आघाडी-पिछाडीच्या फेऱ्यातून थरारक सुटका, मनिष सिसोदियांचा विजयासाठी संघर्ष

एकिकडे दिल्ली विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्ष तिसऱ्यांदा सत्तास्थापनेच्या दिशेने वाटचाल करत होता. दुसरीकडे पक्षाच्या दुसऱ्या क्रमांकाच्या सर्वात मोठ्या नेत्याला विजयासाठी मोठा संघर्ष करावा लागला.

आघाडी-पिछाडीच्या फेऱ्यातून थरारक सुटका, मनिष सिसोदियांचा विजयासाठी संघर्ष
Follow us
| Updated on: Feb 11, 2020 | 6:05 PM

नवी दिल्ली : एकिकडे दिल्ली विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्ष तिसऱ्यांदा सत्तास्थापनेच्या दिशेने वाटचाल करत होता. दुसरीकडे पक्षाच्या दुसऱ्या क्रमांकाच्या सर्वात मोठ्या नेत्याला विजयासाठी मोठा संघर्ष करावा लागला (Performance of Manish Sisodia in Delhi Election). मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे अत्यंत निकटे सहकारी आणि उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांना मतमोजणी दरम्यान पहिल्या फेरीपासूनच आघाडी-पिछाडीच्या थरारातून जावं लागलं. त्यामुळे काही काळ आप समर्थकांसह स्वतः मनिष सिसोदियांच्या श्वासाचे ठोके चुकले. त्यांच्या चेहऱ्यावरही ही काळजी पाहायला मिळाली.

आपचे नेते आणि दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया पटपतगंज विधानसभा मतदारसंघातून तिसऱ्यांदा निवडणूक मैदानात होते. मात्र, यावेळी त्यांना मतमोजणीच्या अनेक फेऱ्यांमध्ये मिळालेल्या पिछाडीने चांगलंच काळजीत टाकलं. अखेरपर्यंत येणाऱ्या मतांच्या कलाने सिसोदियांचीही अस्वस्थता वाढवली. सिसोदिया नवव्या फेरीत 1288 मतांनी पिछाडीवर होते. भाजपचे उमेदवार रविंद्र सिंह नेगी यांनी मनिष सिसोदीया यांना चांगलंच दमवलं. या मतदारसंघातून काँग्रेसकडून लक्ष्मण रावत मैदानात होते.

मतमोजणीच्या सुरुवातीच्या फेरीत सिसोदियांना आघाडी मिळाली होती. मात्र, काही वेळेतच भाजपचे उमेदवार नेगी यांनी त्यांना कडवी झूंज दिली. सिसोदिया काही काळ प्रत्येक फेरीत पिछाडीवर राहिले. सकाळी 11 वाजेपर्यंत भाजपचे रविंद्र नेगी यांना 15271 मतं, तर सिसोदिया यांना 13844 मतं मिळाली होती. आठव्या फेरीत मनीष सिसोदिया 556 मतांनी पिछाडीवर होते. सिसोदिया यांना या फेरीत 38880 मतं मिळाली, तर भाजपचे रविंद्र नेगी यांना 39436 मतं मिळाली. नवव्या फेरीपर्यंत मनीष सिसोदिया 1288 मतांनी मागे होते. या फेरीत भाजपचे उमेदवार रविंद्र नेगी यांना 44897 मतं मिळाली, तर सिसोदिया यांना 43609 मतं मिळाली. अखेरीस सिसोदियांनी 3 हजारांच्या फरकाने विजय मिळवला.

पटपतगंज विधानसभा मतदारसंघ भाजपचे खासदार गौतम गंभीर यांच्या पूर्व दिल्ली लोकसभा क्षेत्रात येतो. या जागेवर सिसोदियांनी 2013 मध्ये भाजपच्या नकुल भारद्वाज यांचा 11 हजार 476 मतांनी पराभव केला होता. दुसऱ्यांदा 2015 मध्ये सिसोदिया यांनी भाजपच्या विनोद कुमार बिन्नी यांचा 28 हजार 791 मतांनी पराभव केला होता. याचा विचार करता यावेळचा सिसोदियांचा विजय काहीसा निसटता होता.

दरम्यान, अरविंद केजरीवाल राजकारणात येण्याच्या आधीपासून मनिष सिसोदिया सोबत होते. सिसोदियांना केजरीवाल यांचे अत्यंत निकटवर्ती सहकारी मानलं जातं. आपच्या संघटनापासून अगदी दिल्लीतील शिक्षण व्यवस्थेतील आमुलाग्र बदलापर्यंत सिसोदिया प्रत्येक टप्प्यात आघाडीवर दिसले. दिल्लीच्या शिक्षणाच्या मॉडेलनं देशासह जगाचं लक्ष वेधलं. दिल्लीचे शिक्षणमंत्री असणारे सिसोदिया राजकारणात येण्याआधी पत्रकारही राहिले आहेत.

Performance of Manish Sisodia in Delhi Election 2020

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.