156 बाटल्या रक्तदान, राज्यमंत्री बच्चू कडू यांची सपत्नीक रक्ततुला

राज्याचे राज्यमंत्री बच्चू कडू आणि त्यांच्या पत्नी नयना कडू यांची चक्क रक्त तुला करण्यात आली (Bachchu Kadu Weighed With Blood). तब्बल 156 बॉटल रक्त देऊन बच्चू कडू यांची सपत्नीक रक्त तुला करण्यात आली.

156 बाटल्या रक्तदान, राज्यमंत्री बच्चू कडू यांची सपत्नीक रक्ततुला
Follow us
| Updated on: Jan 29, 2020 | 7:23 AM

अमरावती : राज्याचे राज्यमंत्री बच्चू कडू आणि त्यांच्या पत्नी नयना कडू यांची चक्क रक्त तुला करण्यात आली (Bachchu Kadu Weighed With Blood). तब्बल 156 बॉटल रक्त देऊन बच्चू कडू यांची सपत्नीक रक्त तुला करण्यात आली. अमरावतीच्या अचलपूर मतदार संघातील चांदूर बाजारात रक्त तुला करण्यात आली (Bachchu Kadu Weighed With Blood).

बच्चू कडू यांनी आता पर्यंत जवळपास 97 वेळा रक्तदान केले आहे. तसेच, मोठ्या प्रमाणावर रक्तदान शिबिरही ते नेहमीच आयोजित करत असतात. त्यांना रक्तदान कार्यक्रमात मोठी आवड आहे. 2019 च्या विधानसभा निवडणुकीच्या वेळेस रक्तदान करुन नामांकन अर्ज दाखल केला होता. तर, मंत्रिपदाची शपथ घेण्यापूर्वी देखील त्यांनी रक्तदान केले होते. तसेच, मंत्रालयाचा पदभार स्वीकारण्यापूर्वीही रक्तदान केलं होतं. त्यामुळे चांदुर बाजारमधील ज्ञानोदय महाविद्यालयात बच्चू कडू यांचा त्यांच्या पत्नीसह सपत्नीक सत्कार आणि रक्त तुला करण्यात आली.

हेही वाचा : अधिकाऱ्यांनी फाईली दाबल्या तर कायदा मोडून तुरुंगातही जाईन, रक्तदान करुन बच्चू कडूंनी पदभार स्वीकारला

कोण आहेत बच्चू कडू?

बच्चू कडू हे अमरावतीतील अचलपूरमधील आमदार आहेत. बच्चू कडू यांच्या ‘प्रहार जनशक्ती पक्षा’ने विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेनेला पाठिंबा जाहीर केला होता. त्यामुळे बच्चू कडू यांना शिवसेनेच्या कोट्यातून राज्यमंत्रिपद मिळालं आहे.

बच्चू कडू यांच्याकडे जलसंपदा आणि लाभक्षेत्र विकास, शालेय शिक्षण, महिला आणि बालविकास, इतर मागासवर्ग, सामाजिक आणि शैक्षणिक मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण, कामगार या विभागांचं राज्यमंत्रिपद सोपवण्यात आलं आहे. आमदार बच्चू कडू हे रुग्णसेवा आणि अपंगसेवा यासाठी महाराष्ट्रभर प्रसिद्ध आहेत.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.