Ajit Pawar | अन् अजित पवार म्हणाले, राज्याचे मुख्यमंत्री आदित्य ठाकरे साहेब, नेमकं काय घडलं?

Ajit Pawar in Pune : अजित पवारांच्या या विधानानं उपस्थित असलेल्या काही जणांच्या भुवया उंचावल्या. राज्याच्या मंत्रिमंडळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे सुपुत्र आदित्य ठाकरे हे देखील मंत्री आहेत.

Ajit Pawar | अन् अजित पवार म्हणाले, राज्याचे मुख्यमंत्री आदित्य ठाकरे साहेब, नेमकं काय घडलं?
अजित पवार आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्री का म्हणाले?
Follow us
| Updated on: Jan 15, 2022 | 2:49 PM

पुणे : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी चक्क मुख्यमंत्री म्हणून आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांचं नाव घेतलं आहे. पत्रकारांशी बोलताना राज्यातील निर्बंध आणि नियमावलीवर भाष्य करत असताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आदित्य ठाकरे यांचा मुख्यमंत्री म्हणून उल्लेख केल्यामुळे अनेकांचा काही काळ गोंधळ उडाला होता. पत्रकारांनी अजित पवार यांना राज्यातील नियम अधिक कठोर होणार का, असा प्रश्न विचारला होता. त्याला उत्तर देताना अजित पवार यांनी ‘जर ऑक्सिजनची मागणी वाढली तर निर्बंध वाढवण्यासंबंधीचा निर्णय राज्याचे मुख्यमंत्री आदित्य ठाकरे घेतील’, असं विधान पत्रकारांशी बोलताना केलं आहे. अजित पवार यांनी मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांच्याऐवजी आदित्य ठाकरे यांचं नाव घेतल्यानं आता वेगळ्याच चर्चांना उधाण आलं आहे. अजित पवार यांनी हा उल्लेख जाणीवपूर्वक केला ही अनावधानानं केला, अशी आता कुजबूज राजकीय वर्तुळात ऐकू येतेय.

नेमकं काय म्हणाले अजित पवार?

पुणे जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी कुणाकुणीची निवड केली, याबाबत माहिती देताना अजित पवार पत्रकारांशी बोलत होते. त्यावेळी त्यांनी महत्त्वाची विधानं केली आहे. बँका चालवणं हे तसं स्पर्धात्मक झालेलं आहे, असंही त्यांनी म्हटलंय. दरम्यान, बँकेच्या वेगवेगळ्या पदांवर कोणाला कोणती जबाबदारी देण्यात आली आहे, याबाबत अजित पवार यांनी माहिती दिली. यानंतर अजित पवार यांनी वाढत्या कोरोना रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर सवाल करण्यात आला. राज्यातील निर्बंध आणखी वाढवले जाणार आहेत का, असा प्रश्न पत्रकारांनी अजित पवार यांनी विचारला. त्याला उत्तर देताना अजित पवार यांनी म्हटलं आहे की…

नागरीकांच्या जीवाशी खेळ करुन चालणार नाही. रात्रीची संचारबंदी आणि दिवसाची जमावबंदी सरकारनं सुरु केलेली आहे. पण जर ऑक्सिजनची मागणी वाढली, तर मात्र निर्बंध वाढवण्यासंबंधीचा निर्णय, राज्याचे मुख्यमंत्री आदित्य ठाकरे साहेब घेतील.

अजित पवारांच्या या विधानानं उपस्थित असलेल्या काही जणांच्या भुवया उंचावल्या. राज्याच्या मंत्रिमंडळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे सुपुत्र आदित्य ठाकरे हे देखील मंत्री आहेत. मात्र त्यांचा उल्लेख चक्क मुख्यमंत्री म्हणून केल्यामुळे अनेकांचा काही काळ गोंधळ उडाला. दरम्यान, बोलण्याच्या ओघात अजित पवारांनी आदित्य ठाकरे यांचा उल्लेख मुख्यमंत्री म्हणून केला असावा, असाही तर्क काढला जातो आहे. विशेष म्हणजे मुख्यमंत्र्यांची शस्त्रक्रिया झाल्यानंतर उद्धव ठाकरे हे फारसे माध्यमांसमोर आलेले नाहीत. एका ठिकाणी बोलताना आदित्य ठाकरे यांनी आपल्यावरील भार हलका केला असल्याचंही विधान केलं होतं. अशातच आता अजित पवारांनी मुख्यमंत्री म्हणून उद्धव यांच्याऐवजी आदित्य यांचं नाव घेतल्यानं चर्चांना उधाण आलं नसतं, तरच नवल!

संबंधित बातम्या :

पंतप्रधानांच्या बैठकीला उद्धव ठाकरेंची दांडी, राज्यात मोठी चर्चा, अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया

PDCC Bank Chairman : अजित पवार यांचं धक्कातंत्र, पुणे जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी दिगंबर दुर्गाडे, उपाध्यक्षपदी सुनील चांदेरेंची वर्णी

दादा मला वाचवा, बघतोय रिक्षावाला संघटनेचं अनोखं आंदोलन; अजित पवार यांच्याकडे विशेष मागणी

पाहा व्हिडीओ –

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.