नाशिक पालिका निवडणुकांसाठी शिवसेनेची रणनीती, राऊतांचा विश्वासू नेता महानगरप्रमुख

नाशिक महापालिकेवर भगवा फडकवण्यासाठी शिवसेनेने रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे.

नाशिक पालिका निवडणुकांसाठी शिवसेनेची रणनीती, राऊतांचा विश्वासू नेता महानगरप्रमुख
Follow us
| Updated on: Dec 15, 2020 | 3:52 PM

नाशिक : आगामी नाशिक महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेत संघटनात्मक फेरबदल करण्यात आले आहेत. नाशिक महापालिकेतील शिवसेनेचे ज्येष्ठ नगरसेवक आणि संजय राऊत यांचे विश्वासू सहकारी सुधाकर बडगुजर यांची महानगरप्रमुख पदी निवड करण्यात आली आहे. (Sudhakar Badgujar elected as Shivsena Nashik Chief for Municipal Election)

नाशिक महापालिकेवर भगवा फडकवण्यासाठी शिवसेनेने रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या नाशिक भेटीनंतर खांदेपालट करण्यात आले आहे. बडगुजर हे राऊतांचे विश्वासू सहकारी मानले जातात. अनेक इच्छुकांना डावलून बडगुजर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

सुधाकर बडगुजर हे नाशिक महापालिकेतील शिवसेनेचे ज्येष्ठ नगरसेवक आहेत. अभ्यासू आणि आक्रमक भूमिकेसाठी ते ओळखले जातात. नाशकात शिवसेनेचा महापौर असेल, असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला होता. त्यामुळे सुधाकर बडगुजर यांच्यावर मोठी जबाबदारी असेल.

संजय राऊत काय म्हणाले?

नाशिकमधील बदलाविषयी आम्ही शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करणार आहोत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकत्रित लढण्याचा आमचा विचार आहे. बाकी निवडणुका तुम्ही पाहिल्याच आहेत. पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाची निवडणूक झाली. पहिल्यांदाच आम्ही एकत्र आलो आणि इतरांचे बालेकिल्ले ढासळले, असा खोचक टोला लगावतानाच जनतेचा कौल महाविकास आघाडीच्या बाजूने असल्याचं राऊत म्हणाले होते. (Sudhakar Badgujar elected as Shivsena Nashik Chief for Municipal Election)

नाशिकमध्येही महाविकास आघाडीचा विचार केला तर शिवसेना पहिल्या नंबरवर आहे. मात्र सर्वांचा सन्मान राखूनच निवडणुका लढवल्या जाणार आहेत. कोणी कोणा बरोबर गेलं तरी मुंबई मनपा शिवसेनेकडेच राहील आणि नाशिकचा पुढचा महापौरही शिवसेनेचाच होईल, असं राऊत म्हणाले.

विद्यमान महानगरप्रमुखांची गच्छंती

दरम्यान, शिवसेनेचे विद्यमान नाशिक महानगरप्रमुख महेश बडवे आणि सचिन मराठे यांची उचलबांगडी करण्यात आली आहे. महेश बडवेंकडे पंचवटी, नाशिक, पश्‍चिम आणि सिडको, तर सचिन मराठे यांच्याकडे नाशिक रोड पूर्व आणि सातपूर विभागाची जबाबदारी होती.

नाशिक महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आपण तयारीत असल्याचा इशाराच शिवसेनेने भाजप आणि मनसेला दिला आहे. आता नाशिक पालिका निवडणुकांमध्ये कशी लढत रंगणार, हे पाहणं उत्सुकतेचं आहे.

(Sudhakar Badgujar elected as Shivsena Nashik Chief for Municipal Election)

संबंधित बातम्या 

नाशिकचा पुढचा महापौर शिवसेनेचाच; संजय राऊतांचा दावा

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.