- महाविकास आघाडी
दुसरीकडे विरोधकांचे मुद्दे त्यांनी शांतपणे मांडावेत, गोंधळ करु नये. विरोधकांनी मांडलेल्या सगळ्या प्रश्नांवर चर्चा होईल, गोंधळाने काहीही साध्य होणार नाही, अशी भूमिका महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांनी घेतली आहे.
(State Legislature Session Mahavikas Aaghadi BJP)
हे ही वाचा :
Photo: मावशी म्हणून पुजानं जेव्हा स्वत:चं भविष्य पाहिलं त्यावेळेस काय दिसलं? पाहा तिच्याच शब्दात